agriculture Egg rate increased due to cold, Maharashtra | Agrowon

थंडीमुळे अंड्याच्या दरात सुधारणा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 26 डिसेंबर 2018

अमरावती ः थंडीमुळे मागणी वाढल्याने अंड्याच्या दरात तेजीचा अनुभव येत आहे. कधी काळी १०० रुपये प्रतिक्रेट असलेली अंडी थंडीमुळे १३५ ते १३७ रुपये प्रतिक्रेट विकल्या जात असल्याची माहिती अंड्याचे घाऊक व्यापारी हिमांशू ठाकूर यांनी दिली. 

अमरावती ः थंडीमुळे मागणी वाढल्याने अंड्याच्या दरात तेजीचा अनुभव येत आहे. कधी काळी १०० रुपये प्रतिक्रेट असलेली अंडी थंडीमुळे १३५ ते १३७ रुपये प्रतिक्रेट विकल्या जात असल्याची माहिती अंड्याचे घाऊक व्यापारी हिमांशू ठाकूर यांनी दिली. 

विदर्भात तापमानात घट होत थंडी वाढीस लागली आहे. परिणामी अंड्यांना मागणी वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. अमरावती जिल्ह्यात आजच्या घडीला दरदिवशी सुमारे दहा लाख अंडी खवय्यांकडून फस्त केली जात असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. अंड्यांना मागणी वाढल्याचे परिणामी त्याचे दरही वाढले आहेत. सध्या एका क्रेट अंड्यासाठी १३५ ते १३७ रुपये मोजावे लागत आहेत.

एका क्रेटमध्ये ३० अंडी राहतात. थंडीच्या काळात हेच दर राहतील, असा अंदाज असून फेब्रुवारीनंतर तापमानात जसजशी वाढ होईल तसे दरही कमी होतील. फेब्रुवारीनंतर प्रतिक्रेट १०० ते ११० रुपये असे दर राहण्याचा अंदाजही हिमांशू ठाकूर यांनी व्यक्‍त केला. प्रथिनेयुक्‍त अंडी ही हिवाळ्यात शरीरासाठी पोषक राहतात. ही बाब लक्षात घेता खवय्यांकडून अंड्यांना मागणी वाढली आहे. 

एका वर्षात २३० अंडी
एका कोंबडीचे आयुष्य सरासरी दीड वर्षाचे राहते. एका वर्षात कोंबडी सरासरी २३० अंडी देते. यातील १६० अंडी ही खाण्याजोगी राहतात. लेयरच्या माध्यमातून ही अंडी तयार होतात. एका वर्षानंतर अंडी देणारी (लेयर) कोंबडी ही कटाईसाठी पाठविली जाते, असे विक्रेत्याने सांगितले.

इतर बाजारभाव बातम्या
सोलापुरात हिरवी मिरची, टोमॅटोच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कळमणा बाजार समितीत हरभरा ४१०० रुपयांवरनागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत हरभरा वगळता...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत हिरवी मिरची ३८०० ते ४०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
मंचरला कांद्याच्या भावात घसरणमंचर, जि. पुणे : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर...
रत्नागिरीत टॉमेटो प्रतिक्विंटल ३००० ते...रत्नागिरी ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३५२५ रुपये...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक आणि दरात...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
अमरावती बाजारात भुईमूग शेंगांचे दर आणि...अमरावती ः स्थानिक बाजार समितीत नव्या भुईमूग...
सोलापुरात वांगी, टोमॅटो, हिरवी मिरची...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
टोमॅटो, हिरवी मिरचीची आवक कमी; दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत गवार १५०० ते ५००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भुईमूग शेंगा प्रतिक्विंटल ३०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात कांदा प्रतिक्विंटल ३०० ते १७००...औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल ३०० ते १४०० रुपये...
चोपडा, अमळनेर बाजार समित्यांमध्ये...जळगाव ः देशी व काबुली प्रकारच्या हरभऱ्याचे दर...
जळगावात लाल कांद्याच्या दरांवर पुन्हा...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
अमरावतीत भुईमूग प्रतिक्‍विंटल ५२००...अमरावती ः स्थानिक बाजार समितीत हंगामातील नव्या...
कोल्हापुरात टोमॅटोच्या दरात वाढकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
सोलापुरात मेथी, शेपूचे दर पुन्हा...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...