agriculture in marathi, Nampur onion growers to agitate from today on payment issue | Agrowon

नामपूरच्या कांदा उत्पादकांचे आजपासून आंदोलन
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 8 मे 2018

नामपूर, जि. नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व्यापाऱ्याने थकवलेली ३६ लाख रुपयांची देणी ३ मे रोजी देण्याचे आश्‍वासन पुन्हा एकदा पाळले नाही गेले. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज (मंगळवार)पासून बाजार समितीच्या आवारात गेटबंद आंदोलन आणि बेमुदत उपोषण करण्याचा लेखी इशारा दिला आहे.

नामपूर, जि. नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व्यापाऱ्याने थकवलेली ३६ लाख रुपयांची देणी ३ मे रोजी देण्याचे आश्‍वासन पुन्हा एकदा पाळले नाही गेले. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज (मंगळवार)पासून बाजार समितीच्या आवारात गेटबंद आंदोलन आणि बेमुदत उपोषण करण्याचा लेखी इशारा दिला आहे.

कांदा लिलावानंतर दोन ते तीन महिने पेमेंट अदा झाले नव्हते. याप्रश्‍नी संतप्त शेतकऱ्यांनी १७ एप्रिलला नामपूर बाजार समितीचे सभापती यांच्या दालनात ठाण मांडला होते. सुमारे सव्वाशेहून अधिक शेतकऱ्यांच्या अडकलेल्या सुमारे ३६ लाख रुपयांच्या रकमेसाठी बाजार समिती प्रशासनाने पाठपुरावा सुरू केला. येथील बाजार समितीच्या आवारात सटाणा येथील कांदा व्यापारी अकील शेख यांनी दिलेले चेक जानेवारी महिन्यापासून वटतच नसल्याने शेतकरी संतप्त झाले होते. याबाबत बाजार समिती प्रशासनाकडे शेतकऱ्यांनी तक्रारी आल्यानंतर मार्च महिन्यापासून बाजार समितीमधील शेख याची खरेदी थांबविण्यात आली.
 

नवीन आर्थिक वर्षात त्यांच्या परवाना नूतनीकरण रोखण्यात आले. अन्य राज्यामधील व्यापाऱ्यांकडे पैसे अडकल्याने शेतकऱ्यांच्या देणे देण्यास विलंब होत असल्याचे शेख यांनी सांगितले होते, यापूर्वी १७ एप्रिलला सर्व शेतकऱ्यांचे थकीत पैसे अदा करेन, असे लेखी आश्वासन शेख यांनी दिले होते, मात्र पेमेंट दिले नाही, पुन्हा ३ मेची तारीख देण्यात आली. परंतु शेतकऱ्यांना अद्यापही रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गुरुवारी (ता. ३) बाजार समितीच्या आवारात आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी अखेर आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...