agriculture news in marathi, ्due to lack of rain, sowing has stopped, nagar, maharashtra | Agrowon

नगरमध्ये पावसाचा खंड; पेरण्या खोळंबल्या
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 जून 2018

गेल्या वर्षी कापूस, हरभरा, कांद्याला कमी भाव मिळाला. त्याचे दुःख असतानाच या वर्षी पाऊस लांबला. अजून शेतीच्या पूर्वमशागतीची कामे अपूर्ण आहेत. पिण्याच्या पाण्याची अडचण वाढत आहे. कापसाला उशीर होतोय. आम्ही पावसाची वाट पाहत आहोत.
- पद्‌माकर कोरडे, शेतकरी.

नगर : पावसाळा सुरू होऊन १५ दिवस होत आले तरी अजून पाऊस झालेला नाही. त्यामुळे आता शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. पश्‍चिमेकडून सुटलेल्या जोरदार वाऱ्याने जिवाला घोर लावला असून पावसाचा मोठा खंड (बखाडी) पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. फळबाग, ऊस व चारापिके वाचवण्यासाठी धडपड सुरू असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

जूनमध्ये सुरवातीलाच चांगला पाऊस झाल्यास शेतकरी खरिपाची तयारी सुरू करतात. मात्र, जूनमधील १६ दिवस उलटूनही पाऊस झालेला नाही. मृगाचा पाऊस झाल्यानंतर सुरवातीलाच कापसाची लागवड झाली, तर पुढील पाण्याचा स्रोत गृहीत धरून पुढील पिकांचेही नियोजन केले जाते. यंदा मात्र पावसाळा सुरू होऊन १५ दिवसांचा कालावधी उलटला असला, तरी अजूनही पाऊस नाही.

उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्याच्या तोंडावर बहुतांश भागात टंचाई जाणवते. मात्र मृगाच्या पावसामुळे दिलासा मिळत असतो. यंदा मात्र परिस्थिती वेगळी होत आहे. कापूस लागवड, पेरणी तर रखडली आहेच; पण सध्या असलेल्या फळबागा, चारापिके, ऊस व भाजीपाला पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.

सध्या पश्‍चिमेकडून जोरदार वारे वाहत आहेत. दिवसभर ढगांची गर्दी होत असली, तरी रात्री चांदणं पडत आहे. बहुतांश वेळा आषाढ, श्रावणात अशी स्थिती असते. यंदा पावसाळ्याच्या सुरवातीलाच अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना पावसाच्या मोठा खंड (बखाडी) पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.  
 

इतर ताज्या घडामोडी
अब आया उंट पहाड के निछे; राजू शेट्टींचा...सोलापूर : शेतकऱ्यांच्या दूध दराच्या प्रश्‍...
सरकार रिलायन्स, पतंजलीच्या दुधाची वाट...नागपूर : एकीकडे समाधानकारक पाऊस पडत असताना...
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस-...नागपूर : कधी देणार कधी देणार...कापूस, धानाला...
पीक सल्ला१६ जुलै ते ३१ जुलैपर्यंत पेरणी लांबल्यास संकरीत...
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...