agriculture news in marahi, farmers award dose not have any fund, jalgaon, maharashtra | Agrowon

जळगावमध्ये आदर्श शेतकरी पुरस्कारासाठी तरतूद नाहीच
चंद्रकांत जाधव
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017
 जुलै महिन्यात आम्ही आदर्श शेतकरी किंवा कृषी पुरस्कारांसाठी तरतूद करण्याची मागणी केली. स्वनिधीचे पुनर्विलोकन करताना तरतूद वाढविणे शक्‍य होते, पण ही तरतूद अजूनही झालेली दिसत नाही. 
- नानाभाऊ महाजन, सदस्य, जळगाव जिल्हा परिषद.
जळगाव : येथील जिल्हा परिषदेतर्फे कृषी विभागाच्या माध्यमातून २०१२ पर्यंत आदर्श शेतकरी पुरस्कार दिले जात होते, पण ही परंपरा बंद झाली. जिल्हा परिषदेने पुन्हा ही परंपरा सुरू करावी, अशी मागणी मागील सर्वसाधारण सभेत सदस्यांनी केली. पण अद्यापही या पुरस्कारांसंबंधीची तरतूद जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाने केलेली नाही. यामुळे सदस्यांमध्ये नाराजी आहे. 
 
जिल्हा परिषदेतर्फे यापूर्वी प्रत्येक तालुक्‍यातील प्रयोगशील, संघर्ष केलेल्या शेतकऱ्यांना आदर्श शेतकरी पुरस्कार प्रदान केले जात होते. स्मृतिचिन्ह व शाल असे पुरस्काराचे स्वरूप असायचे. परंतु २०१२ पासून ही परंपरा बंद पडली. मध्यंतरी म्हणजेच २०१४ मध्ये ही परंपरा पुन्हा सुरू झाली, परंतु जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने २०१५ साठी या पुरस्कारांबाबत तरतूद न केल्याने २०१५ पासून ही परंपरा पुन्हा खंडित झाली. 
 
मागील जुलै महिन्यात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये आदर्श शेतकरी पुरस्कारांची परंपरा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी सदस्यांनी केली. सदस्य नानाभाऊ महाजन व इतरांनी ही मागणी उचलून धरली. त्यानुसार या पुरस्कारांसंबंधी तरतूद केली जाईल, असे आश्‍वासन पदाधिकाऱ्यांनी सभेत दिले होते. परंतु आता ऑक्‍टोबर महिना जवळ आला तरी तरतूद झालेली नसल्याचे समोर आले आहे. 
 
जिल्हा परिषदेने आपल्या स्वनिधीचे (अर्थसंकल्प) अलीकडेच पुनर्विलोकन केले आहे. त्यात कृषी विभागासाठी तरतूद वाढवून पुरस्कारांसाठी निधी ठेवण्याची संधी जिल्हा परिषद प्रशासनाला होती. परंतु तशी कुठलीही तरतूद प्रशासनाने केलेली नसल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी दिली आहे. 
 
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आता येत्या ११ ऑक्‍टोबरला आहे. या सर्वसाधारण सभेत सदस्य आदर्श शेतकरी पुरस्कारांचा मुद्दा मांडणार असून, प्रशासनाला जाब विचारणार असल्याची माहिती मिळाली. 

इतर ताज्या घडामोडी
सैन्य दलात अधिकारी होण्याची संधीमुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात...
कर्नाटक: कामगारांच्या पत्राशेडमध्ये...विजयपूर : नुकतेच कर्नाटकात विधानसभेची निवडणुका...
पेट्रोलचा सर्वकालीन उच्चांक; सलग...नवी दिल्ली : रुपयाचे अवमूल्यन आणि खनिज तेलाच्या...
पुण्यात भाजीपाल्याच्या दरात तेजी कायमपुणे  : उन्हाच्या वाढत्या झळांमुळे...
ब्रॉयलर्स बाजार वर्षातील उच्चांकी...गेल्या आठवड्यात ब्रॉयलर्सच्या बाजारभावात जोरदार...
उपवासाने मूलपेशींच्या क्षमतेत होते वाढवाढत्या वयाबरोबरच मूलपेशींच्या कार्यक्षमतेमध्ये...
शाकाहारामध्येही ‘बी १२’ जीवनसत्त्वाचा...शाकाहारी आहार अधिक पोषक व संतुलित होण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात कृषी अवजारे बँकेस...सगरोळी, जि. नांदेड : सगरोळी (ता. बिलोली)...
पाणी सर्वेक्षणासाठी पुणे विभागातील ११६...पुणे  ः विहीर, बोअरवेलसाठी आवश्यक भूगर्भातील...
मराठवाड्यातील ७४६ लघुप्रकल्पांत ७.७९...औरंगाबाद  : मराठवाड्यातील ७४६ लघुप्रकल्पांत...
यवतमाळ जिल्हा प्रशासनाने राबविली अर्ज...यवतमाळ : खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना...
बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानापोटी नगरला...नगर ः कपाशीवर झालेल्या बोंड अळी प्रार्दुभावाच्या...
नगर जिल्ह्यात ४२ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर :  जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईची तीव्रता...
कृषी राज्यमंत्र्यांच्या प्रतिमेला दहा...पुणे : शेतकऱ्यांनो हमीभाव कशाला मागता, मार्केटिंग...
बचत गट आणि महिलांसाठी दुधाळ जनावर वाटप...पुणे : महिला व बालकल्याण आणि पशुसंवर्धन...
अहंकारातूनच माजी खासदाराने जनतेवर...भंडारा : पालघरमध्ये खासदारांचे निधन झाले...
शिवसेना नसली तरी रिपाई भाजपसोबत : रामदस...नागपूर : शिवसेनेने भाजप सोबत युती केली नाही...
शेतीमालाला योग्य भावाची जबाबदारी...इचलकरंजी, जि. कोल्हापूर : ‘‘शेतीमालाला योग्य...
सर्वांच्या प्रयत्नांनीच गोवर्धन उचलला...अतिरिक्त दूध झाल्यास प्रक्रिया वाढविणे, त्यासाठी...
सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना थेट...महाराष्ट्र सध्या दुधाच्या प्रश्नावरून निर्माण...