agriculture new in marathi, Strom rain lasses Banana, Vegetable crops in kolhapur district | Agrowon

कोल्हापुरात वादळी पावसाने केळी, भाजीपाल्याचे नुकसान
टीम अॅग्रोवन
शनिवार, 12 मे 2018

कोल्हापूर : जिल्ह्यातील बहुतांशी भागातला गुरुवारी(ता.१०) सायंकाळी उशिरापर्यंत अवकाळी पावसाने दणका दिला. पावसापेक्षा जोरदार वाऱ्यामुळे उभ्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विशेष करून हातकणंगले, शिरोळ तालुक्‍यात जोरदार वारे असल्याने नुकसानीचे प्रमाण अधिक होते. जिल्ह्यात दोन महिलाही यामुळे मृत्यूमुखी पडल्या. 

कोल्हापूर : जिल्ह्यातील बहुतांशी भागातला गुरुवारी(ता.१०) सायंकाळी उशिरापर्यंत अवकाळी पावसाने दणका दिला. पावसापेक्षा जोरदार वाऱ्यामुळे उभ्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विशेष करून हातकणंगले, शिरोळ तालुक्‍यात जोरदार वारे असल्याने नुकसानीचे प्रमाण अधिक होते. जिल्ह्यात दोन महिलाही यामुळे मृत्यूमुखी पडल्या. 

पावसापेक्षा वाऱ्याचा वेग अधिक असल्याने घर, गोठ्यावरील पत्रे उडून लाखो रुपयांचे नुकसान झाले. उसाबरोबर केळी, भाजीपाल्यालाही या पावसाचा दणका बसला. यड्राव भागात केळी, भाजीपाल्याचे पीक जोरदार वाऱ्यामुळे आडवे झाले. तर अनेक ठिकाणी उभ्या उसाचीही वाऱ्यामुळे पडझड झाली. सायंकाळी पाच ते सात नंतर जिल्ह्यात वादळी वाऱ्याचे प्रमाण जोरदार असल्याने अनेक शेतातील झाडांची पडझड, पिकांचे नुकसान झाले. हरितगृहे, छोटे कृषी पूरक शेड यांनाही वाऱ्याचा फटका सहन करावा लागला. 

नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही तातडीने सुरू केल्याची माहिती कृषी व महसूल विभागाच्या वतीने देण्यात आली. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा नेमका आकडा कळू शकेल, अशी माहिती या विभागातून देण्यात आली. जिल्ह्यात पाऊस झाला असला तरी जोरदार पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. यानंतरच खरीप पूर्व मशागतीस प्रारंभ होईल असे शेतकऱ्यांनी सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
उगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेतीह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे...
...तरच वाढेल डाळिंब निर्यातफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची...
बुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादनबुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक...
भारतीय दूध सुरक्षितनवी दिल्ली ः भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत...
राज्यात हुडहुडी वाढली... पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात...
धार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी...नागपूर ः राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांनी...
चारा छावण्यांऐवजी थेट अनुदानाचा विचार ः...मुंबई ः दुष्काळी भागात चारा छावण्यांमध्ये होणारा...
देशी बियाण्यांच्या संवर्धनासाठी रंगणार...पुणे : देशी बियाण्यांचे संवर्धन आणि प्रसारासाठी...
खरेदी न झालेल्या हरभरा, तुरीसाठी...सोलापूर : हमीभाव योजनेतून शेतकऱ्यांनी हरभरा व तूर...
दुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘...लोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ...
‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...
परभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...
सीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...
ब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...
गोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...
शेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...
राज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...
संत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...
फॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...
चिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...