सातारा जिल्ह्यात खरिपातील १०२ टक्के पेरणी

सातारा जिल्ह्यात खरिपातील १०२ टक्के पेरणी
सातारा जिल्ह्यात खरिपातील १०२ टक्के पेरणी

सातारा ः जिल्ह्यात खरीप हंगामातील १०२.४२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. या हंगामात शेतकऱ्यांकडून पिकांत सर्वाधिक सोयाबीन व बाजरीला पसंती दिली असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामातील पहिल्या टप्प्यात पेरण्या झालेल्या पिकांची भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यात कृषी विभागाकडून (ऊस वगळून) दोन लाख ९० हजार ९८३ हेक्‍टर क्षेत्र खरीप पेरणीसाठी नियोजित करण्यात आले होते. त्यापैकी दोन लाख ९१ हजार १३ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पेरणी पाटण तालुक्यात ५९ हजार ९७६ हेक्टवर झाली आहे. पिकांत सर्वाधिक सोयाबीनची सर्वाधिक पेरणी झाली आहे.

जिल्ह्यात ५३ हजार ७५० सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र नियोजित होते. सध्या सोयाबीनची ६० हजार ८७० हेक्‍टर क्षेत्रावर म्हणजेच ११३.२५ टक्के पेरणी झाली आहे. बाजरी ४९ हजार ५३१ हेक्‍टर क्षेत्र नियोजित होते. बाजरीची ५३ हजार २९८ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

खरीप ज्वारीचे २६ हजार ९४५ हेक्‍टर सर्वसाधारण क्षेत्र असून, त्यापैकी २२ हजार २९३ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मक्‍याचे १५ हजार ८४४ हेक्‍टर सर्वसाधारण क्षेत्र असून, मक्‍याची १७ हजार ६३७ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. भुईमूग शेंगांचे ४० हजार ४३० हेक्‍टर सर्वसाधारण क्षेत्र असून, त्यापैकी ३५ हजार ८४५ हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. भात लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. भाताचे ५० हजार ८०५ हेक्‍टर सर्वसाधारण क्षेत्र असून, त्यापैकी ४६ हजार ९५२ हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे.

तालुकानिहाय पेरणी (हेक्‍टरमध्ये) ः सातारा-३५,६९४, जावळी-१६,००१,पाटण-५९,९७६, कऱ्हाड-४६,७१८, कोरेगाव-२३,१७१, खटाव-३७,८३६, माण -३३,२५९, फलटण-११,९०७, खंडाळा-१३,२५३, वाई-१६,३६८, महाबळेश्वर-३,८३०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com