सोलापूर जिल्ह्यातील १०१ कृषी केंद्रांना विक्री बंदचे आदेश

जिल्ह्यातील १०१ कृषी  केंद्रांना विक्री बंदचे आदेश
जिल्ह्यातील १०१ कृषी केंद्रांना विक्री बंदचे आदेश

सोलापूर : बार्शी तालुक्‍यात जामगाव येथे द्राक्षबागेमध्ये घडांना वाढनियंत्रक लावताना सात मजूर अत्यवस्थ झाले होते. त्यापैकी एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणानंतर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने तातडीने जिल्ह्यातील कीटकनाशक विक्रीच्या दुकानांवर छापे टाकून उगमपत्र नसलेल्या सुमारे १०१ विक्रेत्यांना कीटकनाशकांच्या विक्री बंदचे आदेश जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एस.पी. बेंदगुडे यांनी दिले आहेत.  विदर्भातील कीटकनाशक फवारणीमुळे झालेला प्रकार आणि त्यात बार्शीतील या प्रकारामुळे कृषी  विभागाने थेट कीटकनाशक विक्रेत्यांच्या दुकानांवर छापे टाकण्याची मोहीम उघडली होती. त्यात १०१ विक्रेत्यांकडे उगम प्रमाणपत्र नसल्याचे आढळून आले. स्वतः कृषी विकास अधिकारी बेंदगुडे यांच्यासह मोहीम अधिकारी दत्तात्रय येळे यांच्या पथकानेही ही कारवाई केली. जिल्ह्यात सर्व ११ तालुक्‍यांमध्ये स्वतंत्र व जिल्हास्तरावर एक अशी एकूण १२ तपासणी पथकांची नियुक्ती केली. कीटकनाशकांचे उगम प्रमाणपत्र नसताना त्याची विक्री सुरू असल्याचे तपासणीत आढळले. सुमारे १०१ दुकानांमध्ये ३७३ प्रकारची कीटकनाशके उगम प्रमाणपत्र नसतानाही विक्रीसाठी असल्याचे आढळले. त्यांची त्वरित विक्री थांबवण्याचे आदेश देण्यात आले असून, २१ दिवसांमध्ये प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत दिल्याचे बेंदगुडे यांनी सांगितले.  विक्री बंदचे आदेश मिळालेली तालुकानिहाय दुकानांची संख्या ः- अक्कलकोट ९, मोहोळ १३, उत्तर सोलापूर ८, करमाळा ७, दक्षिण सोलापूर १२,  माढा २, माळशिरस १२, पंढरपूर ११, मंगळवेढा ६, सांगोला १६, बार्शी ५. आमचीही मोहीम सुरूच राहणार आहे. यापुढेही सर्व विक्रेत्यांना कंपन्यांच्या उगमप्रमाणासाठी सूचना केली आहे. कोणतीही हयगय या कारवाईत होणार नाही. -डॉ. एस.पी. बेंदगुडे, कृषि विकास अधिकारी,  जिल्हा परिषद, सोलापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com