चेतक फेस्टिव्हलमध्ये १०३ अश्‍वांची विक्री

सारंगखेडा, जि. नंदुरबार : येथे सुरू असलेल्या चेतक फेस्टिव्हलमध्ये दाखल झालेले अश्व.
सारंगखेडा, जि. नंदुरबार : येथे सुरू असलेल्या चेतक फेस्टिव्हलमध्ये दाखल झालेले अश्व.

नंदुरबार  ः देशातील प्राचीन व एकमेव एकमुखी दत्त मंदिर आणि सुमारे पावणेचारशे वर्षांची अश्‍वबाजाराची परंपरा असलेली सारंगखेडा यात्रा (चेतक फेस्टिव्हल) रविवारी (ता. ३) उत्साहात सुरू झाली. यात्रेत पंधरवड्यापूर्वीच अश्‍व दाखल झाले होते. सोमवार (ता. ४) अखेर यात्रेत सुमारे १०३ उमद्या अश्‍वांची विक्री झाली. त्यात अंदाजित ४० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती मिळाली आहे.  दत्त जयंतीला रविवारी (ता. ३) राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल, नंदुरबारचे आमदार विजयकुमार गावीत, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष कुमुदिनी गावीत, चेतक फेस्टिव्हल समितीचे अध्यक्ष जयपाल रावल, दोंडाईचा (जि. धुळे) येथील नगराध्यक्ष नयनकुवर रावल, पर्यटन विभागाचे विजय वाघमारे आदी उपस्थित होते. येत्या ३ जानेवारीपर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे. बाजारात दिल्ली, पंजाब, हरियाना, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बडोदा आदी ठिकाणचे अश्‍व विक्रीसाठी आले आहेत. यात्रेच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी ८६ अश्‍वांची विक्री झाली. त्यात २८ लाख रुपयांची उलाढाल झाली, तर सोमवारीही जवळपास १७ अश्‍वांची दुपारपर्यंत विक्री झाली. एकूण ४० लाखांची उलाढाल झाल्याची माहिती मिळाली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com