लातूर : दहा महसूल मंडळांत १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस

दहा महसूल मंडळांत १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस
दहा महसूल मंडळांत १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस

लातूर ः या वर्षीच्या मृग नक्षत्राला शुक्रवारपासून सुरवात झाली आहे. या नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी लातूर जिल्ह्याला पावसाने धुवून काढले. बहुतांश मंडळांत अतिवृष्टी आहे. रात्रीतून सर्वाधिक १५४ मिलिमीटर पाऊस मदनसुरी महसूल मंडळात पडला आहे; तर दहा महसूल मंडळांत शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. जिल्ह्यात दहा तालुक्यांत एकाच दिवसात पेरणीयोग्य पाऊस पडल्याने या वर्षीच्या खरीप पेरण्या वेळेत होण्याची शक्यता आहे.या वर्षी पाऊस चांगला आहे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यात मृग नक्षत्राला शुक्रवारी सुरवात झाली. पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील दहाही तालुक्यात रात्रभर पाऊस झाला आहे. मदनसुरी महसूल मंडळात १५४ मिलिमीटर पाऊस रात्रीतून पडला आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. दहा महसूल मंडळांतही शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. जिल्ह्यात सरासरी ५५.५१ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

एकाच रात्री महसूल मंडळनिहाय पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे आहे. लातूर ३६, कासारखेडा २७, गातेगाव २५, तांदूळजा १६, मुरूड २७, बाभळगाव ५५, हरंगुळ १२, चिंचोली १६, औसा १०४, लामजना १२५, किल्लारी १२८, मातोळा ८३, भादा ७०, किनिथोट ८२, बेलकुंड ९६, रेणापूर आठ, पोहरेगाव दहा, कारेपूर ३५, पानगाव ३०, उदगीर ५६, मोघा १०६, हेर ८०, देवर्जन ७०, वाढवणा ७६, नळगीर ४२, नागलगाव ७५, अहमदपूर ४४, किनगाव ३२, खंडाळी २२, शिरूर ताजबंद ६२, हाडोळती ३२, अंधोरी ४४, चाकूर ३९, वडवळ नागनाथ ४५, नळेगाव ५२, झरी ३२, शेळगाव ७८, जळकोट १५, घोणसी २२, निलंगा १२९, अंबुलगा ६५, कासारशिरसी ३९, मदनसुरी १५४, औराद शहाजनी ४२, कासारबालकुंदा ९०, निटूर ७७, पानचिंचोली १४२, देवणी ६४, वलांडी ५८, बोरोळ ९०, शिरुर अनंतपाळ १०५, हिसामाबाद ४१.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com