agricultural success story in marathi, timtala dist. amravati , Agrowon, Maharashtra | Agrowon

प्रयत्न, सातत्यामुळेच मिळाला दुग्धव्यवसायाला आकार
विनोद इंगोले
शनिवार, 19 मे 2018

प्रयत्न व त्यात सातत्य हाच खरा तर यशाचा मंत्र आहे. टिमटाळा (जि. अमरावती) येथील धनराज मेंढे यांनी एका म्हशीपासून दुग्धव्यवसायास सुरवात केली. प्रयत्न, त्यातील सातत्य व चिकाटी यातून १३ म्हशींचे संगोपन करीत सात लिटर दुधाचे संकलन ९० लिटरवर नेले. दुधाच्या विक्रीसाठी अनेक कसरती करीत त्याला मार्केट मिळवले. आता पोल्ट्री व्यवसायात उतरून त्यांनी प्रगतीची वाट सुकर केली आहे.

प्रयत्न व त्यात सातत्य हाच खरा तर यशाचा मंत्र आहे. टिमटाळा (जि. अमरावती) येथील धनराज मेंढे यांनी एका म्हशीपासून दुग्धव्यवसायास सुरवात केली. प्रयत्न, त्यातील सातत्य व चिकाटी यातून १३ म्हशींचे संगोपन करीत सात लिटर दुधाचे संकलन ९० लिटरवर नेले. दुधाच्या विक्रीसाठी अनेक कसरती करीत त्याला मार्केट मिळवले. आता पोल्ट्री व्यवसायात उतरून त्यांनी प्रगतीची वाट सुकर केली आहे.

अमरावती जिल्‍ह्यातील टिमटाळा (ता. नांदगाव खंडेश्‍वर) गावाची अोळख देशपातळीवर झाली आहे. कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद यांचे शिल्प साकारणारे कै. एकनाथ रानडे हे याच गावातील. गावाला केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दत्तक घेतले. गावातील मेंढे कुटुंबीयांची साडेआठ एकर शेती. धनराज यांचे वडील भीमराव शेतीचे व्यवस्थापन पाहतात. उत्पन्नाचा अन्य स्त्रोत नसल्याने कराराने शेती कसण्यात त्यांनी अनेक वर्षांपासून सातत्य ठेवले. गेल्या सतरा वर्षांपासून गावातील सुनील झाडे यांची शेती ते याप्रमाणे कसतात. आठ एकरांच्या शेतीपोटी २५ हजार रुपये वर्षाला दिले जातात. मात्र, उत्पन्नाचा हा स्त्रोतदेखील पुरेसा नसल्याने दुग्ध व्यवसाची जोड देण्याचा निर्णय घेतला.

व्यवसायाला दिला आकार  
सन २००३ मध्ये धनराज यांनी म्हैस खरेदी केली. मिळणाऱ्या दुधापासून दही तयार करुन निंभोरा लाहे गावात विक्री एक दिवस आड विक्री सुरू केली. सहा महिन्यातंच व्यवसायात जम बसला.
त्यातून कौटूंबीक गरजा भागविण्यासह गाठीशी काही पैसा जोडला. आणखी एक म्हैस खरेदी केली. आता दुधाचे संकलन सात लिटरवरून १४ लिटरवर गेले.  

व्यवसायात भरारी
सन २००४ च्या दरम्यान व्यवसायातून चांगला पैसा जुळला. या बळावर म्हशींची संख्या तीनवर, त्यानंतर टप्याटप्याने आणखी व्यवसायवृद्धी करीत ती तेरावर पोचली. दूधसंकलन दोन्ही वेळचे मिळून ९० लिटरपर्यंत पोचले. अलीकडील वर्षांत उन्हाची तीव्रता वाढल्याने तसेच अधूनमधून ढगाळ वातावरण राहात असल्याने दूध उत्पादन सरासरी दहा लिटरने कमी झाले आहे.  

गायींचेही संगोपन
म्हशींसह दोन गायीदेखील आहेत. प्रति गाय सरासरी आठ लिटर दूध देते. दुधाची विक्री बडनेरा येथे  घरगुती ग्राहकांना ४० रुपये प्रतिलिटर दराने होते. जनावरांचे आरोग्य जपण्यासाठी निरसाना येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉ. संजय वंजारी यांचे मार्गदर्शन मिळते.

करार शेतीत चारा लागवड
आठ एकरांवरील करार शेतीतील तीन एकरांवर चारा लागवड होते. त्यामुळे वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होतो. त्यामुळेच दुधाच्या उत्पादकतेतही सातत्य मिळण्यास मदत होते. वर्षभर उपलब्धतेसाठी टप्याटप्याने अर्धा एकर क्षेत्र लागवडीखाली आणले जाते. चाऱ्याच्या साठवणुकीसाठी ८५  हजार रुपये खर्चून गोदाम बांधले. त्यासाठी गावाबाहेर प्लॉटची खरेदी केली. लगतच्या गावातून तूर, हरभरा कुटार त्यासोबतच गव्हांडा खरेदी केला जातो. हरभरा कुटार सरासरी पाच हजार रुपये प्रतिटन, तुरीचे कुटार एक हजार रुपये बैलगाडीप्रमाणे मिळते. तर गव्हांडा मोठ्या ट्रकमधून खरेदी होतो. प्रतिट्रक लोडींगसाठी साधारणतः आठ हजार रुपये मोजावे लागतात. चाऱ्यावर दरवर्षी किमान ७० हजार रुपयांचा खर्च होतो.

शेणखताची  विक्री
वर्षभरात घरचे ३५ ट्रॉली शेणखत उपलब्धता होते. त्याची दोन ते अडीच हजार रुपये प्रति ट्रॉलीप्रमाणे विक्री होते. शेणखताचा दर्जा चांगला असल्याने शेतकऱ्यांकडून आगाऊ नोंदणी केली जाते.  

दूधविक्रीतील कसरत
मिळणाऱ्या सरासरी ९० लिटर दूधसंकलनातून निम्मे दूध घरगुती ग्राहकांना ५५ रुपये प्रतिलिटर दराने व उर्वरित डेअरीला पुरविले जाते. धनराज यांचा मुलगा रेशम बारावीला अाहे. अमरावती येथील महाविद्यालयात तो शिकतो. त्यामुळे दुचाकीवरून तो सोबत दूध घेतो व ग्राहकांपर्यंत पुरवण्याची व्यवस्था करतो. त्यानंतर खासगी डेअरीच्या ठिकाणी दुधाच्या कॅन ठेवून मग महाविद्यालयात जायचे. सायंकाळी गावी परतताना रिकामे कॅन सोबत न्यायचे अशी कसरत रेशमला करावी लागते. अर्थात पूर्वी धनराज ही जबाबदारी सांभाळायचे. आता त्यांचा मुलगा वडिलांना मदत करतो.  

ठळक बाबी

  • आठ एकरांवरील शेतीत पाण्यासाठी विहिरीचा पर्याय. चाराक्षेत्र वगळता उर्वरित क्षेत्रात तूर, सोयाबीन
  • जनावरांसाठी २० बाय २४ फूट आकाराचे शेड. त्यात उन्हाळ्यासाठी ‘फॅन’ची सोय
  • घराजवळच शेड असल्याने जनावरांवर चोवीस तास लक्ष ठेवणे शक्‍य

छोटेसे कुक्‍कुटपालन

  • टिमटाळा हे केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांचे दत्तकगाव. त्या अंतर्गत पूरक व्यवसायाला चालना मिळावी यासाठी प्रतिशेतकरी २८ कोंबड्यांचे वाटप करण्यात आले. धनराज यांनीही या कोंबड्यांच्या जोडीला गावातील शेतकऱ्याकडून २८ कोंबड्या खरेदी केल्या. पुढे नरांची विक्री करण्यात आली. त्याचबरोबर अमरावती येथे दूध विक्रीस नेताना अंडीही सोबत नेऊन विक्री करण्यात आली. आता
  • अंड्यांची ग्राहकांकडून मागणी होऊ लागली आहे. सुरवातीला वनराज, गिरीराज, ग्रामप्रिया या जातीच्या कोंबड्या होत्या. सद्यस्थितीत २० कडकनाथ तर १०० ग्रामप्रिया जाती आहेत.
  • दुधाळ जनावरांसाठी असलेल्या गोठ्यालगतच्या भागातच कोंबड्याकरिता कल्पकतेने कमी जागेत खुराडे तयार केले आहे. एका म्हशीच्या माध्यमातून सुरू केलेल्या व्यवसायात उल्लेखनीय भरारी घेण्याचे धनराज यांनी केलेले प्रयत्न यशस्वी झाले आहेत.

संपर्क : धनराज मेंढे,९९२१२०८७४३, ९८२३४९१३८०

 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...
हरभरा पेरणी ३३ टक्क्यांनी माघारलीनवी दिल्ली ः देशातील दुष्काळी स्थितीचा परिणाम...
राणी लक्ष्मीबाईंचे गाव बनले पाणीदारसातारा: झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे मूळ गाव म्हणजे...
विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य...पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने...
खानदेशात जनावरांची निम्म्या दरात विक्रीचाळीसगाव, जि. जळगाव ः लांबलेल्या व अवेळी पडलेल्या...
रब्बी पेरणी २० टक्क्यांनी घटलीनवी दिल्ली ः देशातील बहुतांशी भागात यंदाच्या...
सातारा, सोलापूर, परभणीत ऊसदरासाठी आंदोलनपुणे ः गेल्या गळीत हंगामातील थकबाकी द्यावी तसेच...
निर्यातीच्या केळीला १८०० रुपये दरजळगाव ः राज्यात निर्यातीच्या केळीला यंदा उच्चांकी...
नागपूर, गोंदिया गारठलेपुणे : उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात...
ऊसदराबाबत हवे दीर्घकालीन धोरणऊसदराचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही...
दक्षिण महाराष्टात ऊसतोडी सुरूकोल्हापूर : ऊसदराचा तिढा शनिवारी (ता. ११) दुपारी...