agriculture news in marathi, हतूरदार धरणे 10 दरवाजे पूर्णपणे उघडले | Agrowon

हतनूर धरणाचे १० दरवाजे पूर्णपणे उघडले
टीम अॅग्रोवन
रविवार, 15 जुलै 2018

जळगाव : भुसावळ व मुक्ताईनगरनजीकच्या तापी नदीवरील हतनूर धरणाचे १० दरवाजे पूर्णतः उघडे असून, १६ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत. धरणाच्या लाभक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने पाण्याचा प्रवाह वाढला आहे. धरणाच्या सांडव्यातूनही पाणी सोडले जात आहे.

जळगाव : भुसावळ व मुक्ताईनगरनजीकच्या तापी नदीवरील हतनूर धरणाचे १० दरवाजे पूर्णतः उघडे असून, १६ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत. धरणाच्या लाभक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने पाण्याचा प्रवाह वाढला आहे. धरणाच्या सांडव्यातूनही पाणी सोडले जात आहे.

तापी नदीवरील धुळे जिल्ह्यातील सुलवाडे, नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजचे दरवाजेही उघडे केले आहेत. जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये मिळून एकूण उपयुक्त साठा ५०.४० टीएमसी एवढा आहे. मोठ्या प्रकल्पांमधील गिरणा धरणात फक्त आठ टक्के आणि वाघूरमध्ये ३३ टक्के साठा आहे. मध्यम प्रकल्पांमधील जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील भोकरबारी, बहुळा, अंजनी, हिवरा, अग्नावती, मन्याड व तोंडापूर प्रकल्पात शून्य टक्के जलसाठा आहे. रावेर व यावलमधील सातपुडा पर्वतालगतच्या अभोरा, मंगरूळ, सुकी, मोर या प्रकल्पांमध्ये सरासरी ४० टक्के जलसाठा आहे. चोपडा तालुक्‍यातील गूळ प्रकल्पातही जेमतेम साठा असल्याची माहिती मिळाली.

मागील १ जूनपासून हतनूर धरणाच्या लाभक्षेत्रात ९३ मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे. तापी नदीचे उगम क्षेत्र मध्य प्रदेश व छत्तीसगडनजीक आहे. या भागात चांगला पाऊस मागील काही दिवसांत झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. शुक्रवारी (ता. १३) या धरणाच्या क्षेत्रात मात्र पाऊस झाला नाही, अशी माहिती देण्यात आली.
सातपुडा पर्वतालगतच्या धुळे जिल्ह्यातील अनेर धरणातही साठा २१ टक्‍क्‍यांपर्यंत आहे. या धरणाच्या लाभक्षेत्रात चांगला पाऊस न झाल्याने यंदा हे धरण भरलेले नाही. तसेच धुळे जिल्ह्यातील मालनगाव, अमरावती हे प्रकल्प कोरडेठाक असल्याचे सांगण्यात आले.

इतर बातम्या
जळगावच्या पालकमंत्र्यांचा दौरा पुन्हा...जळगाव : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा...
खानदेशातील पाणीटंचाई गंभीरजळगाव : खानदेशात पाणीटंचाई दिवसेंदिवस बिकट होत...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
खानदेशात अनियमित वीजपुरवठाजळगाव : खानदेशात जलपातळी सातत्याने घटत आहे....
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
नाशिक येथे साकारणार 'देवराई' नाशिक : दुर्मीळ देशी प्रजातींच्या वृक्षांचे...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...