हळदीला साथ रेशीम शेतीची

शेतीचे अर्थकारण नेहमीच फायद्यात ठेवण्यासाठी हळदीची शेती बिचेवार यांना कायमच भावली. पण हळदीला गेल्या चार वर्षांपासून रेशीम शेतीची साथ दिल्याने उत्पन्नात उल्लेखनीय वाढ करणे त्यांना शक्य झाले आहे.
तयार झालेले दर्जेदार रेशीमकोष
तयार झालेले दर्जेदार रेशीमकोष

हळद हे विडूळ (ता. उमरखेड, यवतमाळ) येथील बिचेवार कुटुंबीयांचे पारंपरिक पीक आहे. शेतीचे अर्थकारण नेहमीच फायद्यात ठेवण्यासाठी हळदीची शेती त्यांना कायमच भावली. पण हळदीला गेल्या चार वर्षांपासून रेशीम शेतीची साथ दिल्याने उत्पन्नात उल्लेखनीय वाढ करणे त्यांना शक्य झाले आहे. हळद, कापूस, सोयाबीनच्या पट्ट्यात रेशीम शेतीचा मार्ग त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांना दाखवला आहे.

विडूळ (ता. उमरखेड, यवतमाळ) येथील प्रभाकर बिचेवार यांची सुमारे १८ एकर शेती आहे. हळद हे त्यांचे पारंपरिक पीक आहे. शिवाय दोन एकर कापूस, सहा एकर सोयाबीन, हरभरा आदी पिके आहेत. दोन एकरांतील उसाचा खोडवा तुटून गेल्यानंतर आता टरबूज (कलिंगड) लागवड केली आहे. विहीर तसेच शेततळ्याच्या माध्यमातून संरक्षित सिंचनाची सोय केली आहे.

एकत्रित कुटुंबाचा आदर्श बिचेवार परिवारात सात जणांचा समावेश आहे. सध्या प्रभाकर व मुलगा महेश्वर हे शेतीची जबाबदारी सांभाळतात. भावंडांपैकी दोघे जण स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. एका भावाचे कृषी सेवा केंद्र आणि हार्डवेअरचा व्यवसाय आहे.

रेशीम शेतीतून वेगळी वाट वडूळपासून जवळच्या अंतरावर असलेल्या ढाणकी येथील विठ्ठल वाघमारे हे रेशीम शेतीसाठी परिसरात प्रसिद्ध आहेत. महेश्‍वर यांनाही त्यांच्या या शेतीविषयी उत्सुकता होती. त्यांनी वाघमारे यांची भेट घेत या शेतीत आपल्यालाही रस असल्याचे सांगितले. जिल्हा रेशीम कार्यालयाला भेट दिली. येथील वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक मुकुंद नरवाडे यांनी अनेक शंकांचे निरसन केले. त्यानंतर चुलत भाऊ सिद्धेश्‍वर यांच्यासह महेश्वर यांनी रेशीम शेतीस सुरवात केली.   

महेश्वर यांची फायदेशीर शेती हळद + रेशीम हळद

  • उत्पादन : एकरी ३० ते ३२ क्विं. (वाळवून)
  • दर : ७,००० रु. प्रति क्विंटल
  • खर्च वजा जाता समाधानकारक उत्पन्न     हाती येते.
  • विदर्भात तापमान अधिक असल्याने एप्रिल-मे महिन्यात रेशीम व्यवसाय बंद ठेवण्यात येतो.
  • सुरवातीच्या काळात २०० रुपयांना १०० अंडीपूंज खरेदी करण्यात आले. या माध्यमातून ८४ किलो रेशीम कोषांचे उत्पादन झाले. त्यांची २५० रुपये प्रति किलो दराने सिकंदराबाद (आंध्र प्रदेश) येथील बाजारात विक्री केली गेली.
  • गुंतवणूक : सुमारे दोन लाख रुपये. त्यासाठी सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाचे कर्ज घेतले.
  • अशी शोधली बाजारपेठ सिकंदराबाद येथील रेशीम कोष बाजाराविषयी माहिती अनुभवी शेतकऱ्यांकडून मिळाली. दोन वर्षे तिथे विक्री केल्यानंतर आता रामनगर (कर्नाटक) येथील बाजारात विक्री केली जाते.

    रामनगर येथे कोषांना मिळणारा दर ४०० ते ५०० रु. प्रति किलो

    एकत्रित मार्केटिंग गावात महेश्‍वर आणि चुलतभाऊ सिद्धेश्‍वर असे दोघेच सुरवातीला रेशीम शेती करायचे. यंदाच्या वर्षी गावपरिसरातील सुमारे १५ जणांनी रेशीम शेतीसाठी नोंद केली आहे. जिल्ह्यातील जवळच्या भागातील अन्य आठ ते नऊ रेशीम उत्पादक एकत्र येऊन रामनगरला गाडी करून जातात. सर्वांचा एकत्रित माल असल्याने ते परवडत असल्याचे महेश्वर सांगतात. शेतावर कार्यशाळा उमरखेड ते ढाणकी मार्गावर महेश्‍वर यांची शेती असल्याने कृषी विभाग तसेच रेशीम विभागाच्या वतीने येथे नियमित कार्यशाळा भरतात. रेशीम जिल्हा विकास अधिकारी चौगुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी त्यामध्ये उपस्थिती दर्शविली आहे. जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे.. शहाणे करुनी सोडावे सकल जन याच संत विचारांचा वारसा जपत महेश्‍वर यांनी रेशीम शेतीच्या प्रसाराचे काम सुरू ठेवले आहे.

    रेशीम शेतीतील अनुभव : ४ वर्षे              

    तुतीचे क्षेत्र     २ एकर                   

    रेशीम शेड   ५० बाय २० फूट वर्षातील बॅचेस  ६         (प्रति १०० अंडीपूंजांपासून कोष उत्पादन )  ८५  किलो                          २०० ते २५०  अंडीपूंजांची प्रति बॅच (पाला उपलब्धीनुसार)    संपर्क : महेश्‍वर बिचेवार, ९४०४५२६७२५  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com