एसटीच्या १०१० रोजंदारी कर्मचाऱ्यांना नव्याने नियुक्ती

एसटीच्या १०१० रोजंदारी कर्मचाऱ्यांना नव्याने नियुक्ती
एसटीच्या १०१० रोजंदारी कर्मचाऱ्यांना नव्याने नियुक्ती

मुंबई : एसटीच्या अघोषित संपात सहभागी झाल्याबद्दल एसटीच्या स्थानिक प्रशासनाने ज्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला होता, त्याना पुन्हा सेवेत घेण्याचे निदेश परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिले होते. त्याप्रमाणे अशा सर्व १०१० कर्मचाऱ्यांना नव्याने नियुक्ती देण्याबाबतचे आदेश महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिले आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना १ जुलै २०१८ पासून नव्याने नियुक्ती दिली जाईल. हे रोजंदारी कर्मचारी महामंडळाच्या सेवेत मागील दोन ते तीन महिन्यांपूर्वीच रुजू झाले होते. या कर्मचाऱ्यांचा अघोषित संपाशी काहीही संबंध नव्हता तरीदेखील हे कर्मचारी संपात सहभागी झाले होते. त्यामुळे एसटीचे आर्थिक नुकसान होताना प्रवाशांची प्रचंड प्रमाणात गैरसोयदेखील झाली. या सर्व पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने अशा सर्व कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली होती. सेवा समाप्तीचा हा निर्णय मागे घेण्याबाबत प्राप्त झालेल्या विनंतीचा सकारात्मक विचार करून हा निर्णय मागे घेण्याबाबत परिवहनमंत्र्यांनी निदेश दिले होते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने या आदेशाचे पालन करत अशा कर्मचाऱ्यांना पुन्हा नव्याने नियुक्ती देण्याचे निश्चित केले असून, यासंदर्भातील परिपत्रक २५ जून २०१८ रोजी निर्गमित केले आहे. या परिपत्रकाप्रमाणे ज्या चालक तथा वाहक (कनिष्ठ), सहायक लिपिक-टंकलेखक (कनिष्ठ) यांनी ८ जून २०१८ व ९ जून २०१८ रोजी झालेल्या अघोषित संपात सहभाग घेतला आहे व ज्यांची सेवा विभाग, घटक प्रमुख यांनी समाप्त केली आहे, अशा सर्व कर्मचाऱ्यांना १ जुलै २०१८ पासून नव्याने नियुक्ती दिली जाईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com