लिंबू, पेरू, सीताफळातून शाश्वत शेती

अभ्यासातून निवडलेली पीकपध्दती राजाभाऊंनी पाच वर्षे गावचे सरपंचपद भूषविले. आता ते पूर्णवेळ शेती करतात. वाढलेली मजुरी, त्या तुलनेने मिळणारे कमी बाजारभाव यामुळे पारंपरिक पीक पद्धतीतून उत्पादन खर्चाएवढेही उत्पन्न मिळत नव्हते. जमीन हलकी होती. त्यातच कमी पाण्यात येऊ शकणाऱ्या पिकांची गरज होती. बाजारपेठेतील मागणीही महत्त्वाची होती. अभ्यासातून फळबाग लागवडीकडे वळण्याचा निर्णय घेतला.
लिंबांची प्रतवारी सुरू असताना
लिंबांची प्रतवारी सुरू असताना

खडकाळ जमीन, पाण्याची उपलब्धता, जोखीम कमी असणारे पीक व्यवस्थापन व बाजारातील मागणी या चार घटकांच्या आधारे परभणी जिल्ह्यातील उजळंबा येथील राजाभाऊ रगड यांनी पीकपद्धतीची आर्थिक घडी बसवली आहे. फळपीक केंद्रित शेतीवर भर देताना लिंबू, पेरू, सीताफळ आदी पिकांमधून वर्षभर शाश्वत उत्पन्न मिळवण्याची सोय केली आहे.   उजळंबा (ता. जि. परभणी) हे परभणी शहरापासून १४ किलोमीटर अंतरावरील छोटे गाव आहे. गावशिवारातील बहुतांश जमीन बरड, खडकाळ, हलक्या प्रकारची आहे. राजाभाऊ बाबाराव रगड यांची उजळंबा शिवारात ४५ एकर हलक्या ते मध्यम प्रकारची जमीन आहे. गावाला लागूनच त्यांचा मळा आहे. सिंचनासाठी विहीर, शेततळ्यांची व्यवस्था आहे. बीएपर्यंत त्यांचे शिक्षण झाले आहे. फळपीक लागवडीवर भर राजाभाऊंनी पाच वर्षे गावचे सरपंचपद भूषविले. आता ते पूर्णवेळ शेती करतात. वाढलेली मजुरी, त्या तुलनेने मिळणारे कमी बाजारभाव यामुळे पारंपरिक पीक पद्धतीतून उत्पादन खर्चाएवढेही उत्पन्न मिळत नव्हते. जमीन हलकी होती. त्यातच कमी पाण्यात येऊ शकणाऱ्या पिकांची गरज होती. डाळिंबासारखे कायम देखभाल करावे लागणारे हवामानाला नाजूक पीक नको होते. बाजारपेठेतील मागणीही महत्त्वाची होती. अभ्यासातून फळबाग लागवडीकडे वळण्याचा निर्णय घेतला. हलक्या जमिनीवर खोदलेल्या खड्यामध्ये काळी माती आणून टाकली. अशी आहे फळपीकपद्धती

  • एकूण ४५ एकर क्षेत्राकी १७ एकरांवर फळबाग
  • सन २०१२ मध्ये १२ एकरांवर लिंबू (प्रमालिनी), अडीच एकरांवर पेरू (लखनौ ४९)
  • सन २०१३ - अडीच एकर सीताफळ (बाळानगर)
  • लिंबाचे वर्षभर उत्पादन साधारण २० बाय २० फूट अंतरावर लिंबाची लागवड केली आहे. झाडांची संख्या एकरी ११० पर्यंत आहे. दोन वर्षांपासून उत्पादन सुरू झाले आहे. तसे हे वर्षभर उत्पादन देणारे पीक आहे. मात्र मृग आणि आंबे असे दोन्ही बहार प्रामुख्याने घेतले जातात. वर्षभर कमी- अधिक प्रमाणात उत्पादन सुरू असते. हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात मागणी वाढलेली असते. त्यामुळे दर चांगले मिळतात. चांगली वाढ झालेल्या झाडापासून एक क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. तोडणीनंतर ग्रेडिंग केले जाते. क्रेट मध्ये भरून माल मार्केटमध्ये पाठवला जातात. यंदा परभणी येथील मार्केटमध्ये प्रति किलो सरासरी ३५ रुपये दर मिळाला. गेल्या वर्षी अमृतसर येथे मित्राच्या मदतीने २५ क्विंटल लिंबे पाठविण्यात आली. गेल्या दोन वर्षांत २४० ते ३०० क्विंटलपर्यंत एकूण उत्पादन मिळाले. पेरूची शेती एक एकरावर १० बाय १९ फूट तर दीड एकरावर २० बाय १० फूट अंतर अशी अडीच एकरांत सुमारे ८०० झाडांची लागवड केली आहे. प्रतिझाड सरासरी ५० किलो व काही वेळा त्याहून अधिक उत्पादन मिळते. परभणी तसेच नांदेड येथील व्यापाऱ्यांना विक्री होते. गेल्यावर्षी सरासरी प्रति किलो १० रुपये दर मिळाले. अलीकडील वर्षांत हे दर १० ते १५ रुपये या दरम्यान राहिल्याचे राजाभाऊ यांनी सांगितले. सीताफळ उत्पादन बाळानगर जातीच्या झाडांची १० बाय १० फूट अंतरावर एकरी सुमारे ४३५ झाडांची लागवड केली आहे. झाडे लहान आहेत. प्रति झाड सरासरी ७ किलो याप्रमाणे उत्पादन मिळू लागले आहे. परभणी येथील मार्केटमध्ये प्रति किलो सरासरी ३० रुपये (प्रति क्रेट ५३० रुपये) दर मिळतात. पाणी व्यवस्थापन फळबागांना ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिले जाते. राजाभाऊ यांच्याकडे तीन विहिरी आहेत. परंतु त्यांचे पाणी दरवर्षी जेमतेम फेब्रुवारी- मार्च महिन्यापर्यंत पुरेशा प्रमाणात उपलब्ध असते. त्यानंतर पाणी कमी पडते. दोन वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळात टॅंकरने पाणी विकत घेऊन फळबागा वाचविल्या. गेल्यावर्षी राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियानअंतर्गत शेततळ्यांची निर्मिती केली. आणखी एका शेततळ्यांचे काम पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये संरक्षित सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत आहे. शाश्वत उत्पन्न मिळू लागल्याने येत्या काळात उर्वरित क्षेत्रापैकी जास्तीतजास्त क्षेत्र फळबाग लागवडी खाली आणण्याचा मानस आहे. ठळक बाबी

  • यंदा ८ एकर क्षेत्रावर पेरूची नवी लागवड केली आहे.
  • शेतमाल साठवणुकीसाठी ग्रामीण गोदाम योजनेतून ६० बाय ३० फूट आकाराच्या गोदामाची उभारणी केली आहे.
  • चाळीस बाय २० फूट आकारमानाचे पॅक हाऊस शेतात बांधले आहे.
  • ट्रॅक्टर, पाॅवर टिलरच्या सहाय्याने शेतीकामे केली जातात. एक बैलजोडी तसेच चार सालगडी आहेत. -फळांच्या विक्रीसाठी चुलत भावांची मदत मिळते.
  • फळबागांमध्ये रस्ते तयार केले आहेत. त्यामुळे वाहतूक सोयीस्कर झाली आहे.
  • ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिले जाते.
  • लिंबावरील सिट्रस कॅन्कर रोगाच्या नियंत्रणासाठी शिफारशीत रसायनाची फवारणी केली जाते.
  • पाॅवर टीलरद्वारे आंतरमशागत केली जाते
  • सेलू तालुक्यातील लिंबू उत्पादक विनायक गोरे यांचे फळबाग व्यवस्थापन, मार्केटिंगसाठी मार्गदर्शन मिळते. कृषी विभागाकडून योजनांची माहिती मिळते.
  • ग्रामविकासात सहभाग राजाभाऊ २००५ ते २०१० या कालावधीत गावचे सरपंच होते. त्या वेळी गावांमध्ये लोकसहभागातून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबवले. या स्पर्धेत उजळंबा गावाला जिल्ह्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. त्याबरोबरच फुले-शाहू-आंबेडकर स्वच्छता पुरस्कार, अंगणवाडीला पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार मिळाले. महात्मा जोतीबा फुले जलसंधारण अभियानांतर्गंत गाव शिवारात ५० वनराई बंधांऱ्यांची उभारणी केली. तत्कालीन कृषी सचिव जे. एस. सहारिया यांनीही शिवाराला भेट दिली होती.

    संपर्क- राजाभाऊ रगड - ८००७५५०४४४  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com