Agriculture agrimarket cereals | Agrowon

कडधान्यांमध्ये यंदाही तेजीची शक्यता कमी
मनोज कापडे
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

``यंदाही गेल्या हंगामाप्रमाणेच कडधान्याची स्थिती राहील. बाजारपेठेत शेतकऱ्यांना खूप चांगले भाव मिळतील अशी सध्याची तरी स्थिती नाही.,``

पुणे  : देशातील कडधान्यांचा एकूण पेरा, डाळींचा स्टॉक आणि विदेशी बाजारातील घडामोडी विचारात घेता कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना यंदादेखील चांगला भाव मिळण्याची शक्यता कमी आहे, असा अंदाज इंडियन मर्चंट चेंबरचे संचालक जी. चंद्रशेखर यांनी व्यक्त केला. 

राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या यंदा कडधान्य खरेदीसाठी तयारी करीत आहेत. त्यासाठी `महाएफएफसी`ने नाफेड, इंडियन मर्चंट चेंबर, बॅंका तसेच खरेदी साखळीतील प्रतिनिधींसमवेत बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी चंद्रशेखर बोलत होते. ``मराठवाडा, विदर्भासह केरळ, कर्नाटक, पश्चिम उत्तर प्रदेशात दुष्काळी स्थिती आहे.

मध्य प्रदेशातदेखील फारसे चांगले चित्र नाही. कडधान्याचा पेरा गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा ३ लाख हेक्टरने कमी आहे. उडीद, मुगाचा पेरा यंदा वाढला आहे. मात्र, देशात तुरीचे उत्पादन कमी राहील. कारण, यंदा पेरा ५० लाख हेक्टरवरून ४० लाख हेक्टरवर आला आहे,`` असे चंद्रशेखर म्हणाले. ``यंदाही गेल्या हंगामाप्रमाणेच कडधान्याची स्थिती राहील. बाजारपेठेत शेतकऱ्यांना खूप चांगले भाव मिळतील अशी सध्याची तरी स्थिती नाही.,`` असे चंद्रशेखर यांनी स्पष्ट केले.

नाफेड`चे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार चढ्ढा म्हणाले की, शेतमाल खरेदीत राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी उत्पादक कंपन्यांनी अधिकार मिळवल्यास कंपन्यांना कमिशन वाढून मिळेल. कंपन्यांची खरेदी क्षमता वाढेल. या कंपन्यांनी खरेदी केलेल्या कडधान्यावर प्रक्रिया केल्यास डाळींची खरेदीदेखील `नाफेड`कडून केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

इतर ताज्या घडामोडी
सांगलीतील ९० टक्के द्राक्ष हंगाम उरकलासांगली : जिल्ह्यातील यंदाचा द्राक्ष हंगाम ९०...
फरारी द्राक्ष व्यापाऱ्यास शेतकऱ्यांनी...नाशिक  ः चालू वर्षाच्या हंगामात जिल्ह्यातील...
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील प्रचार...औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील...
सध्याचे सरकार म्हणजे लबाडाचे आवतन : पवारनगर : सध्याचे केंद्र सरकार म्हणजे लबाडाचे आवतन...
सिंचनाच्या पाण्याचे मोजमाप करण्याच्या...शेतीमध्ये पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून,...
परभणीत वांगी प्रतिक्विंटल १००० ते २५००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
मतदान केंद्रावरील रांगेपेक्षा...सोलापूर  : सोलापूर लोकसभा मतदारसंघात सर्वत्र...
अवकाळीचा सोलापूर जिल्ह्याला मोठा फटकासोलापूर : जिल्ह्याला गेल्या चार महिन्यांत अधून-...
मंठा तालुक्यात वादळी वाऱ्याने नुकसानमंठा, जि. जालना  : तालुक्यात मंगळवारी ( ता....
पुणे विभागातील दोन लाख हेक्टरवरील ऊस...पुणे  ः गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पुणे...
मराठवाड्यातील मतदान टक्केवारीत किंचित घटबीड, परभणी : मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद,...
सातारा जिल्‍ह्यातील ऊस उत्पादकांना...सातारा  ः जिल्ह्यातील सह्याद्री कारखान्याचा...
म्हैसाळ योजनेत २२ पंपांद्वारे उपसासांगली : म्हैसाळ योजनेच्या पंपांची संख्या विक्रमी...
दिग्गजांच्या सभांनी तापणार साताऱ्यातील...सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातील राजकीय...
प्रभावी अपक्ष उमेदवारांमुळे लढती रंगतदारमुंबई : राज्यात तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील २१...
राज्यात काकडी प्रतिक्विंटल ४००ते २०००...नाशिकला काकडी प्रतिक्विंटल १२५० ते १७५० रुपये...
धनगर समाज भाजपच्याच पाठीशी ः महादेव...सांगली  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच...
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...