agriculture news in mararthi, BJP assures to waive off Crop loans upto Rs 1 Lakh taken from Banks and Coop. sector | Agrowon

कर्नाटकात शेतकऱ्यांना एक लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी
वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

बंगळूर : कर्नाटक राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यास शेतकऱ्यांना एक लाख रुपयांपर्यंत पूर्णपणे कर्जमाफी दिली जाईल, असे जाहीर आश्वासन बी. एस. येडीयुरप्पा यांनी दिले. कर्नाटक विधानसभेच्या तोंडावर आलेल्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपले घोषणापत्र नुकतेच प्रसारित केले. या कार्यक्रम प्रसंगी पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख उमेदवार येडीयुरप्पा बोलत होते. 

बंगळूर : कर्नाटक राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यास शेतकऱ्यांना एक लाख रुपयांपर्यंत पूर्णपणे कर्जमाफी दिली जाईल, असे जाहीर आश्वासन बी. एस. येडीयुरप्पा यांनी दिले. कर्नाटक विधानसभेच्या तोंडावर आलेल्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपले घोषणापत्र नुकतेच प्रसारित केले. या कार्यक्रम प्रसंगी पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख उमेदवार येडीयुरप्पा बोलत होते. 

भारतीय जनता पक्षाने आपल्या घोषणापत्रात शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिल्याचे म्हटले आहे. आमचे सरकार सत्तेत येताच सर्वप्रथम राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी बॅंकेतून शेतकऱ्यांनी घेतलेले एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पूर्णपणे माफ केले जाईल, असे आश्वासन येडीयुरप्पा यांनी दिले. अल्प व अत्यंत अल्पभूधारक शेतकऱ्यांना दहा हजार ते २० लाख रुपयांपर्यंत थेट उत्पन्न आधार देण्याची योजनाही राबविण्याचा आमचा संकल्प असल्याचे ते म्हणाले. 

गोसंरक्षणास प्राधान्य 
गायींचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या देण्याच्या हेतूने गोहत्या प्रतिबंधक विधेयक तसेच गोसेवा उपक्रमाची स्थापना करण्यात येईल. रेशीम कीटक संगोपनासाठी एकहजार चौरस फुटांच्या शेड उभारणीसाठी छोट्या प्रकल्पांसाठी ७५ हजार ते तीन लाख रुपये अनुदान देण्यात येईल, अशीही घोषणा पक्षाद्वारे करण्यात आली आहे. 

लोकायुक्त समितीचे अधिकार वाढवणार 
काॅंग्रेस सरकारने सत्तेत आल्यानंतर लोकायुक्त समितीचे अधिकार कमी करून लाचलुचपत प्रतिबंध समितीची स्थापना केली होती. मात्र आमची सत्ता आल्यास समितीचे अधिकार बरखास्त करून लोकायुक्त अधिकार अधिक सक्षम केले जातील, असेही आश्वासन येडीयुरप्पा यांनी या वेळी दिले.

आश्वासनांची खैरात 
भारतीय जनता पक्षाने घोषणापत्रात शेतकऱ्यांसाठी अनेक आश्वासनांची खैरात केली आहे. त्यामध्ये पदवी शिक्षणापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण पुरवण्याबरोबरच केंद्र स्तरावरील वैद्यकीय संस्था (एआयएमएस) उभारण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. ‘सुजलाम सुफलाम कर्नाटक’ या योजनेअंतर्गत सध्या कार्यरत सिंचन प्रकल्पांसाठी येत्या २०१३ पर्यंत १५ लाख कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल. त्याचबरोबर ‘मिशन कल्याणी’अंतर्गत राज्यातील तलावांचे पुनरुज्जीवनही करण्याची घोषणा करण्यात आली आहे. वीज भारनियमनाची समस्या लक्षात घेता कृषिपंपांसाठी दहा तास ‘थ्री फेज’ अखंडित वीज उपलब्ध करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी कृषी व पूरक अभ्यासक्रमांसाठी शंभर कोटींची रायथा बंधू पाठ्यवृत्ती देण्यात येणार असल्याचे पक्षाच्या घोषणापत्रात म्हटले आहे. 
 

इतर अॅग्रो विशेष
वेतन आयोग ठीक; पण शेतकरी आयोगाचे काय?१९४७ ते १९९० आणि १९९० ते २०१८ असे दोन भाग केले,...
वीजवापरातील ‘अंधार’वी ज दरवाढ तसेच शेती पंपासाठीची बिलं दुरुस्त करून...
परोपजीवी मित्रकीटकांची ओळखअळी-कोष-परोपजीवी (Larval-Pupal Parasitoid) या...
सांगलीत वाढली दुष्काळाची दाहकतासांगली : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे....
साखर कारखान्यांचे बॉयलर लवकर थंडावणारपुणे  : दुष्काळी स्थितीमुळे साखर...
नंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची...जळगाव  ः खानदेशात एकीकडे थंडीने केळीला मोठा...
ॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्डसाठी शेतकऱ्यांचा...पुणे : संकटांपुढे हार न मानता प्रतिकूल...
टंचाईग्रस्त विसापूर झाले पाणीदार सातारा जिल्ह्यातील माण व खटाव कायम तीव्र...
विदर्भात गारपिटीचा इशारा; राज्यात...पुणे : पावसाला पोषक हवामान होत असल्याने आजपासून (...
‘एफआरपी’ची थकबाकी ४० हजार कोटींपर्यंत...पुणे : साखर उद्योगात तयार झालेल्या संकटामुळे...
गूळ उद्योगाला आर्थिक स्थैर्य देणे...मुंबई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपतानाच...
दुधाळ जनावरे वाटप योजनेत देशी गाईंचा...पुणे : देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी संकरित दुधाळ...
बांबूशेतीमध्ये शेतकऱ्यांचे अर्थकारण...सोलापूर : ‘‘बांबू हे गवतवर्गीय पीक आहे....
‘ई-नाम’द्वारे देशातील बाजार समित्या...मुंबई : देशातील सर्व बाजार समित्या ‘ई-नाम’...
वेतन आयोगाने वाढते गरीब-श्रीमंतांतील दरीमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी ४ ...
दूध दरवाढीसाठीही दाखवा तत्परताआंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटीचे (पावडर) दर...
मक्यातील लाग रंग येण्यामागील गूढ उलगडलेमक्यामध्ये काहीवेळा दिसणाऱ्या लाल रंगाच्या...
एफआरपी तुकड्यात घेणार नाही : खासदार...सांगली : राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन ८० दिवस...
राज्यात १७८६ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे  : सलग दोन वर्षे पावसाने ओढ दिल्यानंतर...
केळी पट्ट्याला १५० कोटींचा फटकाजळगाव ः डिसेंबर व जानेवारी महिन्यातील थंडीचा...