agriculture new in marathi, farmers worries due to transport rate may increase, pune, maharashtra | Agrowon

शेतीमाल वाहतूक दरात वाढ होण्याच्या शक्यतेने शेतकरी चिंतेत
टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

पुणे  ः एकीकडे शेतीमालाला बाजारभाव नाहीत त्यातच दरराेज पेट्राेल, डिझेलचे दर वाढत अाहेत. शेतीमधील मशागती, फवारणीसाठी यांत्रिकीकरणाचा वापर वाढला आहे. यासाठी पेट्राेल डिझेलचा वापर वाढत आहे. परिणामी शेतीच्या उत्पादन खर्चात देखील २० टक्क्यांनी वाढ झाल्याने शेतकरी अधिक अडचणीत आल्याचे वास्तव आहे. अद्याप वाहतूकदारांनी शेतीमाल वाहतुकीच्या दरात वाढ केलेली नसून, इंधन दरवाढ बघता भविष्यात ही वाढ हाेणार या शक्यतेने शेतकरी अधिक चिंतेत आहे.

पुणे  ः एकीकडे शेतीमालाला बाजारभाव नाहीत त्यातच दरराेज पेट्राेल, डिझेलचे दर वाढत अाहेत. शेतीमधील मशागती, फवारणीसाठी यांत्रिकीकरणाचा वापर वाढला आहे. यासाठी पेट्राेल डिझेलचा वापर वाढत आहे. परिणामी शेतीच्या उत्पादन खर्चात देखील २० टक्क्यांनी वाढ झाल्याने शेतकरी अधिक अडचणीत आल्याचे वास्तव आहे. अद्याप वाहतूकदारांनी शेतीमाल वाहतुकीच्या दरात वाढ केलेली नसून, इंधन दरवाढ बघता भविष्यात ही वाढ हाेणार या शक्यतेने शेतकरी अधिक चिंतेत आहे.

याबाबत बाेलताना बाळकृष्ण वर्पे (रा. धामणखेल, ता. जुन्नर) म्हणाले, की सध्या काेणत्याच शेतमालाला बाजारभाव नाहीत. मी सध्या फुले आणि भाजीपाला दादर आणि वाशी (नवीमुंबई) येथे पाठवत आहे. पेट्राेल डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतूकदारांनी अद्याप शेतमाल वाहतुकीचे दर वाढविलेले नाहीत. मात्र बैलांची संख्या कमी हाेत चालली असल्याने आमच्या गावात यांत्रिकीकरणाकडे शेतकरी वळत आहे. यामुळे नांगरणी, मशागती, फवारणींसाठीच्या पाठीवरचा पंपांसाठी देखील पेट्राेल लागत आहे. पेट्राेल, डिझेलच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांच्या दैनंदिन खर्चात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकतर शेतमालाला दर नाही आणि इंधन दरवाढीमुळे खर्चात झालेली वाढ ही शेतकऱ्यांची आर्थिक कुंचबणा करणारी आहे.

इंधन दरवाढीबाबत शेतमाल वाहतूकदार कमलाकर विभुते (रा. मालवंडी, ता. बार्शी, जि. साेलापूर) म्हणाले, की मी गेली १० वर्षांपासून टेम्पोतून शेतीमाल नियमितपणे पुणे बाजार समितीमध्ये आणत आहे. गेल्या १५ दिवसांत डिझेल १० रुपयांनी वाढले असून, मला दरराेज ८० लिटर डिझेल लागते. या दरवाढीमुळे माझा दिवसाचा खर्च ८०० ते १ हजार रुपयांनी वाढला आहे. मात्र शेतकऱ्यांकडून लगेच वाहतूक खर्च वाढवता येत नाही. आधीच शेतमालाला दर नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. त्यात वाहतूक दरवाढ करणे आम्हालाच अवघड झाले आहे. वाढलेले दर कमी नाही झाले तर आम्हाला शेतमाल वाहतुकीचे दर वाढवावे लागतील.
 

इतर अॅग्रो विशेष
मॉन्सून एक्सप्रेस कोकणात दाखल;...पुणे : अरबी समुद्रात आलेल्या वायू चक्रीवादळामुळे...
नवसंकल्पना ठीक; पण... राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे राज्यात ‘...
उत्पन्न दुपटीसाठी आत्ताही अपुरे उपाय दर्जेदार बियाणांची उपलब्धता  शेतकऱ्यांना...
सौर कृषिपंप योजनेतील लाभार्थी हिस्सा...मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत...
कृषी विभागात बदल्यांची धूमपुणे  : राज्यात ऐन खरिपाच्या नियोजनात कृषी...
मका लागवड तंत्रज्ञानपेरणी     खरीप हंगाम ः १५...
पावसाचा प्रत्येक थेंब जिरवा ः...पुणे  ः पावसाच्या पाण्याचे विविध प्रयोगांनी...
मॉन्सून आज कोकणात?पुणे  : अरबी समुद्रात आलेल्या ‘वायू’...
ग्रामविकासाचा आदर्श झालेले वडगाव पांडे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या...
राज्यात डाळिंबाचा मृग बहर अडचणीतसांगली ः राज्यात डाळिंबाचे क्षेत्र एक लाख ३० हजार...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : मॉन्सूनच्या आगमनास पोषक स्थिती...
सिंधुदुर्ग जिल्हयात मुसळधार पाऊस (video...सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात बुधवारी (ता....
मक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक नियंत्रणमहाराष्ट्रात फॉल आर्मी वर्म (स्पोडोप्टेरा...
राज्य अर्थसंकल्प : सर्वसमावेशक ‘निवडणूक...मुंबई : राज्यात मोसमी पाऊस लांबला असला तरी आगामी...
‘सबसरफेस ड्रीप’ तंत्राने  ऊस, टोमॅटोची...शेततळ्यातले जेमतेम पाणी आणि उपलब्ध पाण्याचा योग्य...
कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजपुणे   : राज्यातील मॉन्सूनचे आगमन...
जुनीच वाट की नवी दिशाप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ...
कोरड्या महाराष्ट्रावर घोषणांचा पाऊसराज्यात सत्तेत आल्यानंतर शेतीतील गुंतवणूक वाढविली...
लोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...
बोंडअळी निर्मूलन प्रकल्पात आठ राज्यांचा...नागपूर : देशात सर्वात आधी गुजरात त्यानंतर...