ग्रामस्वच्छता, जलसमृद्धीन सौंदर्य खुलवलेले ताडसोन्ना

अंगणच घराची कळा सांगते’ अशी खेड्यातील म्हण आहे. तसे गावाचे मोठेपण गावात गेल्यानंतर कळायला सुरवात होते.
पाण्याचे महत्त्व समजल्याने लोकसहभाग आणि संस्थेच्या मदतीतून नऊ किलोमीटर अंतराचे रुंदीकरण केलेल्या नदीत असे पाणी साठले आहे.
पाण्याचे महत्त्व समजल्याने लोकसहभाग आणि संस्थेच्या मदतीतून नऊ किलोमीटर अंतराचे रुंदीकरण केलेल्या नदीत असे पाणी साठले आहे.

एकोपा, सलोखा ठेवला व विकासाचे ध्येय ठेवून कामे केली तर कोणतेही गाव विकासात पुढे जातेच. शिवाय स्वच्छता, शांतता, वृक्षारोपण आणि जलसमृद्धी येऊ शकते हे ताडसोन्ना (ता. जि. बीड) गावाने दाखवून दिले आहे. जलसमृद्धीत गावाने आघाडी घेतली आहे. गावाचा लोकसभाग पाहून ‘नाम’ संस्थेच्या पुढाकाराने गावातील नऊ किलोमीटर अंतराचे नदी रुंदीकरण आणि सहा बंधाऱ्यांची कामे झाली आहेत . बीड-परळी राज्यमार्गापासून दहा किलोमीटर अंतरावर उत्तरेकडे ताडसोन्ना हे पाच हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावाचे वैशिष्ट्य म्हणजे इथल्या ग्रामस्थांनी विकासाचे ध्येय ठेवून एकजुटीने कामांना सुरवात केली. त्याची फळे आता दिसू लागली आहेत. गावची मागील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली. सरपंचपदी द्रोपदी सोमनाथ माने; तर उपसरपंचपदी दैवशाला भगवान मुंडे यांची निवड झाली. गावाचा कारभार हाती घेतलेल्या या महिलांनी गावाला सर्वच बाबतींत पुढे नेण्याचा चंग बांधला. राज्यातील गावातील प्रमुख रस्त्यांवर विविध प्रकारच्या सुंदर वृक्षांमुळे गावातील हवा खेळती आहे. सुंदर रस्ते आणि बगीचा  ग्रामपंचायतीपासूनचे मुख्य रस्ते पेव्हर ब्लॉकने बनवले असून अंतर्गत रस्ते सिमेंटचे दर्जेदार आहेत. गल्लीबोळांतही चांगले रस्ते आहेत हे विशेष. मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा वड, पिंपर, नारळ, लिंब, सप्तपर्णी, चिंच, वड, अांबा अशा विविध वृक्षांची लागवड केली आहे; तर जिल्हा परिषदेच्या शाळेच्या बाहेरून दोन्ही बाजूंनी सुंदर बगीचा फुलवला आहे. त्याची देखभाल करण्यासाठी स्वतंत्र व्यक्ती नेमली आहे. यातूनच गावाचे सौंदर्य फुललेले दिसून येते. सुपीक शेती असल्याने गाव सधन आहे. स्वच्छतागृहांची उभारणी गावातील प्रत्येक घरामध्ये स्वच्छतागृहाची उभारणी झाली आहे. मुख्य रस्त्यांवरील कचराही नियमित साफ केला जातो. त्यासाठी कचराकुंड्याही उभारल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे अाहेत. त्यांचा नियमित वापर होतो. विविध पुरस्कारांनी सन्मान गावातील तंटा हा वेशीच्या आतच मिटल्याने पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली जाण्याचे प्रकार तसे नाहीच म्हणायला हवेत. शासनाने स्वच्छता आणि तंटामुक्तीची दखल घेतली. त्यातूनच विविध पुरस्कार गावाला मिळाले. तालुका स्तरावरील ‘संत गाडगेबाबा स्वच्छता पुरस्कार’; तर जिल्हा स्तरावरील हेच पुरस्कार दोनदा गावाने पटकावले. तंटामुक्तीच्या पुरस्कारावरही गावाने मोहर उमटवली आहे. आरोग्य केंद्र आणि डिजिटल शाळा आरोग्य केंद्राच्या इमारतीची विशिष्ट पद्धतीने उभारणी केल्याने दिवसा वीज वापरण्याची गरज भासत नाही. अगदी उन्हाळ्यातही आतमध्ये थंडावा जाणवतो. प्राथमिक आरोग्य केंद्राची सुविधा आहेच; शिवाय शस्त्रक्रियागृह जिल्ह्यात सर्वात सुसज्ज अाहे. प्रसूती, कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रिया नियमित होतात. चांगली सेवा मिळत असल्याने आरोग्य केंद्र नेहमी गजबलेले असते. दाखल झालेले रुग्ण आणि नातेवाइकांसाठी टीव्ही संच पाहण्याची सोय आहे. शाळा २० खोल्यांची असून, प्रयोगशाळेने सुसज्ज आहे. विद्यार्थी संगणकाचे धडे येथे गिरवतात. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व अांतरराष्ट्रीय पातळीवरील घडमोडींची माहिती देण्यासाठी ‘प्रोजेक्टर’ची व्यवस्था आहे. गावात तीन अंगणवाड्या असून त्या सर्व ‘डिजिटल’ आहेत. माफक दरात स्वच्छ पाणी गावकऱ्यांना स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी गावात ‘फिल्टर प्लँट’ उभारला आहे. यासाठी प्रत्येक घरी ‘रिचार्ज कार्ड’ दिले असून त्याद्वारे ‘रिचार्ज’ करून आपल्याला हव्या तेवढ्या पैशांचे पाणी घेता येते. ‘नाम’चा ‘हात’ आणि जलसंधारणाची कामे गावाचा एकोपा आणि लोकसहभाग पाहून ‘नाम’ संस्थेने गावाला मदतीचा हात दिला. ‘नाम’ने फिल्टर प्लँट तर दिलाच; शिवाय लोकसहभाग आणि ‘नाम’च्या मदतीने नऊ किलोमीटर अंतराचे नदी खोली व रुंदीकरण करण्यात आले. सहा बंधाऱ्यांचे पुनरुज्जीवन केल्याने पावसाळ्यात बंधारे आणि नदी हे स्रोत पाण्याने तुडुंब भरले आहेत. खोलीकरणामुळे इतर जलस्रोतांचे पाणीही वाढले आहे. सौरऊर्जेचे उमजले महत्त्व ताडसोन्नेकरांना सौरऊर्जेचे महत्त्व पटल्याने आरोग्य केंद्र परिसर; तसेच गावातील प्रमुख चौकांत मिळून ४२ सौरदिवे बसवले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी सौरप्रकाशाने हा परिसर झळाळून जातो; तसेच गावातील एक पाणी योजनेचा वीजपंपही सौरऊर्जेवर चालतो. कर्तृत्ववान व्यक्तींचे गाव सर्वच बाबतींत समृद्ध झालेल्या या गावातील व्यक्तीही कर्तृत्ववान अाहेत. तालुक्यापासून राज्यपातळीवर त्यांनी आपली अोळख तयार केली आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील धडाकेबाज अधिकारी असलेले तुकाराम मुंढे याच गावचे असून त्यांचे बंधू अशोक मुंढे देखील उपजिल्हाधिकारी आहेत. गावच्या माहेरवाशीण जयश्री मस्के जिल्हा परिषदेच्या सदस्या तर गावातील सोमनाथ माने यांनीही पंचायत समितीचे उपसभापती म्हणून काम केले. सुनील मानेंसह अनेकांनी बीडमध्ये व्यापारात चांगले नाव कमावले आहे. संपर्क : सोमनाथ माने, ९८६०७२८६७४ संपर्क : सुनील माने, ९८५०११९७९०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com