agriculture news in marathi, 10 percent seed sale in Ahmednagar District | Agrowon

नगर जिल्ह्यात बियाण्यांची अवघी दहा टक्के विक्री
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 जून 2018

नगर ः खरिपासाठी जिल्ह्यामध्ये मागील तीन वर्षांची सरासरी गृहित धरून यंदा ६२ हजार ५७६ क्विंटल बियाण्याची मागणी केली. त्यातील जवळपास सत्तर टक्‍क्‍यांपेक्षा अधिक बियाणे उपलब्धही झाले. मात्र, पाऊस नसल्याने बियाण्यांना मागणी नाही. आतापर्यंत साधारण दहा टक्केही बियाण्यांची विक्री झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसोबत बियाणे विक्रेतेही हतबल झाले आहेत. 

नगर ः खरिपासाठी जिल्ह्यामध्ये मागील तीन वर्षांची सरासरी गृहित धरून यंदा ६२ हजार ५७६ क्विंटल बियाण्याची मागणी केली. त्यातील जवळपास सत्तर टक्‍क्‍यांपेक्षा अधिक बियाणे उपलब्धही झाले. मात्र, पाऊस नसल्याने बियाण्यांना मागणी नाही. आतापर्यंत साधारण दहा टक्केही बियाण्यांची विक्री झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसोबत बियाणे विक्रेतेही हतबल झाले आहेत. 

नगर जिल्ह्यामध्ये खरिपात भात, ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस ही पिके प्राधान्याने घेतली जातात. जिल्ह्यामध्ये या वर्षी चार लाख ८० हजार ५५० हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. त्यानुसार नियोजन केले जात आहे. यंदाच्या खरिपासाठी कृषी विभागाने ६२ हजार ५७६ क्विंटल बियाण्याची मागणी केलेली आहे.

मागील तीन वर्षांत २०१५ मध्ये ३१ हजार १३८, २०१६मध्ये ५५०८१, आणि गेल्या वर्षी २०१७ मध्ये ४४१८० क्विंटल बियाण्यांची विक्री झाली होती. त्यानुसार मागील तीन वर्षांत बियाण्यांची केलेली मागणी आणि विक्री याची सरासरी काढून बियाण्यांची मागणी केली आहे. मात्र, यंदा पावसाळा सुरू होऊन पंधरा दिवसांचा कालावधी झाला असला तरी अजूनही पेरणी आणि कापूस लागवडीसाठी अपेक्षित पाऊस नाही. त्याचा गंभीर परिणाम बियाणे विक्रीवर झाला आहे. आतापर्यंत ८० टक्‍क्‍यांपर्यंत बियाणे उपलब्ध झाले आहेत. मात्र, पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना बियाणे घेण्याबाबत उत्साह नाही. जोरदार पाऊस नेमका कधी पडेल, याचीही शाश्‍वती नसल्याने कोणते बियाणे घ्यावे याबाबतही शेतकऱ्यांत साशंकता आहे. 

मूग, उडीद, बाजरीचे क्षेत्र घटणार 
पावसाला उशीर होत असल्याने पेरण्या लांबत आहेत. त्यामुळे आता मूग, उडिदाचे क्षेत्र घटणार आहे. त्याजागी कांदा लागवड होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. लवकर पाऊस आला नाही तर कापसालाही फटका बसू शकतो असे जाणकारांचे मत आहे.

यंदा वेगवेगळ्या नवीन वाणांचे बियाणे उपलब्ध झाले आहे. मात्र, पाऊस नसल्याने बियाण्यांची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांचा उत्साह अजून दिसत नाही. गतवर्षी या दिवसापर्यंत जवळपास पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक बियाणे विक्री झाले होते. त्या तुलनेत यंदा विक्री नाही.
- ऋषभ गांधी, बियाण्यांचे विक्रेते, नगर

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...