agriculture article in marathi, artificial insemination for Buffalo breeding | Agrowon

म्हैसपालनामध्ये उत्तम वंशावळीसाठी कृत्रिम रेतन
डॉ. एम. व्ही. इंगवले
बुधवार, 28 मार्च 2018

फायदेशीर म्हैसपालनामध्ये उत्तम वंशावळीच्या म्हशींच्या प्रजातीचे संगोपन अाणि दीड वर्षाला एक वेत मिळणे आवश्‍यक आहे. म्हशीपासून जास्तीत जास्त वेत मिळाल्यास जास्त दुग्धोत्पादन होते व उत्तम पिढी तयार होते. म्हशीच्या किमती बाजारामध्ये वाढतच अाहेत, येत्या काळात जातिवंत म्हशीची किंमत जास्तच राहील व जातिवंत म्हैस मिळेल, ही शक्‍यता कमी होईल. कारण बहुतांश म्हैसपालक प्रामुख्याने शहराजवळील म्हैसपालक फक्त दुधासाठी म्हशीचे संगोपन करतात. 

फायदेशीर म्हैसपालनामध्ये उत्तम वंशावळीच्या म्हशींच्या प्रजातीचे संगोपन अाणि दीड वर्षाला एक वेत मिळणे आवश्‍यक आहे. म्हशीपासून जास्तीत जास्त वेत मिळाल्यास जास्त दुग्धोत्पादन होते व उत्तम पिढी तयार होते. म्हशीच्या किमती बाजारामध्ये वाढतच अाहेत, येत्या काळात जातिवंत म्हशीची किंमत जास्तच राहील व जातिवंत म्हैस मिळेल, ही शक्‍यता कमी होईल. कारण बहुतांश म्हैसपालक प्रामुख्याने शहराजवळील म्हैसपालक फक्त दुधासाठी म्हशीचे संगोपन करतात. 

म्हैस अाटल्यानंतर नवीन म्हैस खरेदी करतात. त्यामुळे म्हशी गाभण राहण्याचे प्रमाण कमी होते.व्यायलेल्या म्हशींच्या नवजात रेडकांना सहसा विकले जाते. यामुळे नवीन पारड्या तयार होण्याचे प्रमाण अत्यल्प असून, बाजारामध्ये म्हशीच्या कमी संख्येमुळे तुटवडा निर्माण होत आहे. यामुळे म्हैसपालकांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो. कारण नवीन म्हैस तयार होण्याकरिता जवळपास साडेतीन ते चार वर्षे लागतात व संगोपन खर्च होतो, असा समज आहे; परंतु नवीन उत्तम पिढीही तयार करणे आवश्‍यक आहे. कारण म्हाताऱ्या, आजारी, प्रजननक्षमता कमी असणाऱ्या म्हशी विकून नवीन म्हशी घ्याव्या लागतात. बाजारातील सरासरी किंमत बघता नवीन म्हैस जवळपास ४० हजार व त्याहून अधिक दराने मिळते.

पैदाशीकरिता कृत्रिम रेतनाचा वापर

 •    म्हैसपालनामध्ये पैदाशीकरिता कृत्रिम रेतनाचा वापर कमी आहे. बहुतांश नर रेडके विकली जातात; कारण त्यांना दूध पाजावे लागते व किंमत मिळत नाही. 
 •    मादी रेडकापासून म्हैस होण्याकरिता अधिक कालावधी व संगोपन खर्चामुळे रेडकांची विक्री केली जाते. 
 •    उत्तम वंशावळीकरिता प्रत्येक वेताला मादी रेडके तयार झाल्यास प्रत्येक म्हशीपासून चार किंवा अधिक म्हशी तयार होऊन जास्त फायदा मिळेल.
 •    प्रत्येक वेताला मादी वासरे तयार होणाऱ्या लिंगवर्गीकृत कृत्रिम रेतनाच्या वीर्यकांड्या उपलब्ध झाल्या असून, यामुळे अधिक मादी वासरे व दुग्धोत्पादन वाढून आर्थिक फायदा होईल. 
 •    पशुवैद्यकीय क्षेत्रातील हे नवीन अद्ययावत तंत्रज्ञान पूर्वी अमेरिका, ब्राझील इत्यादी प्रगत देशांमध्ये उपलब्ध होते. परंतु अाता कृत्रिम रेतनाच्या वीर्यकांड्या महाराष्ट्रामध्येही उपलब्ध आहेत.
 •    म्हशीच्या प्रजातीमध्ये मुऱ्हा या म्हशीच्या लिंगवर्गीकृत वीर्यकांड्या उपलब्ध असून, यांची किंमत १२०० ते १५०० प्रती वीर्यकांडी इतकी आहे. 
 •    मुऱ्हा प्रजातीच्या पैदाशीकरिता व गावठी म्हशीमध्ये वीर्यकांड्याचा वापर चांगली नवीन पिढी व कमी कालावधीमध्ये तयार होईल व दुग्धोत्पादनात वाढ होईल.  

लिंगवर्गीकृत कृत्रिम रेतनाचे फायदे 

 •    तंत्रज्ञानामध्ये रेड्याच्या वीर्यामधील X व Y गुणसूत्रे असणारे शुक्राणू हे वेगळे केले जातात. X गुणसूत्रे असणाऱ्या शुक्राणूच्या वीर्यकांडीद्वारे कृत्रिम रेतन केल्यामुळे फक्त मादी रेडकू जन्माला येते.
 •    कृत्रिम रेतनामध्ये गाभण राहण्याचे प्रमाण ३० ते ४० टक्के असून, प्रथम गाभण राहणाऱ्या पारड्यांमध्ये हे प्रमाण अधिक आहे.
 •    कृत्रिम रेतनाच्या वापरामुळे नर रेडके तयार होत नसल्यामुळे प्रत्येक म्हशीपासून चार व अधिक मादी रेडके तयार होतील. यामुळे कमी कालावधीमध्ये अधिक प्रमाणात उत्तम वंशावळीच्या म्हशी तयार होतील. त्यामुळे पुढील काळात दुग्धोत्पादन वाढीला चालना मिळेल.
 •    सदर वीर्यकांडीचा वापर केल्यास ९९ टक्के मादी रेडकू होण्याचे प्रमाण आहे.
 •    गाभण म्हशींना विकताना जास्तीची किंमत मिळू शकेल.

 ः डॉ. एम. व्ही. इंगवले, ९४०५३७२१४२
(स्नातकोतर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला.)

इतर कृषिपूरक
उसाच्या वाढ्याची पौष्टिकता वाढवाजनावरांच्या आहारात सतत वाढ्याचा समावेश केल्यामुळे...
पशू आजारांवर प्राथमिक उपचारासाठी औषधी...जनावरांच्या आजारामुळे मिळणाऱ्या कमी उत्पादनामुळे...
मुक्त संचार गोठ्यामध्ये गव्हाण,...मुक्त संचार गोठ्यात कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता...
शस्त्रक्रियेमुळे बरी होते जनावरांतील...आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही शेतीची बरीचशी कामे...
गोठ्याचे कुंपण, बांधकामावर नको जास्त...गोठा बांधकामाचे नियोजन करताना लोखंडी वस्तू...
जनावरांच्या चांगल्या आरोग्यासाठी कमी...कमी खर्चाचा मुक्त संचार गोठा करताना आपल्याकडे...
रेशीम कीटक संगोपनगृहात राखा योग्य...थंडीमध्ये वाढ झाल्यामुळे रेशीम कीटकांच्या...
प्लॅस्टिक खाल्ल्यामुळे जनावरावर होणारे...प्लॅस्टिक खाल्ल्यामुळे जनावर चारा खात नाही व पाणी...
दूध उत्पादन वाढीसाठी उपयुक्त बायपास...प्रथिनांचा आहारात योग्य प्रमाणात वापर केला तर...
दुधाळ गाईची काळजी, व्यवस्थापनगाभण आणि प्रसूती काळात गायीच्या शरिरातील ऊर्जा...
मुक्त संचार कुक्कुटपालनासाठी उपयुक्त :...सर्व प्रकारच्या वातावरणात सहजरीत्या वाढू शकणाऱ्या...
कोंबड्यांसाठी संतुलित खाद्यनिर्मिती...पक्ष्यांना खाद्य देण्यापूर्वी कोणत्या प्रकारचे...
पशू सल्लाशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य...
जनावरांसाठी पाैष्टिक मुरघासज्या ठिकाणी हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे...
वासरांच्या आहारातील चिकाचे महत्त्वहिवाळ्यामध्ये गायी- म्हशी विण्याचे प्रमाण जास्त...
जनावारांतील विषबाधा कारणे, लक्षणे, उपायविषबाधेमुळे जनावरांच्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ...
पशुसल्लासध्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी-जास्त...
कासदाह आजाराची लक्षणे, प्रतिबंध, उपचारदेशी गाईंच्या तुलनेने संकरित गाईंमध्ये पहिल्या...
कोंबड्यांच्या आहार, लिटर व्यवस्थापनात...कमी तापमानात कोंबड्यांची योग्य प्रकारे काळजी न...
गाभण जनावरे, नवजात वासरांना जपागाभण काळात जनावरांची काळजी घेतल्यास जनावराचे...