agriculture news in marathi, : 10% Drought in Dam`s in Nashik District | Agrowon

नाशिक जिल्ह्यातील धरणसाठ्यात १० टक्के घट
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

नाशिक : सप्टेंबरअखेर नाशिक जिल्ह्यातील धरणांचा एकूण उपलब्ध पाणीसाठा ७८ टक्के नोंदवला गेला आहे. मान्सूनचा हंगाम संपला असून, या पाणीसाठ्यात फारशी वाढ होण्याची शक्यता नसून, आहे त्या पाण्यावरच भागवावे लागणार असल्याची स्थिती आहे.

नाशिक : सप्टेंबरअखेर नाशिक जिल्ह्यातील धरणांचा एकूण उपलब्ध पाणीसाठा ७८ टक्के नोंदवला गेला आहे. मान्सूनचा हंगाम संपला असून, या पाणीसाठ्यात फारशी वाढ होण्याची शक्यता नसून, आहे त्या पाण्यावरच भागवावे लागणार असल्याची स्थिती आहे.

गंगापूर, दारणा आणि गिरणा धरण समूहांमध्ये एकूण २४ धरणे आहेत. या धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ६५ हजार ८१४ दशलक्ष घनफूट इतकी आहे. गतवर्षी या धरणांमध्ये आजमितीस ५८ हजार २४५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध होता. परंतु, यंदा केवळ ५१ हजार १०८ दशलक्ष घनफूट एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ७ हजार १३७ दशलक्ष घनफूट पाणी कमी असल्याचे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते. गतवर्षी ८८ टक्क्यांवर असलेला सरासरी पाणीसाठा यंदा ७८ टक्क्यांवर आला आहे.

गिरणात ४८ टक्केच पाणी
गिरणा धरण यंदा निम्मेही भरलेले नाही. त्याची पाणी साठवण क्षमता १८ हजार ५०० दशलक्ष घनफूट आहे. गतवर्षी धरणात १२ हजार १०७ दलघफू म्हणजेच ६५ टक्के पाणीसाठा होता. यंदा तो ८ हजार ८६० दलघफू म्हणजेच ४८ टक्के आहे.

धरणांतील पाणीसाठा (टक्के)

धरण      वर्ष २०१७ २०१८
गंगापूर         १००   ९१
काश्यपी  १००    ९९
गौतमी गोदावरी १०० १००
आळंदी १०० १००
पालखेड ९९   ५२
करंजवण      १००  ९४
वाघाड १००  १००
ओझरखेड १००   ९०
पुणेगाव    ९९     ९२
तिसगाव १०० ९६
दारणा १०० ९३
भावली   १०० १००
मुकणे    ८७ ७४
वालदेवी १०० १००
कडवा १००   ८५
नांदूरमध्यमेश्वर १००    ५९
भोजापूर ९५ ७६
चणकापूर १०० ९७
हरणबारी   १०० १००
केळझर   १००   ९९

 

 

इतर ताज्या घडामोडी
कृषी भूसुक्ष्मजीवशास्त्रातील तथ्येमागील भागामध्ये उल्लेख आलेल्या डॉ. रंगास्वामी...
योग्य वेळी करा कडधान्य पेरणीमूग, उडीद :     मध्यम ते...
नियोजन चारा पिकांचे...सकस चाराउत्पादन केल्यास जास्तीत जास्त पोषणमूल्ये...
संत्रा, मोसंबी उत्पादकांना हेक्टरी एक...अमरावती : जिल्ह्यातील तापमान, पाणीटंचाई आणि...
विखे, क्षीरसागरांना मंत्रीपदे देऊन...नाशिक : ‘‘घटना माहीत असूनही त्याविरोधात निर्णय...
पाऊसकाळातही मराठवाडा टॅंकरग्रस्त औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ५७ लाख...
रत्नागिरी : बळिराजाला आता आर्द्रा...रत्नागिरी :  मृग नक्षत्रात पावसाने पाठ...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील ८४...लातूर  : मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर...
सांगलीसह पश्‍चिमेकडे पाऊस सांगली : दोन दिवसांपासून पावसाने पश्‍चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
सोलापूर झेडपी सदस्यांची दुष्काळापेक्षा...सोलापूर : दुष्काळाच्या दाहकतेत जिल्हा पुरता...
नाशिकमध्ये वांगी ३००० ते ६००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात होणार...पुणे : दरवर्षी शेती कामांसाठी मजुरांची चांगलीच...
बांबू उत्पादनवाढीसाठी पुणे जिल्ह्यातील...पुणे  ः बांबू उत्पादनवाढीसाठी भोर, वेल्हा...
नगर जिल्ह्यातील ६३६ वैयक्तिक पाणी योजना...नगर  ः जिल्ह्यात यंदा दुष्काळाचा सर्वाधिक...
पाच जिल्ह्यांतील ६६८ छावण्यांमध्ये चार...औरंगाबाद  : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत...
पीकविमा अर्ज करण्यासाठी तालुका कृषी...मुंबई ः पीकविम्याबाबतच्या तक्रारी लक्षात...
‘लोकमंगल’प्रकरणी विधान परिषदेत गोंधळमुंबई : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा...
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना लेखी,...मुंबई ः राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील...
दोषी कंपनीलाच शासनाचे १५ कोटींचे...मुंबई : केंद्र सरकारच्या ‘आयएलएफएस’ या...