जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत
ताज्या घडामोडी
कैलास, विलास, ईश्वर व किशोर ही निर्मळ कुटुंबातील चार भावंड. त्यांची ९० एकर शेती असून, खरिपातील लागवडही मोठ्या क्षेत्रावर असते. मात्र लहरी पावसामुळे खरीपाचे गाडे रेटताना समस्यांचा महापूर समोर उभा ठाकतो. मात्र नियोजनात्मक पद्धतीने ज्ञान, तंत्रज्ञान व पूरक उद्योगाच्या आधाराने त्यांनी यावर यशस्वी मार्ग शोधला आहे. कसा ते स्वत:च आपल्या शब्दांत सांगत आहेत.
कैलास, विलास, ईश्वर व किशोर ही निर्मळ कुटुंबातील चार भावंड. त्यांची ९० एकर शेती असून, खरिपातील लागवडही मोठ्या क्षेत्रावर असते. मात्र लहरी पावसामुळे खरीपाचे गाडे रेटताना समस्यांचा महापूर समोर उभा ठाकतो. मात्र नियोजनात्मक पद्धतीने ज्ञान, तंत्रज्ञान व पूरक उद्योगाच्या आधाराने त्यांनी यावर यशस्वी मार्ग शोधला आहे. कसा ते स्वत:च आपल्या शब्दांत सांगत आहेत.
आमच्याकडे ९० एकर क्षेत्रात पाच विहिरी असून, पावसाचा खंड पडल्यास संरक्षित सिंचनासाठी शेततळही केले आहे. शेततळ्याचा आकार ४० x ४० मीटर आहे. खरिपात ३० ते ३५ एकर तूर, २० एकर कपाशी, ५ ते ६ एकर बाजरी, ४ ते ५ एकर मुग व ५ ते १० एकर सोयाबीन असे पिकनियोजन असते. त्याच जोडीला चिकूची १०० झाडं (१ हेक्टर) आहेत. मात्र आमच्या भागात पावसाची अनिश्चितता ही दरवर्षीची समस्या आहे. त्यामुळे पावसाळ्यात विहिरीला पाणी आले तर किती दिवस ते पुरेल याची खात्री नसते. अशा वेळी शेततळ्यातील पाण्याचे संरक्षित सिंचन करतो. शेतीपूरक उद्योग म्हणून पाच शेळ्या, शंभर गावरान कोंबड्या, सहा गायी, चार बैल, सहा कालवडी यांचे संगोपन केले आहे. जाणवलेल्या विविध समस्यांबाबत तज्ज्ञांशी चर्चा करून उपाययोजना करतो. त्यामुळे पाणीटंचाई, मजूरटंचाईवर मात करता आली अाहे. सेंद्रिय शेतीची कास धरल्याने जमिनीचा पेात व सुपीकता सुधारून उत्पादन खर्चात घट झाली आहे.
शेतीत अलीकडे जाणवलेल्या समस्या
- वेळेवर पाऊस न पडल्यामुळे पेरणी वेळेत न होणे.
- अवेळी पाऊस व वातावरणातील बदलामुळे रोगराईत वाढ होणे.
- अनियमित पावसामुळे तणाचा प्रादुर्भाव वाढणे.
- एकाच वेळी संपूर्ण शेतकऱ्यांची कामे येत असल्याने मजुरांची समस्या भीषण
- उत्पादकता वाढविताना खर्चही वाढल्याने होणारा तोटा.
समस्यांवर शोधलेले उपाय :
- शेतीला गोपालन, शेळीपालन व कुक्कुटपालनाची जोड
- तणनाशकाचा वापर वाढविला.
- मजूरटंचाईवर उपाय म्हणून यांत्रिकीकरणावर भर
- पावसाच्या खंडांमध्ये मशागतीतून पिकास मातीची भर तसेच शेततळ्यातून सिंचन
- खात्रीच्या बियाण्यासाठी घरच्याच बियाण्यांचा वापर
- खर्च नियंत्रणासाठी ५० टक्के सेंद्रिय व ५० टक्के रासायनिक शेती
- तज्ज्ञांच्या सल्ल्याने रासायनिक खते व औषधाचा वापर
- गांडूळखत, हिरवळीच्या खताचा वापर
- पेरणीवेळीच पिकाला खत देण्याचे काम
- रोग नियंत्रण व उगवणशक्ती वाढावी यासाठी बीजप्रक्रिया
- तणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दरवर्षी नांगरण
- लवकर येणाऱ्या सुधारित वाणांचा वापर
- आच्छादनासाठी जनावरांनी खाऊन उरलेला भुशाच्या वापर.
- पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी ठिबक व तुषारसंचाची सोय
- ओलावा टिकविण्यासाठी पिकाला आंतरमशागतीतून मातीची भर देणे.
रेशीमशेती करण्याबाबत प्रगतिपथावर
कापूस, तूर, सोयाबीन, बाजरी या पिकांचे अपेक्षित उत्पादन घेतले. मात्र दराअभावी त्यांची शेती आतबट्ट्याची ठरली. रेशीमशेतीत शाश्वत उत्पादन व दराची हमी आहे. त्यामुळे स्मार्ट पीक म्हणून जून महिन्यात पाच एकर क्षेत्रावर तुती लागवड करणार आहे.
संपर्क : ईश्वर निर्मळ, ९५९५९८७२७२
- 1 of 348
- ››