agriculture news in maathi, In Karnataka, onion growers will get cash payments | Agrowon

लासलगावात कांदा उत्पादकांना रोख पेमेंट मिळणार
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 जून 2018

नाशिक : लासलगाव, निफाड येथील बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात धान्याप्रमाणेच कांदा उत्पादकांना रोख रक्कम मिळणार आहे. येत्या सोमवारपासून वजनमापानंतर रोख चुकवती करण्याचा तसेच आठवड्याच्या पहिल्या, तिसऱ्या व पाचव्या शनिवारी दुपारपर्यंत कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय व्यापारी वर्गाने मंगळवारी झालेल्या संयुक्त बैठकीत घेण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी दिली. लासलगाव बाजार समितीच्या या निर्णयाचे शेतकऱ्यांमधून स्वागत होत आहे.

नाशिक : लासलगाव, निफाड येथील बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात धान्याप्रमाणेच कांदा उत्पादकांना रोख रक्कम मिळणार आहे. येत्या सोमवारपासून वजनमापानंतर रोख चुकवती करण्याचा तसेच आठवड्याच्या पहिल्या, तिसऱ्या व पाचव्या शनिवारी दुपारपर्यंत कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय व्यापारी वर्गाने मंगळवारी झालेल्या संयुक्त बैठकीत घेण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी दिली. लासलगाव बाजार समितीच्या या निर्णयाचे शेतकऱ्यांमधून स्वागत होत आहे.

नोटाबंदीनंतर सध्या येथील कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना धनादेश, आरटीजीएस, एनईएफटी सेवेद्वारे चुकतीची रक्कम अदा करण्यात येत आहे; परंतु धनादेशाद्वारे मिळालेल्या शेतमाल विक्रीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग होण्यास उशीर होतो. धनादेश, आरटीजीएस, एनईएफटी सेवेद्वारे रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग होत असल्याने बॅंकांच्या सलग सुट्या, तसेच इंटरनेट सेवेचा विस्कळितपणा यामुळे संबंधित शेतकऱ्यांना बॅंकेतून रोख रक्कम काढण्यास अडचणी येतात.

शेतीच्या मशागतीच्या कामासाठी रासायनिक खते, कीटकनाशके, बी-बियाण्यांची खरेदी, मजुरांची मजुरी, वाहनांसाठी इंधन खरेदी आदी दैनंदिन आर्थिक व्यवहार करण्यासाठी त्यांना पैशांची निकड भासत असल्याने लासलगाव बाजार समितीत कांद्याची रोख चुकवती मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. त्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी बाजार समितीच्या नवीन कांदा बाजार आवारावर बाजार समितीचे पदाधिकारी व कांदा विभागातील व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. बैठकीत व्यापाऱ्यांना सोमवार (ता. १८) पासून धान्य शेतमालाप्रमाणेच कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना वजनमापानंतर २४ तासांच्या आत मालविक्रीची संपूर्ण रक्कम रोख स्वरूपात अदा करण्याचा, तसेच दर आठवड्याच्या पहिल्या, तिसऱ्या व पाचव्या शनिवारी सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला.

इतर ताज्या घडामोडी
पूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन...पूर्णा, जि. परभणी ः परभणी जिल्ह्यातील पूर्णा,...
धुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९...धुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात...
परभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ...परभणी  : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...
कोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी...कोल्हापूर  : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा...
मराठवाड्यातील प्रकल्पांत २० टक्‍के...औरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच...
कमी पाऊस : ‘जलयुक्त’ची कामे झालेल्या...नगर  ः जलयुक्त शिवार अभियानातून कामे करून...
हमीभाव, कर्जमुक्ती असेल तरच महाआघाडीत...बुलडाणा  : दीडपट हमीभाव आणि शेतकऱ्यांची...
पुणे विभागात ९२ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे   : विभागातील पाणीटंचाईची तीव्रता...
हजारो केळी रोपांचे रानडुकरांकडून नुकसानअकोला   ः सातपुड्यालगत असलेल्या अकोट...
पाण्याअभावी संत्रा तोडून फेकण्याची वेळअमरावती  ः पाण्याअभावी संत्र्याचा अपेक्षित...
बोदवडला मका खरेदीसाठी मुहूर्त मिळेनाबोदवड, जि. जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सिल्लोड तालुक्यात विहिरींसाठी दोन...सिल्लोड, जि. औरंगाबाद : वैयक्तिक लाभाच्या...
नांदेड, परभणी, हिंगोलीत सव्वा लाख...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
पुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कांदा पिकावरील फुलकिडीचे नियंत्रणकांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंगामात...
पशुसल्लासध्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी-जास्त...
नांदेड जिल्हा कर्जवाटपात मराठवाड्यात...नांदेड : जिल्ह्यात मुद्रा योजनेअंतर्गत १ लाख ५५...
कृषिपंप वीजजोडणीच्या प्रतीक्षेत पाचशेवर...देऊर, जि. धुळे : धुळे ग्रामीण उपविभागांतर्गत...
खानदेशातील ऊस गाळपात आर्यन शुगरने घेतली...जळगाव : खानदेशात सर्वाधिक तीन साखर कारखाने...
काजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी...पुणे  ः भविष्यातील इंधनाची टंचाई आणि आयात...