agriculture new in marathi, National session of Consumer court in Nashik from 21st | Agrowon

नाशिकला ग्राहक मंचाचे २१ पासून राष्ट्रीय अधिवेशन
टीम अॅग्रोवन
रविवार, 1 एप्रिल 2018

नाशिक : अखिल भारतीय ग्राहक मंचाचे २१ आणि २२ एप्रिल असे दोनदिवसीय राष्ट्रीय अधिवेशन नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात होणार आहे. अधिवेशनात मंचाचे देशाभरातील सर्वच राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून त्याचे उद् घाटन केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांच्या उपस्थितीत होणार आहे.

नाशिक : अखिल भारतीय ग्राहक मंचाचे २१ आणि २२ एप्रिल असे दोनदिवसीय राष्ट्रीय अधिवेशन नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात होणार आहे. अधिवेशनात मंचाचे देशाभरातील सर्वच राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून त्याचे उद् घाटन केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांच्या उपस्थितीत होणार आहे.

महाराष्ट्र राज्य ग्राहक कल्याण सल्लागार सदस्य समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहावर नुकतीच बैठक झाली. त्यामध्ये समितीचे राष्ट्रीय अधिवेशन नाशिकमध्ये घेण्याचा निर्णय झाला. या अधिवेशनासाठी केंद्रीय अन्न पुरवठामंत्री पासवान, राज्याचे पुरवठामंत्री गिरीश बापट, नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन आदींना आमंत्रित करण्यात येणार आहे.

अधिवेशनात ग्राहकांना अन्नपुरवठा करणाऱ्या वितरण पद्धतीतील दोष आणि त्यावरील उपायांवर चर्चा होईल; तसेच राज्या-राज्यांतील सदस्यांकडून मांडण्यात येणाऱ्या अडचणींवर नेमकी काय उपाययोजना करता येईल याबाबत ऊहापोह होईल. ग्राहक सेवा अधिकाधिक ग्राहकाभिमुख होण्यासाठी काय काय सुविधा करता येतील, यावर अधिवेशनात विशेष लक्ष दिले केंद्रित केले जाणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. या वेळी प्रा. दिलीप फडके, औरंगाबादचे प्रांत कार्यकारिणी समिती सदस्य ओमकार जोशी, रवींद्र इंगळीकर, जळगावचे विकास महाजन, राजेंद्र कोतले, सुभाष देशपांडे, श्रीकांत देशपांडे, प्रकाश सोनी, चंद्रशेखर वाड आदी उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
रविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...
केंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...
श्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत !ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...
पाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...
शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...
हुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा  ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...
जिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...
पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...
नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...
औरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...