agriculture news in amrathi, Konkan may have Heavy rainfall in scatter area | Agrowon

कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
रविवार, 17 जून 2018

पुणे : मॉन्सूनचे प्रवाह मंदावल्यानंतर राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. साेमवारपासून (ता. १८) राज्यात पावसाला पुन्हा सुरवात होण्याची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सोसाट्याचे वारे, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर बुधवारपासून (ता. २०) कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 

पुणे : मॉन्सूनचे प्रवाह मंदावल्यानंतर राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. साेमवारपासून (ता. १८) राज्यात पावसाला पुन्हा सुरवात होण्याची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सोसाट्याचे वारे, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर बुधवारपासून (ता. २०) कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 

पूर्वमोसमी पावसाने वाजत-गाजत हजेरी लावल्यानंतर कोकणात मॉन्सूनचे दमदार आमगन झाले. त्यानंतर राज्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा असतानाच माॅन्सून प्रवाहांचा वेग मंदावल्याने राज्यात जवळपास आठवडाभरापासून पावसाने उघडीप दिली आहे. आजपासून (ता. १७) कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची अंदाज आहे. मात्र उर्वरित महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुधवारी कोकणात बहुतांशी ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  

शनिवारी सकाळपासूनच कोकणासह मध्य महाराष्ट्रात ढग गोळा होऊ लागले आहेत. तर कोकण किनारपट्टीवर हलक्या पावसाला सुरवात झाली आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील अलिबाग, मालवण येथे ६० मिलिमीटर, मुंबई, दापोली, देवगड, गुहागर, दोडमार्ग, रत्नागिरी येथे ३० मिलिमीटर, हर्णे, कणकवली, खेड, मंडणगड, म्हसळा, मुरूड, पोलादपूर, रोहा, सांगे, श्रीवर्धन, उरण येथे २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. घाटमाथ्यावरील कोयना पाफळी येथे ३० मिलिमीटर, आंबोणे येथे २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली, उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

राज्यातील उतरलेला तापमानाचा पारा पावसाने उघडीप दिल्यानंतर पुन्हा वर गेला आहे. उन्हाचा चटका वाढल्याने विदर्भात पारा ४० अंशांच्या जवळपास गेला आहे. चंद्रपूर येथे उंच्चांकी ४०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, तर चंद्रपूर येथे तापमान ४०.२ अंशांवर पोचले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात कोकणातही तापमानाचा पारा सरासरीच्या वर गेल्याने उकाड्यात वाढ झाली आहे.

 शनिवारी (ता. १६) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३२.९, नगर ३६.४, जळगाव ३९.२, कोल्हापूर ३१.१, महाबळेश्वर २२.१, मालेगाव ३९.०, नाशिक ३३.९, सातारा ३१.०, सोलापूर ३६.०, मुंबई ३३.९, अलिबाग ३३.३, रत्नागिरी ३२.०, डहाणू ३५.७, आैरंगाबाद ३५.३, परभणी ३७.५, नांदेड ३५.०, अकोला ३९.०, अमरावती ३७.८, बुलडाणा ३७.२, ब्रह्मपुरी ४०.२, चंद्रपूर ४०.४, गोंदिया ३९.२, नागपूर ३९.१, वर्धा ३९.६, यवतमाळ ३८.०. 

मॉन्सून पुढे सरकेना
नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (माॅन्सून) जवळपास निम्मा महाराष्ट्र व्यापला असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. कोकण, मध्य महाराष्ट्रात गेल्या शनिवारी (ता. ९) तर विदर्भात सोमवारी (ता. ११) प्रगती केलेला मॉन्सून पुढे सकरण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. प्रवाहातील वेग मंदावल्याने आणखी जवळपास आठवडाभर मॉन्सूनची प्रगती होणार नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

इतर ताज्या घडामोडी
सूज, जखमांवर काळी अळू उपयुक्त स्थानिक नाव    : काळी अळू...
खानदेशातील पपई पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार : पपई दरांमध्ये दर आठवड्याला...
जालन्यात कृषिमाल निर्यात केंद्र सुरू जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रॅक्‍टर, पॉवर...कोल्हापूर/गडहिंग्लज : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर...
औरंगाबादेत खरबूज प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
विद्यापीठांपेक्षा शेतकरी संशोधनात...सांगली : सध्या विद्यापीठाच्या तंत्रज्ञानापेक्षा...
कृषी सल्ला : पेरू, गहू, हरभरा, डाळिंब,...पेरू - फळमाशीच्या नियंत्रणासाठी प्रतिएकर ४ रक्षक...
कमाल तापमानात वाढ, उन्हाळी हंगामाला...महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा...
पलटी नांगर, रोटाव्हेटरचे अनुदान वाढणार...जळगाव : जिल्हा परिषदेच्या आगामी अंदाजपत्रकात (...
ढगाळ वातावरणाचा द्राक्ष खरेदीवर परिणामपांगरी, जि. सोलापूर : गेल्या दोन दिवसांपासून...
जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोधनाशिक : नाशिक-पुणे रेल्वे लाईनच्या महाराष्ट्र रेल...
तुमच्या आग्रहापुढे मी नाही कसे म्हणू...टेंभूर्णी, जि. सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील...
शिराळ्यातील गूळ हंगाम अवघ्या तीन...सांगली ः शिराळा तालुक्यातील दरवर्षी पाच ते साडे...
आठ दिवसांत पूर्ण एफआरपी द्या; अन्यथा...सातारा ः सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर...
अडत्यांवरील कारवाईला प्रशासकांचीच...पुणे ः खरेदीदार आणि शेतकऱ्यांकडून नियमबाह्य...
छावण्यांच्या मंजुरीसाठी शिवसेनेचा ठिय्यानगर : जिल्ह्यात पशुधनाला दिलासा देण्यासाठी...
जालन्यातील कृषी माल निर्यात सुविधा...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पैठण तालुक्यातील पिकांना अवकाळीचा फटकाचितेगाव, जि. औरंगाबाद : विजेच्या कडकडाट व वादळी...
परभणी जिल्ह्यातील ‘शेतकरी सन्मान निधी’...परभणी ः पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी...
पाकिस्तान युद्धाच्या तयारीत,...श्रीनगर : काश्‍मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी...