‘बकरी ईद’चे उद्दिष्ट ठेवून बोकड संगोपन, विक्री व्यवसाय

प्रतिक घुले यांचे बोकडपालन
प्रतिक घुले यांचे बोकडपालन

बकरी ईदच्या सणाचे उद्दिष्ट ठेवत पुणे जिल्ह्यातील बोतार्डे येथील प्रतीक घुले यांनी केवळ बोकड संगोपन व विक्री व्यवसायावर भर दिला आहे. खाद्य, शेडमधील सुविधा, व्यवसायातील बारकावे यांच्या आधारे सुमारे ७५ बाेकडांचे १० महिने संगाेपन त्यांनी केले. त्यातून आश्वासक उत्पन्न मिळवत या व्यवसायाला चांगले भवितव्य असल्याच्या आशा त्यांनी निर्माण केल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील बाेतार्डे (ता. जुन्नर) येथील प्रतीक घुले यांची दोन एकर शेती आहे. त्यांचा ‘ट्रान्सपोर्ट’चा व्यवसायही आहे. दोन्ही बाबी सांभाळून त्यांनी बोकड संगोपन व विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. त्याआधी पूरक म्हणून पाेल्ट्री व्यवसाय सुरू केला. मात्र, बर्ड फ्लू आणि काेंबड्यांच्या अन्य आजारांमुळे व्यवसायात म्हणावे असे उत्पन्न मिळत नव्हते. अधिक अभ्यासातून त्यांना बाेकडपालनाचा व्यवसायाचा पर्याय मिळाला. व्यवसायाचा अभ्यास घुले यांनी परिसरातील शेळीपालनाबराेबरच जिल्ह्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांचाही अत्याधुनिक प्रकल्प पाहिला. त्यानंतर व्यवसायाची आखणी केली. लहान वयाचे बोकड विकत आणायचे, ते वाढवायचे व बकरी ईददरम्यान विकायचे, असे व्यवसायाचे स्वरूप निश्चित केले.

  • शेडचे क्षेत्रफळ- ५० बाय २५ बाय फूट
  • शेडनजीक मुक्त जागा- ५० बाय ३० फूट
  • शेडमध्ये १७ बाय २३ फुटांचे तीन वेगवेगळे विभाग
  • प्रत्येक विभागात पाण्याची व्यवस्था आणि चारा खाण्यासाठी गव्हाण
  • खरेदी

  • आॅक्टाेबरच्या सुमारास राजस्थानातील अजमेर, मांडा परिसरातील बाजारांमधून खरेदी (सोजत व सिरोही)
  • पिलाचे सरासरी वय आठ महिने, वजन २५ किलाे
  • खरेदी दर- प्रतिकिलाे साधारण ३०० रुपये
  • सुरुवातीला ७५ लहान बोकड आणले.
  • वाहतूक खर्च सुमारे ३२ हजार रुपये
  • एकूण खर्च -सुमारे साडेसहा लाख रु.
  • व्यवस्थापन

  • बोकडांची मरतूक होऊ नये म्हणून लसीकरण करावे लागते. त्यासाठी अडीच हजार रुपये, १२०० रुपये अौषधे, भूकवाढ आणि जंतनाशक आैषधे एक हजार रुपये आणि किरकाेळ आैषधे असा महिन्याचा खर्च असतो.
  • खाद्य व्यवस्थापन

  • सकाळ - संध्याकाळी गहू, मका, बाजरीचे मिश्र खाद्य ५० किलाे
  • सुका चारा राजस्थानातून खरेदी करण्यात येतो. मका, कडबा, हिरवा चारा यांचीही गरज.
  • महिन्याला खाद्यासाठी सुमारे ६० हजार रुपये खर्च.
  • एक मजूर तैनात. त्याला प्रतिमहिना साडेसात हजार रुपये मेहनताना.
  • निराेगी बाेकडांसाठी काळजी बाेकडांना निराेगी ठेवण्यासाठी सकस आहाराबराेबर नियमित आराेग्य तपासणी बराेबरच आैषधाेपचार या बाबी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे प्रतीक यांनी सांगितले. कारण मरतूक होणे म्हणजे मोठे नुकसान असते. प्रत्येक बाेकडाच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवावे लागते. बाेकडांना ताप, सर्दी किंवा अन्य आजार झाल्यास त्यांचा आहार कमी हाेताे. त्यामुळे वजन झपाट्याने घटते. ते पुन्हा वाढविण्यासाठी आैषधाेपचाराबराेबर खाद्यावर जास्त खर्च हाेताे. यासाठी बाेकड आजारी पडू नये यासाठी विशेष लक्ष ठेवावे लागते, असे प्रतीक यांनी सांगितले. व्यवसायातील अर्थकारण एका महिन्यात साधारण वजन ३ ते ५ किलाेपर्यंत होणे गरजेचे असते. याप्रमाणे १८ महिन्यांपर्यंत सरासरी ७० किलाेपर्यंत वजन होईल, असे नियाेजन करण्यात येते. या बोकडाची विक्री किलोला ३६० रुपये दराने मागील वर्षी केली. यंदाही हाच दर मिळतो आहे. साधारण प्रतिबाेकडाला २५ हजार रुपये मिळतात. वर्षभरात एकूण बोकडांच्या विक्रीतून मागील वर्षी अठरा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यातून खर्च वजा जाता चार लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळाले. साधारण हे उत्पन्न १० महिने कालावधीतील अाहे. एकूण १८ महिन्यांच्या काळापैकी बोकड खरेदी करते वेळी त्याला आठ महिने पूर्ण झालेले असतात. विक्री नियोजन यंदा जागेवरच विक्रीचे नियाेजन आहे. मुंबई, कल्याण आणि पुणे (काेंढवा) परिसरातून व्यापारी खरेदीसाठी येतात. थेट बाजारात ४०० रुपये प्रतिकिलाेपर्यंत दर मिळताे. व्यापारी आमच्याकडून खरेदी करून पुढे अधिक नफा कमावतात. त्यापेक्षा पुढील वर्षी थेट बाजारात विक्री करण्याचे नियाेजन असल्याचे प्रतीक म्हणाले. लेंडी खतातून पूरक उत्पन्न दहा महिन्याच्या काळात सुमारे १० ट्राॅली लेंडीखत उपलब्ध हाेते. प्रतिट्राॅली साडेतीन हजार रुपयांप्रमाणे त्यातून ३५ हजार रुपयांचे उत्पन्न वर्षाला मिळते. कर्जाची परतफेड बाेकड खरेदीसाठी विविध कार्यकारी सहकारी विकास साेसायटीतून सहा लाख रुपयांचे कर्ज पाच वर्षांच्या दीर्घमुदतीवर काढण्यात आले होते. गेल्या वर्षीच्या बाेकड विक्रीतील उत्पन्नातून त्यातील निम्म्या रकमेची परतफेड करण्यात आली आहे. यंदाच्या विक्रीतून मुदतीपूर्वीच कर्जाची रक्कम पूर्ण भरण्याचे नियाेजन आहे. भांडवल व खर्च गेल्या वर्षी पहिलीच बॅच असल्याने आणि अनुभव कमी असल्याने खाद्यावर जास्त खर्च झाला. जास्त वजनासाठी जास्त खाद्य दिले. मात्र, १८ महिने वयाच्या बोकडाचे सरासरी वजन ७० किलाेच मिळाले. मात्र, खाद्य जास्त वाया गेले. यामुळे यंदा संतुलित आहारातून खाद्याची बचत केली. यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत हा खर्च १५ टक्के कमी झाला. या व्यवसायात जनावरे खरेदीसाठी साडेसहा लाख रुपये, शेड बांधणी तीन लाख रुपये व खाद्य व अन्य खर्च सुमारे ६० हजार आल्याचे प्रतीक म्हणाले. संपर्क-प्रतीक घुले- ९०७५७०६९११v

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com