Agriculture, Integrated management of snails | Agrowon

शेंबी, शंखी गोगलगायींचे एकात्मिक व्यवस्थापन
डॉ. संजय पाटील
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

ढगाळ हवामान व रिमझिम पावसामुळे उन्हाळ्यात सुप्तावस्थेत गेलेल्या गोगलगायी जागृत अवस्थेत येऊन पिकांवर प्रादुर्भाव करीत आहेत.

जून अखेर ते जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसाने काही भागांत पेरण्यासुद्धा पूर्ण झाल्या. त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात उघडीप झाली. ढगाळ हवामान व रिमझिम पावसामुळे उन्हाळ्यात सुप्तावस्थेत गेलेल्या गोगलगायी जागृत अवस्थेत येऊन पिकांवर प्रादुर्भाव करीत आहेत. असा गोगलगायींचा प्रादुर्भाव नाशिक, पुणे, नगर, लातूर जिल्ह्यातील भाजीपाला, सोयाबीन, भुईमूग यासारख्या पिकांमध्ये दिसून येत आहे. 

नुकसानीचा प्रकार ः

 •     बाल्यावस्था व प्रौढावस्था पिकास हानिकारक आहे. गोगलगायी भाजीपाला व इतर पिकांच्या रोपांची खोड कुरडतात, रोपे कोलमडतात.
 •     वाढीच्या अवस्थेतील पिकांची पाने कुरतडून खातात. गोगलगायी बांधाच्या कडेने नुकसान सुरू करतात. 
 •     गोगलगायी मुख्यतः दिवसा लपून बसतात. रात्री पिकाला नुकसान पोचवितात. प्रतिकूल हवामानात सुप्तावस्थेत राहतात. 
 •     गोगलगायीला दोन्ही लिंग असल्याने प्रत्येक गोगलगाय प्रजननक्षम असते. त्यामुळे प्रादुर्भाव वेगाने वाढण्यास मदत होते.
 •     अन्य वेळी कुजलेला पालापाचोळा, इतर टाकाऊ पदार्थांवर उपजिविका करतात.

शेंबी, शंखी गोगलगायीचे एकात्मिक व्यवस्थापन ः

 •     शेताचे बांध स्वच्छ ठेवावे, त्यामुळे गोगलगायींना लपण्यास जागा राहणार नाही.
 •     प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रात (विशेषतः द्राक्षबागेमध्ये खोडाशेजारी) आच्छादन करण्याचे टाळावे.
 •     सायंकाळी किंवा सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या पाण्यात बुडवून माराव्यात.
 •     शेतामध्ये किंवा बागेमध्ये ७ ते ८ मीटर अंतरावर विविध ठिकाणी वाळलेल्या गवताचे किंवा भाजीपाला पिकाच्या अवशेषाचे ढीग  ठेवावेत.गोगलगायी दिवसा त्या ठिकाणी आश्रयाला जातात. सूर्यास्तापूर्वी त्याखाली गोळा झालेल्या गोगलगायी व त्यांची अंडी गोळा करून नष्ट करावी.
 •     शेत किंवा बागेच्या सभोवती बांधापासून आत तंबाखू भुकटीचा ५ सें.मी. रुंदीचा पट्टा गोगलगायींना शेतात जाण्यास प्रतिबंध म्हणून व नियंत्रणासाठी टाकावा.
 •     कीडनाशकांचे विषारी आमिष तयार करताना ५० किलो गव्हाचा भुसा/ कोंडा अधिक २५ ग्रॅम यीस्ट एकत्र करून गुळाच्या द्रावणात (२०० ग्रॅम गूळ अधिक १० लिटर पाणी) १२ ते १५ तास भिजवावे. त्यामध्ये मेटाल्डिहाईड (२.५ टक्के) ५०  ग्रॅम मिसळावे.  हे आमिष शेतामध्ये ढिगाच्या स्वरुपात किंवा बांधाच्या कडेने पट्टा स्वरुपात टाकावे.
 • टीप ः विषारी आमिष बनविण्यापूर्वी कीटकनाशक हाताळताना चेहरा, डोळे, किंवा शरीराचे संरक्षण करण्यासाठी संरक्षक पोशाख, हातमोजे, चष्मा आदींचा वापर करावा.

 : डॉ. संजय पाटील,७५८८०३६४४८
(कृषी संशोधन केंद्र, निफाड, जि. नाशिक)

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
'सकाळ'चे दिवाळी अंक अॅमेझॉनवर !पुणे : क्लिकवर चालणाऱया आजच्या जगात दिवाळी अंकही...
संपूर्ण देशातून मॉन्सून परतलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (माॅन्सून) रविवारी (ता...
डॉ. हद्दाड आणि डाॅ. नॅबार्रो यांना २०१८...पुणे : जगभरातील कुपोषित माता आणि बालकांना...
हुमणीग्रस्त ऊसक्षेत्र चार लाख हेक्टरवरपुणे ः राज्यात दुष्काळामुळे त्रस्त झालेल्या...
पाणीटंचाईने संत्राबागांची होरपळअमरावती ः विदर्भाचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या...
उन्हाचा चटका वाढलापुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर कमाल...
पाच मिनिटांत एका एकरवर फवारणी !...शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आले पाहिजे, असे जो तो...
‘सह्याद्री’ च्या शिवारात हवामान अाधारित...अत्याधुनिक संगणकीय, उपग्रह व डिजिटल या प्रणाली...
द्राक्षपट्ट्याला दुष्काळाचे ग्रहणसांगली ः गेल्यावर्षीपेक्षा यंदा पाऊस कमी झालाय......
पर्यावरण संवर्धन, ग्राम पर्यटनाला चालनापर्यावरण संवर्धन, अभ्यासाच्या बरोबरीने ‘मलबार...
पीक नियोजन, पशुपालनातून शेती केली...चांदखेड (ता. मावळ, जि. पुणे) येथील रूपाली नितीन...
पीक वृद्धीकारक कंपन्या कारवाईमुळे...पुणे: कृषी विभागाकडून अलीकडेच पीक वृद्धीकारके (...
ऊसतोड कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा...मुंबई  : केंद्र शासनाच्या असंघटित कामगार...
गुलाबी बोंड अळी नुकसानभरपाईस...पुणे : गुलाबी बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या दहा...
राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाजपुणे : कोकण, मध्य महाराष्ट्रात आठवडाभर सुरू...
दूध खरेदी अनुदानाचा तिढा सुटता सुटेनामुंबई : दूध खरेदी अनुदानाचा गुंता काही केल्या...
सेक्‍सेल सिमेन तंत्राने रेडीचा जन्मभिलवडी, जि. सांगली :  येथील चितळे आणि जिनस...
परभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या...
‘आरएसएफ’च्या मूळ सूत्रात घोडचूकपुणे: शेतकऱ्यांना हक्काचा ऊसदर मिळवून देणाऱ्या...