agricultural success story in marathi,savangi tomar dist.nagpur, Agrowon, Maharashtra | Agrowon

सेंद्रिय भाजीपाल्यासाठी थेट मिळवले ग्राहक
विनोद इंगोले
शनिवार, 16 डिसेंबर 2017

दुधाच्या ग्राहकांसाठी तयार केलेल्या ‘ॲप’च्या माध्यमातूनच भाजीपाल्याची मागणी नोंदविली जाते. त्यानुसार ताजा भाजीपाला पुरवण्यात येतो. दोघा मित्रांच्या भागीदारीतून पॅकिंग व त्यावर ‘ब्रॅंडनेम’ आहे. त्याद्वारे भाजीपाला ग्राहकांपर्यंत पोचविला जातो.

नागपूरचे रहिवासी असलेल्या सुनील कोंडे या उच्चशिक्षित युवकाने कृषी विभागाची नोकरी सोडून  सावंगी तोमर (जि. नागपूर) येथे सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला शेती सुरू केली आहे. नागपूरमध्ये त्यासाठी आपली ग्राहक बाजारपेठ तयार केली आहे. व्यावसायिक कौशल्य, तांत्रिक व बाजारपेठेचे पक्के ज्ञान ही गुणवैशिष्ट्ये जपणारे सुनील आजच्या काळातील स्मार्ट शेतकरीच म्हटले पाहिजेत.

नागपूर येथे वास्तव्यास असलेले सुनील कोंडे उच्चशिक्षित असून त्यांचे एमएससी एमबीए पर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांचे वडील शिक्षक होते. त्यामुळे सुनील यांचा लहानपणी शेतीशी थेट संपर्क कमीच असायचा. कृषी विभागांतर्गत कृषी ऍग्री पॉलिक्लिनिक विभागात त्यांनी पाच वर्षे नोकरी केली.  सन २००५ मध्ये त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन पूर्णवेळ शेतीतच उतरण्याचा निर्णय घेतला. सावंगी परिसरात शेती खरेदी केली.

खर्च कमी करणारी १२ एकर सेंद्रिय शेती  

 • कोंडे यांची १२ एकर शेती आहे. त्यातील दहा एकरांवर ‘रोटेशन’ पद्धतीने बारमाही भाजीपाला घेतला जातो.
 • काकडी, मिरची, टोमॅटो, वाल, चवळी, भेंडी, वांगी अशी त्यात विविधता
 • सुमारे ८० टक्‍के सेंद्रिय तर २० टक्‍के रासायनिक शेती पद्धतीचा वापर  
 • किडीरोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक अर्क, रंगीत सापळे यांचा वापर केला जातो.

सजीव शेती करण्याचा प्रयत्न

 • जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी होऊ लागला आहे. त्यामुळे जमीन सजीव ठेवण्याचा सुनील यांचा आग्रह असतो. सेंद्रिय खत निर्मिती व वापरावर भर दिला जातो.
 • त्यांच्याकडे वर्षाला तयार होते ७५ ते १०० टन गांडूळखत
 • गोमूत्र, शेणखत, जीवाणू आदींचा समावेश करून द्रवरूप मृदामृत तयार केले जाते. बारा एकरांत वर्षाला दीड लाख लिटरपर्यंत त्याचा वापर होतो.
 • सुमारे ५० टन नाडेप तर १५० टन कंपोस्ट खत निर्मिती

शेणाची उपलब्धता

 • पाच गायींचे संगोपन. त्यापासून १५ लिटर दूध मिळते. स्थानिक डेअरीकडे विक्री होते. त्याबरोबर विविध सेंद्रिय खत, गोबरगॅस निर्मितीसाठी शेणाची उपलब्धता होते.

पाण्याचे स्रोत
शेतीसाठी विहीर, बोअरवेल असे पाण्याचे स्त्रोत आहेत. शेती व्यवस्थापनासाठी चार पुरुष, सहा महिला यांची फार्मवर राहण्याची सोय केली आहे. एक ‘फार्म मॅनेजर’ देखील नियुक्त केला आहे. नागपूरपासून फार्मचे अंतर सुमारे २५ किलोमीटर आहे. संपूर्ण १२ एकरांला ‘ड्रीप ॲटोमेशन’ केले आहे.

सेंद्रिय मालाला शोधली बाजारपेठ

 • नागरिकांत आरोग्याप्रति जागरूकता वाढली आहे. त्यामुळे सेंद्रिय मालाला मागणी वाढल्याचे निरीक्षण सुनील नोंदवितात. आपल्या दर्जेदार सेंद्रिय मालासाठी त्यांनी विशेष ग्राहक बाजारपेठ मिळवली आहे.
 • त्यांच्या मित्राची ‘मूर्ती फार्म’ नावाची डेअरी आहे. येथील दुधाचे नागपूर शहरात सुमारे २०० ग्राहक आहेत. येथील संकरित गायीचे दूध लिटरला ६७ रुपये तर देशी गायीचे दूध ९७ रुपये दराने विकले जाते.
 • दुधाचे हेच ग्राहक सुनील यांनी पटकावले. रोजच्या दुधाबरोबर मित्राच्या व स्वतःच्या फार्मवरील सेंद्रिय  भाजीपाला दररोज पुरवण्यास त्यांनी सुरवात केली आहे. त्याला चांगले यशही मिळाले आहे.
 • कळमेश्‍वर बायपास रस्त्याच्या बाजूला सुनील यांचा आयरीस फार्म आहे. तेथेही ‘काउंटर’ सुरू करून ग्राहकांना शेतमालाची थेट विक्री होते. रस्त्याला लागूनच हे केंद्र असल्याने ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभतो.
 • स्वतःच्या शेतातील मालाला बाजार समितीसह स्वतःचे विक्री केंद्र व दुधाचे ग्राहक अशा तिहेरी अंगाने सुनील यांनी बाजारपेठ मिळवून दिली आहे.
 • दुधाच्या ग्राहकांसाठी तयार केलेल्या ‘ॲप’च्या माध्यमातूनच भाजीपाल्याची मागणी नोंदविली जाते. त्यानुसार ताजा भाजीपाला पुरवण्यात येतो.

मिळतो अधिक दर
विशेष म्हणजे नियमित भाजीपाल्यापेक्षा सेंद्रिय भाजीपाल्याला किलोमागे किमान पाच रूपये दर अधिक मिळवण्यात सुनील यशस्वी झाले आहेत. सेंद्रिय भाजीपाल्याची चवही ग्राहकांना भुरळ घालते. त्यामुळे  मागणीत सातत्य राहते. दररोज एकूण मिळून दीड ते दोन हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.

पुरवठा पॅकिंगमधून
दोघा मित्रांच्या भागीदारीतून पॅकिंग व त्यावर ‘ब्रॅंडनेम’ आहे. त्याद्वारे भाजीपाला ग्राहकांपर्यंत पोचविला जातो. एकाच छताखाली कमी खर्चापासून ते अती खर्चाचे शेती मॉडेल शेतकऱ्यांना अनुभवता यावे, अशा प्रकारचे मॉडेल विकसित करण्याचा विचार त्यांनी केला. त्यानुसार त्यांनी सावंगी परिसरातील शिवारात ते अल्पावधीतच डेव्हल्प केले.

विकसित केले मॉडेल फार्म
सुनील यांनी आपल्या क्षेत्रापैकी थोड्या जागेत मॉडेल फार्म विकसित केले आहे. येथे पुढील बाबी पाहण्यास मिळतात. 

 • शेडनेट.
 • पॉलिहाउस मधील पीकपध्दती.
 • रेशीम शेती.
 • गांडूळ खतनिर्मिती 
 • ठिबक ऑटोमेशन
 • भाजीपाला उत्पादन.
 • स्फुरदयुक्त खत तसेच अझोला निर्मिती.
 • गोबरगॅस, त्यापासून स्वयंपाकासाठी इंधन, मिळणाऱ्या स्लरीचा शेतीत वापर. 

संपर्क :  सुनील कोंडे, ९६२३७५६९६३

 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
अवजार उद्योगाला अर्थसंकल्पात प्रोत्साहन...अवजार क्षेत्राबाबत अनेक महिन्यांपासून शासन...
दुग्ध व्यवसायासाठी हवा स्वतंत्र निधीगेल्या वर्षभरात दूध व्यवसाय मोठ्या संकटाला तोंड...
‘पोल्ट्री’च्या वाढीसाठी हवे ठोस सरकारी...दुष्काळी भागातील कोरडवाहू शेतकऱ्यांना उद्योजकतेची...
पीकसंरक्षणातील खर्च कमी करायला हवायवतवाळ जिल्ह्यात कीडनाशक विषबाधेची जी गंभीर घटना...
राज्याचाही पिकांना दीडपट हमीभाव?मुंबई : आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यातील...
केवळ विदर्भातच थंडीपुणे : हवेतील आर्द्रता कमी होऊ लागली आहे....
शेतीमाल मूल्यसाखळी मजबुतीसाठी ठोस धोरण...शेतीमालाचे उत्पादन, काढणीपश्चात तंत्रज्ञान आणि...
पारंपरिक उत्साहात शिवजयंती साजरीपुणे : संपूर्ण महाराष्ट्रासह देश-विदेशात अनेक...
माजी आमदार जयंत ससाणे यांचे निधन नगर  :  कॉंगेसचे जिल्हाध्यक्ष माजी...
मराठवाड्याच्या तहानेवर इस्रायली उपाय!७००-८०० मि.मी पाऊस पडणाऱ्या मराठवाड्यात...
जगणे सुसह्य करण्यासाठी जागे व्हाअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शेती,...
‘महामेष’ योजना ३४ जिल्ह्यांत राबविणार...औरंगाबाद : राजे यशवंतराव होळकर महामेष योजना...
शेतीतील यांत्रिकीकरणासाठी हवे शासनाचे...अकोला ः अाजच्या बदलत्या काळात शेती पद्धतीत...
मध्य प्रदेशात गारपीटग्रस्तांना हेक्टरी...नवी दिल्ली ः मध्य प्रदेश राज्यात नुकत्याच...
गारपीटग्रस्तांना भरीव मदतीचा प्रस्ताव...नागपूर ः गारपीटग्रस्तांना सरकारकडून जाहीर करण्यात...
शेतकरी कंपन्यांच्या धान्य खरेदीबाबत...पुणे : हमीभावाने धान्य खरेदीत शेतकरी उत्पादक...
महसूल मंडळातील सरासरी उत्पादकतेनुसार...परभणी : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन...
गारपीटग्रस्त क्षेत्र तीन लाख हेक्टरमुंबई : राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या...
राजधानी दिल्लीत शेती क्षेत्रावर आज...नवी दिल्ली : देशाला नवे कृषी धोरण देण्यासाठी...
‘कापूस ते कापड’पासून आता ‘पिकणे ते...नाशिक : राज्यातील कापसावर प्रक्रिया होऊन...