agricultural success story in marathi,ghorad tal. selu dist. vardha , Agrowon, Maharashtra | Agrowon

चिकाटीच्या जोरावर अल्पभूधारक झाला मसाले उद्योजक
विनोद इंगोले
शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018

गुणवत्तापूर्ण उत्पादन व मार्केटिंगचे सातत्याने प्रयत्न यांच्या जोरावर हा व्यवसाय सुमारे पाच वर्षांत वृद्धीच्या चांगल्या टप्प्यावर पोचवण्यात मनोज गोमासे यांना यश मिळाले आहे. यशस्वी प्रक्रिया उद्योजक म्हणून त्यांनी ओळख बनविली आहे.  

वर्धा जिल्ह्यातील घोराड (ता. सेलू) येथील अल्पभूधारक शेतकरी मनोज गोमासे यांची केवळ तीन एकर शेती. मात्र अल्प शेतीवर अवलंबून राहता येत नसल्याने त्यांनी मिरची, हळद आदी पावडर निर्मिती उद्योगाची वाटचाल धरली. गुणवत्तापूर्ण उत्पादन व मार्केटिंगचे सातत्याने प्रयत्न यांच्या जोरावर हा व्यवसाय सुमारे पाच वर्षांत वृद्धीच्या चांगल्या टप्प्यावर पोचवण्यात त्यांना यश मिळाले आहे. प्रक्रिया उद्योजक म्हणून अोळख बनविणे त्यांना शक्य झाले आहे.

वर्धा जिल्ह्यातील घोराड (ता. सेलू) येथील मनोज गोमासे यांचे वडील विनायक गोमाशे यांना सहा भाऊ. कुटुंबीयांची एकत्रित १५ एकर शेती. सुरवातीला एकत्रित कुटुंब पद्धतीचा वारसा परिवाराने जपला. त्यामुळे शेतीचे व्यवस्थापनही सामूहिकरीत्या व्हायचे. त्यावेळी सुमारे साडेसात एकरांवर मिरची असायची. उर्वरित क्षेत्रात सोयाबीन, कपाशी, गहू, हरभरा आदी पारंपरिक पिके व्हायची. साधारण १९९५ मध्ये शेतीची विभागणी होत मनोज यांच्या वाट्याला तीन एकर शेती आली. मनोज यांचे वडील पाटबंधारे विभागात नोकरीला होते. साहजिकच पुढील शेतीची जबाबदारी मनोजच हाताळणार होते.

प्रक्रिया उद्योगात उडी  
मनोजही सावंगी येथे शासकीय प्रकल्पाच्या अानुषंगाने खासगी नोकरीत कार्यरत होते. काही कारणांमुळे त्यांनी नोकरी सोडली. आता शेतीचाच पर्याय समोर दिसत होता. त्यांचे भाऊ हळद, मिरची पावडर तयार करून सर्वत्र फिरून विक्री करायचे. या घरगुती व्यवसायाला अजून चांगले रूप देण्याचे व त्याचा विस्तार करण्याचे मनोज यांनी ठरविले.

व्यवसायातील टप्पे
प्रशिक्षण
व्यवसाय उभारणीपूर्वी वर्धा येथील दोन मिरची व हळद पावडर उत्पादकांकडे वर्षभर काम केले. त्या माध्यमातून या क्षेत्रातील बारकावे जाणून घेतले.

भांडवल उभारणी
खादी आणि ग्रामोद्योग मंडळाकडे प्रकल्प आराखडा सादर. पंतप्रधान रोजगार योजनेतून दहा लाख रुपयांचे कर्ज मंजूर. बॅंक ऑफ इंडियाच्या सेलू शाखेतून कर्जाची उचल करण्यात आली.
बॅंकेकडून मिळालेल्या दहा लाख रुपयांच्या कर्जापैकी सहा लाख ६८ हजार रुपये यंत्रसामग्रीसाठी उर्वरित रक्‍कम खेळते भांडवल (कच्चा माल खरेदीसाठी) उपयोगात आणले. त्यातून दोन पल्वरायझर्सची खरेदी झाली. त्याची किंमत अनुक्रमे एक लाख ३० हजार व ७५ हजार रुपये.
दोन पॅकिंग मशिन्सची किंमत अनुक्रमे एक लाख २० हजार रुपये व ३५ हजार रुपये.

व्यवसायातील आजचा अनुभव

 • सुमारे पाच वर्षांचा तयार होत आला.
 • उत्पादने- मिरची, हळद, धने, जिरा पावडर.
 • बाजारातील मागणीनुसार ५० ग्रॅमपासून ते पाच किलो, तीस किलो पॅकिंग.
 • मशिनरी- मिक्सिंग, पल्वरायझर, पॅकिंग मशिन, चक्की आदी.

बाजारपेठ मिळविण्याचे प्रयत्न

 • पावडर विक्रीच्या सुरवातीला वर्धा आणि नागपूर येथील घाऊक व्यापाऱ्यांच्या भेटी घेणे सुरू केले. यात महिला बचत गटाच्या महिला सदस्यांचाही सहभाग घेतला. प्रत्येक विक्री केंद्रात जाऊन मालाच्या गुणवत्तेविषयी पटवून देणे व मालात कोणत्याही प्रकारची भेसळ नसल्याचे सांगण्यात येत होते.
 • मालाचा नमुना देण्यात येत होता.  
 • दर आठवड्याने व्यापाऱ्यांना फोन करून मालाच्या पसंतीविषयी व मागणीविषयी विचारणा व्हायची.
 • अनेक वेळा मानहानिकारक शेरेही व्यापाऱ्यांकडून एेकावे लागले.
 • हळूहळू आठवड्याला १० ते १५ किलो अशी अत्यल्प मागणी होती. ग्राहकांकडून मागणी होऊ लागल्याने घाऊक विक्रेत्यांकडूनही तशा प्रकारे मागणीत वाढ झाली.
 • कच्च्या मालाच्या दरांनुसार नफ्याचे प्रमाण कमी-जास्त होते.
 • कधीकाळी इतरांकडे रोजगार करणाऱ्या मनोज यांना जिद्दीतून उद्योग उभारून उत्पन्नाची धवल वाट शोधली. शिवाय इतरांनाही रोजगार दिला.  

कच्चा माल कोठून येतो?
हळद

 • समुद्रपूर तालुक्‍यातील वायगाव (हळद्या) हळद उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. वायगाव जातीची हळद या भागात होते. राज्यभरात ती प्रसिद्ध आहे. या भागातील शेतकऱ्यांकडून हळदीची थेट मार्केट दराने खरेदी
 • गेल्या पाच वर्षांपासून या खरेदीत सातत्य. हळदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत असल्याचा अनुभव आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची अडत, दलाली, हमाली किंवा वाहतूक खर्च आकारणी होत नसल्याने शेतकऱ्यांसाठीही हा फायद्याचा सौदा ठरतो.
 • खरेदीचा कालावधी- जानेवारी ते जून. अन्य काळात हळदीचे माहेरघर असलेल्या सांगली बाजारपेठेतून व्यापाऱ्यांमार्फत खरेदी  

मिरची, धने, जिरा

 • कुही, मांढळ, तारणा, कळमणा, सेलू या मिरचीसाठी प्रसिद्ध असलेल्या     बाजारातून.
 • पावडर विक्री- प्रति महिना
 • मिरची- ५ क्विंटल
 • हळद- ३ क्विंटल
 • धने, जिरा- प्रत्येकी २ क्विंटल

खरेदीदार :
रिटेल व्यावसायिक
होटेल्स
थेट ग्राहक

ठिकाणे :
नागपूर, यवतमाळ, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, अकोला, पुणे, मुंबई येथूनही आॅर्डर्स घेत आहेत.   

विक्रीसाठी मनुष्यबळ
सुमारे २५ पाच टक्के कमिशन बेसीसवर
 
उत्पादनाचा ब्रॅंड

 • केजाजी उद्योग या नावाने व्यवसाची नोंदणी. पंधरवड्यापूर्वी हा ट्रेडमार्क रजिस्टर्ड केला.
 • दिलेला रोजगार- महिला बचत गटाच्या सदस्य तसेच निर्मितीत सात व पॅकिंगमध्ये सुमारे पाच जण.

कृषी प्रदर्शनातून विक्री
बाजारपेठ मिळवण्याच्या प्रयत्नांपैकी सुमारे ७० विविध कृषी प्रदर्शने वा महोत्सवांमधून मनोज यांनी भाग घेतला आहे. सुमारे तीन दिवसांत ३५ ते ४० हजार रुपयांचे उत्पन्न त्यातून मिळवण्याचा प्रयत्न होतो. आॅनलाइन तसेच फेसबुकच्या माध्यमातूनदेखील बाजारपेठ मिळवणे सुरू आहे.

संपर्क : मनोज गोमासे : ९९७५४७३३१४

फोटो गॅलरी

इतर मसाला पिके
हळदीमध्ये भरणी, खत व्यवस्थापन...हळदीची उगवण आणि शाकीय वाढ यांनतर पुढील दोन...
हळद पिकातील रोगांचे नियंत्रणसध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
हळद पिकातील कीड नियंत्रणसध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
हळदीची भरणी आवश्यक...सध्याच्या काळात हळदीचे खोड तसेच फुटव्यांची वाढ...
पानवेल लागवडीसाठी जोमदार बेणे निवडापानवेल लागवडीसाठी सुपीक, उत्तम निचरा होणारी, रेती...
पानवेल लागवडीपूर्वीची तयारी...ज्या शेतकऱ्यांना नवीन पानमळ्याची लागवड करावयाची...
काळी मिरी कशी तयार करतात?काळी मिरीच्या वेलांची लागवड केल्यानंतर तीन...
मसाला प्रक्रिया उद्योगात अाहेत संधीमसाले व त्यावर आधारित प्रक्रियायुक्त पदार्थांना...
गादीवाफ्यावर करा आले लागवडआले लागवड करण्यापूर्वी १ ते २ दिवस अगोदर गादीवाफा...
मसाला पिकांची लागवड कशी करावी?नारळाची लागवड ७.५ x ७.५ मीटर अंतरावर करावी. या...
तयारी आले लागवडीची...आले लागवड करताना जमिनीची निवड, पूर्वमशागत, बियाणे...
दालचिनी लागवडीबाबत माहिती...दालचिनी लागवड अतिपावसाळा सोडून कोणत्याही महिन्यात...
काढणीनंतर हळद बियाण्याची योग्य साठवण...हळद कंदाची गुणवत्ता दीर्घकाळ टिकविण्यासाठी पिकाची...
पानवेल व्यवस्थापन सल्लासद्यःस्थितीत पानवेलीच्या शेतात आंतरमशागत, वेलीची...
चिकाटीच्या जोरावर अल्पभूधारक झाला मसाले...वर्धा जिल्ह्यातील घोराड (ता. सेलू) येथील...
अवेळी पावसात घ्या हळदीची काळजीसद्यःस्थितीत राज्यात हळद काढणी सुरू आहे. मात्र...
योग्य प्रक्रियेतून वाढते हळदीची गुणवत्ताआयताकृती कुकर व सच्छिद्र ड्रमचा वापर केल्याने...
सुधारित पद्धतीने शिजवा हळदपारंपरिक पद्धतीमध्ये हळद पाण्यात शिजवली जाई....
हळदकंदांवर प्रक्रियेसाठी सुधारित...हळदकंदांची काढणी केल्यानंतर हळदीवर प्रक्रिया करून...
मसाला पीक सल्लाकोकण किनारपट्टीवरील नारळ, सुपारीच्या बागेमध्ये...