agriculture news in marathi, 100 lakh tone sugar production in Maharashtra | Agrowon

राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादन
ज्ञानेश्वर रायते 
शुक्रवार, 22 मार्च 2019

भवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त ऊस असूनही मार्च महिन्यातच साखरेचा उत्पादनाचा आकडा १०० लाख टनांवर पोचला आहे. आतापर्यंत राज्यात ८९३ लाख टन उसाचे गाळप झाले असून, ९९.६८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.  ही उच्चांकी कामगिरी राज्यातील १९५ साखर कारखान्यांनी साधली असून, आतापर्यंत यापैकी ७८ साखर कारखाने बंद झाले आहेत.

भवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त ऊस असूनही मार्च महिन्यातच साखरेचा उत्पादनाचा आकडा १०० लाख टनांवर पोचला आहे. आतापर्यंत राज्यात ८९३ लाख टन उसाचे गाळप झाले असून, ९९.६८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.  ही उच्चांकी कामगिरी राज्यातील १९५ साखर कारखान्यांनी साधली असून, आतापर्यंत यापैकी ७८ साखर कारखाने बंद झाले आहेत.

येत्या मार्चअखेर बहुतांश कारखान्यांचा हंगाम संपेल. मात्र, तोपर्यंत साखरेचे उत्पादन आतापर्यंत झालेल्या १ कोटी ७ लाख टनाला ओलांडून पुढे जाईल. मागील वर्षी १४ मार्चपर्यंत राज्यातील १८६ साखर कारखान्यांनी ८४० लाख टन उसाचे गाळप करून ९३.२० लाख टनापर्यंत साखर उत्पादनाची मजल मारली होती. या वर्षी हुमणीने छळूनही व पाणीटंचाईने मारूनही उसाच्या उत्पादनाचा विक्रमी आकडा राज्याने गाठला आहे.

या विक्रमी साखर उत्पादनाने बहुतांश कारखान्यांकडील स्वतःची गोदामे अपुरी पडली. त्यातही साखरेला उठाव नसल्याने कारखान्यांना तात्पुरती भाडोत्री गोदामे उभारावी लागली आहेत. विशेष म्हणजे, मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षीचा साखर उतारा फक्त ०.०९ टक्‍क्‍यांनी अधिक असूनही कारखान्यांची वाढलेली दैनंदिन गाळपक्षमता, पाऊस कमी असतानाही उसाच्या पिकावर शेतकऱ्यांनी घेतलेली मेहनत, यामुळे उत्पादन वाढले.

राज्यात या हंगामात पुणे व सोलापूर दोन विभाग केल्याने आजअखेर गाळपात कोल्हापूर विभाग ऊसगाळप, साखर उत्पादन व उताऱ्यात राज्यात आघाडीवर राहिला. या विभागातील ३८ साखर कारखान्यांनी २०६ लाख टन उसाचे गाळप करून १२.२८ टक्के साखर उताऱ्याने २५.३२ लाख टन साखर उत्पादित केली. त्या खालोखाल सोलापूर विभागातील ४४ साखर कारखान्यांनी १९९ लाख टन उसाचे गाळप करीत दुसरा क्रमांक मिळविला. मात्र, साखरेच्या उत्पादनात पुणे विभागाने २१.६३ लाख टनाचा आकडा गाठून साखरेचे राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे उत्पादन घेतले.

गळीत हंगामाची आकडेवारी
(ऊसगाळप व साखर उत्पादन लाख टनांत)

विभाग कारखाने गाळप साखर उत्पादन साखर उतारा
कोल्हापूर ३८ २०६.१५ २५.३२ १२.२८
पुणे ३२ १८८.६६ २१.६३ ११.४७
सोलापूर ४४ १९९.९२ २०.४३ १०.२२  
नगर २८ १३४.७१ १४.७७ १०.९७
औरंगाबाद २४ ८२.१८ ८.५३  १०.३९
नांदेड २३ ७३.०५ ८.१० ११.०९
अमरावती ३.२६ ०.३३ १०.३०
नागपूर ५.५५ ०.५५ ९.९७
एकूण १९५ ८९३.४७ ९९.६८ ११.१५

राज्यातील साखर उत्पादन  (लाख टनांत)

  • २००८-०९......४६.१४
  • २००९-१०...... ७१.०६
  • २०१०-११......९०.७२
  • २०११-१२......८९.९६
  • २०१२-१३......७९.८७
  • २०१३-१४...... ७७.१२
  • २०१४-१५.....१०५.१४
  • २०१५-१६.......८४.१५
  • २०१६-१७.......४२ 
  • २०१७-१८......१०७.२१

 

इतर अॅग्रो विशेष
कडवंची : अर्थकारणाला मिळाली बचत गटांची...शेती आणि ग्रामविकासामध्ये महिलांचा महत्त्वपूर्ण...
कडवंची : डाळिंबात तयार केली ओळखकडवंची हे द्राक्षाचे गाव. याच गावातील ज्ञानेश्वर...
कडवंची : रोपवाटिका अन्‌ शेळीपालनाची जोडकडवंचीमधील सखाराम येडूबा क्षीरसागर यांनी केवळ...
कडवंची : पाणंदमुक्‍त रस्त्यांची...रस्ते, पाणी आणि वीज हे शेतीविकासातील महत्त्वाचे...
कडवंची : घरापुरते दूध अन् शेणखतासाठी...द्राक्षाचे गाव असलेल्या कडवंचीमधील प्रत्येक...
कडवंची : पाणलोटाचं स्वप्न साकारकडवंची गावात जल, मृद संधारण, शेती विकासामध्ये...
कडवंची : लोकसहभाग, पाणी व्यवस्थापन हेच...कडवंची गावात द्राक्षातून समृद्धी दिसत असली तर...
‘कडवंची ग्रेप्स’ ब्रँडसाठी कृषी...कडवंची गावाला द्राक्षबागेने आर्थिक स्थैर्य आणि...
कडवंची : संघर्षातून पेललंय आव्हानकडवंचीमधील महिलांनीदेखील द्राक्ष शेतीमध्ये...
कडवंची मॉडेल : कोरडवाहूसाठी दिशादर्शक...मराठवाड्यात पावसावर आधारित कोरडवाहू शेतीला बळकट...
कडवंची : द्राक्षाच्या थेट विक्रीद्वारे...कडवंचीमधील द्राक्ष बागायतदारांनी विविध राज्यांतील...
कडवंची : पीक बदलाच्या दिशेने; पपई...विहीर, शेततळ्याच्या माध्यमातून पाणी उपलब्ध...
कडवंची : जमीन सुपीकतेसाठी बायोगॅस स्लरी कडवंचीमधील शेतकऱ्यांनी बायोगॅस संयंत्राची उभारणी...
कडवंची : बागेला मिळाली यंत्रांची जोडप्रयोगशील द्राक्ष बागायतदार सुरेश दगडू पाटील...
कडवंची : जल, मृद्संधारणातूनच रुजलं...कडवंची गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी खरपुडी...
कडवंची : पाणी व्यवस्थापन, नवतंत्रातून...काटेकोर पाणी आणि खतांचा वापर, पीक व्यवस्थापनात...
कडवंची : खरपुडी ‘केव्हीके’चे रोल मॉडेलकडवंची हे कृषी विज्ञान केंद्राचे पहिले दत्तक गाव...
‘वॉटर बजेट’ कडवंचीचे वैशिष्ट्यपाणलोट विकास, पीक बदल, पूरक उद्योगात मनापासून...
विदर्भातील संत्रा पट्ट्यात आंबिया...नागपूर ः विदर्भातील वाढत्या तापमानाचा संत्रा...
एनएचबी ‘एमडी’चा वाद पंतप्रधानांपर्यंतपुणे : देशातील शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेत...