दक्षिण आफ्रिकेतील स्टेल्लेनबाऊच विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ कॉर्नेली मिन्नार यांनी कीटकां
ताज्या घडामोडी
सद्यस्थितीत वांगी पिकात पर्णगुच्छ, फळसड, पानावरील करपा आदी रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसेच शेंडे व फळे पोखरणारी अळी या कीडीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे त्वरित त्यासंबंधी उपाययोजना कराव्यात.
सद्यस्थितीत वांगी पिकात पर्णगुच्छ, फळसड, पानावरील करपा आदी रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसेच शेंडे व फळे पोखरणारी अळी या कीडीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे त्वरित त्यासंबंधी उपाययोजना कराव्यात.
वांगी पिकातील पर्णगुच्छ रोग.
प्रसार : तुडतुड्यांमार्फत होतो.
लक्षणे : रोगग्रस्त झाडांची वाढ खुंटते. पाने लहान आकाराची, मऊ पातळ व पिवळसर गुच्छासारखी झालेली दिसतात. अशा झाडांना फुले लागत नाहीत.
नियंत्रण :
वांगी कुळातील तणांचा नाश करावा.
पुनर्लागवडीनंतर ३० दिवसांपासून दर १५ - २० दिवसांच्या अंतराने टेट्रासायक्लिन *१ - १.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.
लागवडीनंतर दर आठ ते दहा दिवसांच्या अंतराने निंबोळी अर्क ४ टक्के (अॅझाडिरॅक्टीन ४,००० पीपीएम ४ मि.लि. प्रतिलिटर पाणी) याप्रमाणात फवारणी करावी.
पानांवरील करपा व फळसड :
रोगकारक बुरशी : फेमॉप्सीन व्हेक्झान्स
प्रादुर्भावाचे ठिकाण : पाने व फळे
लक्षणे : करड्या ते तपकिरी रंगाचे गोलाकार ते लंबाकृती डाग पान व फळांवर दिसतात. फळे सडतात.
नियंत्रण :
फवारणी प्रतिलिटर पाणी
कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा
मॅंकोझेब २.५ ग्रॅम
वेळ : रोगाची लक्षणे दिसताच
कीडनियंत्रण :
शेंडे व फळ पोखरणारी अळी :
एकात्मिक कीड नियंत्रण :
कीडग्रस्त शेंडे दर आठवड्यास खुडून नष्ट करावेत.
कीडग्रस्त फळे जमिनीत गाडून टाकावीत.
ल्युसील्युर कामगंध सापळे (प्रतिहेक्टरी १००)वापरावेत. त्यातील ल्युर दोन महिन्यांनी बदलावा.
अधून- मधून ४ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
रासायनिक नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर पाणी
क्विनॉलफॉस (२५ टक्के) २ मि.लि. किंवा
इमामेक्टीन बेंझोएट (५ एस.जी.) ०.४ ग्रॅम किंवा
क्लोरअॅन्ट्रानीलीप्रोल (१८.५ एस.सी.) ०.४ मि.लि.
संपर्क : डाॅ. एम. एन. भालेकर, ०२४२६- २४३३४२
(अखिल भारतीय समन्वयित संशाेधन प्रकल्प, भाजीपाला पिके, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)
- 1 of 351
- ››