agriculture news in marathi, नाशिकला कांदा ४०० ते १४०० रुपये | Agrowon

नाशिकला कांदा ४०० ते १४०० रुपये
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 जुलै 2018

नाशिक : देशभरातील बाजारातून उन्हाळ कांद्याला मागणी वाढत असल्याने कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गत सप्ताहात नाशिक जिल्ह्यातील १५ बाजार समित्यांतील दर क्विंटलला १४०० पर्यंत वाढले. संपूर्ण आठवडाभर प्रतिक्विंटल ४०० ते १४०० या दरम्यान स्थिर दर होते. देशातील कांद्याच्या प्रमुख बाजारपेठात कांद्याची आवक स्थिर असताना मागणी मात्र वाढली आहे. या स्थितीत दरातही वाढ झाली आहे. या स्थितीत येत्या काळातही हे दर स्थिर राहतील, असा अंदाज आहे. मात्र, उत्पादकांनी अधिक काळ थांबू नये. टप्प्याटप्प्याने कांदा बाजारात आणावा, असे आवाहन या क्षेत्रातील जाणकारांनी केले आहे.

नाशिक : देशभरातील बाजारातून उन्हाळ कांद्याला मागणी वाढत असल्याने कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गत सप्ताहात नाशिक जिल्ह्यातील १५ बाजार समित्यांतील दर क्विंटलला १४०० पर्यंत वाढले. संपूर्ण आठवडाभर प्रतिक्विंटल ४०० ते १४०० या दरम्यान स्थिर दर होते. देशातील कांद्याच्या प्रमुख बाजारपेठात कांद्याची आवक स्थिर असताना मागणी मात्र वाढली आहे. या स्थितीत दरातही वाढ झाली आहे. या स्थितीत येत्या काळातही हे दर स्थिर राहतील, असा अंदाज आहे. मात्र, उत्पादकांनी अधिक काळ थांबू नये. टप्प्याटप्प्याने कांदा बाजारात आणावा, असे आवाहन या क्षेत्रातील जाणकारांनी केले आहे.

नाशिक जिल्ह्यातील १५ बाजार समित्या व ४५ उपबाजारांत कांद्याची आवक होते. गत सप्ताहात सर्वच बाजार आवारांत कांद्याची आवक वाढली होती. खरिपाच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांना सद्यस्थितीत भांडवलाची गरज असताना मोठ्या प्रमाणावर कांदा बाजारात येत आहे. मात्र, या स्थितीत एकदम जास्त गर्दी न करता हळूहळू थोडा थोडा कांदा बाजारात आणणे योग्य ठरेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नाशिक भागात पावसाळा लांबला आहे. राज्याच्या बहुतांश भागातही स्थिती असताना खरीप कांद्याची लागवडही लांबली आहे. या स्थितीत खरीप कांद्याचे उत्पादन उशिरा येण्याची चिन्हे आहेत. मध्यप्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश या भागांतील कांद्याची आवकही घटली आहे. ही स्थिती पाहता कांद्याचे सध्याचे दर येत्या काळात टिकून राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

जिल्ह्यातील बाजार समित्यातील कांद्याचे दर (रुपये/प्रतिक्विंटल)
बाजार समिती आवक किमान दर कमाल दर सरासरी दर
लासलगाव १६,००० ४०० १२५२ १०५०
उमराणे १८,००० ४०० १३९० ११७५
येवला १८,५०० ३०० १२७६ ११००
मालेगाव ५००० ७०४ १३४१ ११०५
मनमाड ६५०० ७०० १४१० १२५०
नाशिक ४००० ३८० १२५० ९००
गत सप्ताहातील पिंपळगाव बसवंत बाजार समितीतील कांद्याचे बाजारभाव (आवक व दर प्रतिक्विंटलचे)
वार (तारीख) आवक किमान दर कमाल दर सरासरी दर
सोमवार (२५) २६,४९२ ३०० १३९० ९५१
मंगळवार (२६) १६,६३८ ३०० १३२१ ९४०
बुधवार (२७) १८,९५४ ४०० १४८२ १०६१
गुरुवार (२८) २७,९०६ ४०० १३३३ ११०१
शुक्रवार (२९) २१,७५४ ३०० १३९६ ११०१
शनिवार (३०) १०,६९७ ३०० १४५१ ११२१

‘देशभरातून राज्यातील कांद्याला मागणी वाढली आहे. निर्यातीतही सातत्य असल्याने कांद्याचे दर वधारले आहेत. ते अजून महिनाभर तरी स्थिर राहतील, अशी स्थिती आहे. या स्थितीत कांदा उत्पादकांनी एकदम मोठ्या प्रमाणावर बाजारात कांदा न आणता टप्प्याटप्प्याने आणणे आवश्‍यक आहे.’
- संजय पाटील, सचिव,
पिंपळगाव बसवंत बाजार समिती.

इतर ताज्या घडामोडी
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
इतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे...दरवर्षी पिढ्यानपिढ्या पावसाचे पाणी वेगवेगळे उपाय...
अभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा...महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, तिथे १२...
ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...
होळीमुळे द्राक्ष काढणी मंदावलीनाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी...
एकरकमी एफआरपीबाबत साखर कारखान्यांचे मौनसातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस...
‘बळिराजा'चे सोळा उमेदवार जाहीरकोल्हापूर : देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच...
साताऱ्यात हिरवी मिरची ४०० ते ५०० रुपये...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुसजळगाव ः लोकसभा निवडणुकीत भाजपचे जळगाव व...
नाशिकमध्ये युतीचे उमेदवार ठरेनानाशिक: लोकसभेच्या निवडणुकीसाठी नाशिक व दिंडोरी...
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...