agriculture news in marathi, 100% work done of e-Pos machine in Jalgaon | Agrowon

जळगावमध्ये ई-पॉसचे १०० टक्के काम पूर्ण
टीम अॅग्रोवन
रविवार, 24 डिसेंबर 2017

जळगाव : जिल्ह्यात खत वितरण व विक्री यासंबंधी पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले ई-पॉस मशिन बसविण्याचे काम १०० टक्के झाले आहे. यातच मध्यंतरी बिघाड झालेले आठ ई-पॉस यंत्र किंवा मशिन दुरुस्त झाले आहे. अडचणी सोडविण्यासाठी खत विक्रेते व अधिकारी यांचा व्हॉट्‌सॲप ग्रुपही तयार करण्यात आला आहे.

जळगाव : जिल्ह्यात खत वितरण व विक्री यासंबंधी पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले ई-पॉस मशिन बसविण्याचे काम १०० टक्के झाले आहे. यातच मध्यंतरी बिघाड झालेले आठ ई-पॉस यंत्र किंवा मशिन दुरुस्त झाले आहे. अडचणी सोडविण्यासाठी खत विक्रेते व अधिकारी यांचा व्हॉट्‌सॲप ग्रुपही तयार करण्यात आला आहे.

जिल्ह्यात एकूण १३६५ नोंदणीकृत खत विक्रेते होते. यातील काही दुकाने बंद झाली तर काही विक्रेत्यांनी विद्राव्य खते विक्री सुरू केली. विद्राव्य खते विक्रेत्यांना ई-पॉस बंधनकारक नाही. फक्त अनुदानित खते विक्रेत्यांना हे मशिन बसविणे बंधनकारक असल्याने सुमारे ३०० ई-पॉस मशिन परत पाठविले आहेत. हे मशिन मराठवाडा विभागात खत कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दिली.

आजघडीला ई-पॉससंबंधीचे १०० टक्के काम झालेले आहे. परंतु काही किरकोळ अडचणी येत आहेत. सर्वच विक्रेत्यांना एकसारख्या अडचणी येत असून, त्यात सर्व्हर डाऊन असणे, मशिनमध्ये आपल्या वाट्याचा खतसाठा न दिसणे, पेपर रोल प्रिंटिंग न होणे, मशिन चार्जिंग न होणे आदींचा समावेश आहे. यासंबंधी कृषी विभागाने एक व्हॉट्‌सॲप ग्रुप तयार केला असून, त्यात केंद्रीय खते मंत्रालयाने राज्यात विविध विभागांसाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांचा, खत कंपन्यांच्या ई-पॉसची कार्यवाही करणाऱ्या प्रतिनिधींचा समावेश आहे. यासोबत अधूनमधून खते मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी दलजित सिंह यांची मदत कृषी विभागातील संबंधित घेतात.

आठ मशिन दुरुस्त
मध्यंतरी राष्ट्रीय केमिकल्स ॲन्ड फर्टिलायझर्सतर्फे पुरविण्यात आलेल्या विदेशी कंपनीच्या बनावटीच्या आठ मशिन चार्ज होत नव्हत्या. त्या कृषी विभागात संबंधित खत विक्रेत्यांनी जमा केले होते. त्यांची संबंधित कंपनीने दुरुस्ती करून ते पुन्हा खत विक्रेत्यांना दिले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दिली.

४० मशिन मागविले
काही मशिन नादुरुस्त झाले व दुरुस्ती लवकर शक्‍य नसली, तर यावर उपाय म्हणून सुमारे ४० मशिन विविध खत कंपन्यांकडून कृषी विभागाने मागवून घेतले आहेत. ते ई-पॉससंबंधी नियुक्त केलेल्या कृषी विभागातील समन्वयक यांच्याकडे असल्याची माहिती मिळाली.

ई-पॉसबाबतच्या किरकोळ तक्रारी, अडचणी आहेत. पण त्या तत्काळ सोडविल्या जात असून, केंद्रीय खते मंत्रालयाचे प्रतिनिधी, खत कंपन्यांचे सहकारी यांचे सहकार्य मिळत आहे. यामुळे १०० टक्के काम जिल्ह्यात होऊ शकले आहे.
- मधुकर चौधरी, कृषी विकास अधिकारी, जळगाव

इतर बातम्या
दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नांदेड...
कृषी क्षेत्रातील उत्पन्नाची तफावत दूर...औरंगाबाद : गेल्या कित्येक वर्षांतील परिवर्तनात...
मोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...
पालखेडमधून आज आवर्तन सोडण्याची तयारीनाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून येत्या दोन...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
पॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे   : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आता कोठे धावे मन । तुझे चरण देखलिया...पंढरपूर, सोलापूर (प्रतिनिधी) :  आता कोठे...
दूध अनुदान योजनेस ३१ जानेवारीपर्यंत...पुणे : राज्यात उत्पादित होणाऱ्या (पिशवी बंद...
दुष्काळग्रस्तांना सरसकट हेक्टरी ५० हजार...मुंबई : राज्यात यंदा १९७२ पेक्षाही भयंकर...
तमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...