agriculture news in marathi, | Agrowon

पुणे जिल्ह्यात फलोत्पादन अभियानासाठी १३ हजार ७८९ अर्ज पात्र
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

पुणे  ः एकात्मिक फलोत्पादन अभियानातील (एनएचएम) घटकांच्या अनुदानाचा लाभ देण्यासाठी शेतकऱ्यांकडून ३० जूनपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. पुणे जिल्ह्यातून यासाठी १४  हजार ३२५ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी १३ हजार ७८९ अर्ज पात्र ठरले आहेत. पात्र ठरलेल्या अर्जदारांना अभियानातील घटकांचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावर उद्या (ता. ३) सोडत काढण्यात येणार आहे. या वेळी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कृषी विभागाच्या सूत्रांनी केले.

पुणे  ः एकात्मिक फलोत्पादन अभियानातील (एनएचएम) घटकांच्या अनुदानाचा लाभ देण्यासाठी शेतकऱ्यांकडून ३० जूनपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. पुणे जिल्ह्यातून यासाठी १४  हजार ३२५ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी १३ हजार ७८९ अर्ज पात्र ठरले आहेत. पात्र ठरलेल्या अर्जदारांना अभियानातील घटकांचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावर उद्या (ता. ३) सोडत काढण्यात येणार आहे. या वेळी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कृषी विभागाच्या सूत्रांनी केले.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना २०१८-१९ मध्ये राबविण्यात येत आहे. यातून सुमारे २९ विविध योजनांच्या अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातो. गेल्या वर्षीपासून लाभार्थी निवडण्यासाठी आॅनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. यंदाही आॅनलाइन अर्ज मागवण्यात आले होते. त्यासाठी २० जून ही अंतिम मुदत देण्यात आली होती. खरीप हंगामाची तयारी सुरू असल्याने अनेक शेतकरी शेतीकामात गुंतले होते. तसेच ग्रामीण भागात इंटरनेट सुविधेतील अडचणी, आॅनलाइनमधील त्रुटी अशा विविध कारणांमुळे शेतकऱ्यांना अर्ज दाखल करण्यास वेळ लागत होता. परिणामी अनेक शेतकरी या अभियानातील घटाकापासून वंचित राहणार होते. त्यामुळे या योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्याची दखल घेत या योजनेसाठी अर्ज करण्यास ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

तालुका पातळीवर आलेल्या या अर्जांची छाननी केली असून, ५३९ अर्ज अपात्र ठरले आहेत.  
यंदा या योजनेअंतर्गत हरितगृह, शेडनेट, शेततळे अस्तरीकरण, हरितगृहातील उच्च दर्जाचे लागवड साहित्य, ट्रॅकर, पाॅवर टिलर, शीतगृह, रायपनिग चेंबर, रेफर व्हॅन, पीक संरक्षण साहित्य, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, कांदाचाळ उभारणी, मधुमक्षिकापालन या घटकाकरिता अनुदान दिले जाणार आहे. तसेच सामूहिक शेततळे या घटकाकरिता फक्त अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. शेतकऱ्यांना या घटकाअंतर्गत एक लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍ट्रिक...मुंबई - राज्य सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍...
पाचल ठरले स्मार्ट ग्रामरत्नागिरी - शासनाच्या स्मार्ट ग्राम...
पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी आयुक्तांना नोटीसकोल्हापूर - जयंती नाल्याचे सांडपाणी थेट...
पदोन्नतीत आरक्षणाचा मार्ग मोकळा;...नवी दिल्ली- अनुसुचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांना...
मुलींना बारावीपर्यंत एसटीचा मोफत पासमुंबई - एसटी महामंडळामार्फत ग्रामीण भागातील...
असा होईल गोकुळ दूध संघ ‘मल्टिस्टेट'कोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध उत्पादक सहकारी...
वयाच्या 86 वर्षीही सक्रीय राजकारणात डॉ...नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन...
ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...
लागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...