परभणीच्या शासकीय दुग्धशाळेत १० लाख लिटर दूध संकलन

परभणीच्या शासकीय दुग्धशाळेत १० लाख लिटर दूध संकलन
परभणीच्या शासकीय दुग्धशाळेत १० लाख लिटर दूध संकलन

परभणी : शासकीय दूध योजनेअंतर्गत येथील दुग्ध शाळेतील दूध संकलनात गतवर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत या वर्षी दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. या वर्षी जुलै महिन्यात प्रतिदिन सरासरी ३२ हजार ९१५ लिटर या प्रमाणे एकूण १० लाख २० हजार ३७९  लिटर दूध संकलन झाले. गतवर्षी ४ लाख १२ हजार ४०१ लिटर दुधाचे संकलन झाले होते.

शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील दुग्धशाळेत परभणी, हिंगोली, नांदेड या तीन जिल्ह्यांतील दूध संकलित केले जाते. सध्या परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात एकूण ९५ दूध उत्पादक सहकारी संस्थांमार्फत दूध संकलन केले जाते. तसेच, नांदेड येथील शासकीय दूध शीतकरण केंद्रातील दूधदेखील परभणी येथे आणले जाते. या तीन जिल्ह्यांतून गतवर्षीच्या जुलैमध्ये प्रतिदिन सरासरी १३ हजार ३०३ लिटर याप्रमाणे एकूण ४ लाख १२ हजार ४०१ लिटर दूध संकलन झाले होते. त्यामध्ये परळी संघाच्या ६ हजार ५४ लिटर दुधाचा समावेश होता. यंदाच्या जुलै महिन्यात दूध संकलनात दुपटीहून अधिक वाढ झाली असून, प्रतिदिन सरासरी ३२ हजार ९१५ लिटर याप्रमाणे १० लाख २० हजार ३७९ लिटर दूध संकलन झाले आहे.

पाथरी तालुक्यातील दूध संकलनात मोठी वाढ झाली आहे. गतवर्षी जुलैमध्ये पाथरी तालुक्यात प्रतिदिन सरासरी ५ हजार ३८३ लिटर याप्रमाणे एकूण १ हजार ६६ हजार ८६६ लिटर एवढे संकलन झाले होते. यंदा दूध संकलनात जवळपास तिपटीने वाढ झाली असून, प्रतिदिन सरासरी १४ हजार ७७० लिटर याप्रमाणे एकूण ४ लाख ५७ हजार ८५८ लिटर दूध संकलन झाले.

या वर्षीच्या जुलै महिन्यात परभणी येथील शीतकरण केंद्रावर म्हशीचे १ हजार ३१४ लिटर आणि गायीचे २ लाख ९२ हजार ७०१, असे एकूण २ लाख ९४ हजार १५ लिटर, पाथरी येथील शीतकरण केंद्रांवर गायीचे ४ लाख ५७ हजार ८५८ लिटर, गंगाखेड येथील शीतकरण केंद्रांवर म्हशीचे  १० हजार ७६८ लिटर आणि गायीचे ९६ हजार १६० लिटर, असे एकूण १ लाख ६ हजार ९२८ लिटर, हिंगोली शीतकरण केंद्रावर म्हशीचे ४ हजार ४६३ लिटर आणि गायीचे १ लाख १ हजार ७४१ लिटर, असे एकूण १ लाख ६ हजार २०४ लिटर, नांदेड येथील शीतकरण केंद्रांवर ५५ हजार ३७४ लिटर, असे तीन जिल्ह्यांतील मिळून एकूण १० लाख २० हजार ३७९ लिटर दूध संकलन झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com