सांगलीतील प्रकल्पांत अवघा ११ टक्के पाणीसाठा शिल्लक

सांगलीतील प्रकल्पांत अवघा ११ टक्के पाणीसाठा शिल्लक
सांगलीतील प्रकल्पांत अवघा ११ टक्के पाणीसाठा शिल्लक

सांगली ः ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर जिल्ह्यातील लघु व मध्य प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत चालला आहे. ५ मध्यम प्रकल्प आणि ७९ लघु प्रकल्पात अवघा ११ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा तिप्पट पाणीसाठा कमी झाला आहे. 

जिल्ह्यातील जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ आणि तासगाव व इतर काही मंडळांत शासनानकडून गंभीर स्वरूपाचा दुष्काळाची घोषणा केली आहे. पाण्याच्या टंचाईच्या तुलनेत अजूनही टॅंकरने पाणी मिळताना दिसत नाही. टॅंकर मिळवण्यासाठी जाचक अटी घातल्याने ग्रामस्थांना टॅंकर मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते आहे. 

सांगली जिल्ह्यात पाच मध्यम प्रकल्पापैकी ४ मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत. शिराळा तालुक्यातील मोरणा मध्यम प्रकल्पात ४१ टक्के पाणीसाठा आहे. तर उर्वरित सर्व मध्य प्रकल्प कोरडे ठणठणीत आहेत. या मध्यम प्रकल्पामध्ये सिंचन योजनांच्या माध्यमातून पाणी सोडून हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून घेण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहे. मात्र, अद्यापही हे प्रकल्प योजनांच्या माध्यमातून भरण्यात आलेले नाहीत. गेली तीन महिने जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजना सुरू होत्या. 

या योजनेतून केवळ मुख्य कालव्यातून पाणी वाहत लाभ क्षेत्राला मिळाले आहे. पाटबंधारे विभागाकडून योजना सुरू असताना तलाव भरुन घेतले असल्याचा दावा करत आहेत. जर तलाव भरले असते तर मध्यम आणि लघु प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाला नसता. या योजनेच्या लाभ क्षेत्रात असलेल्या मध्यम व लघु प्रकल्पात पाणीच सोडले नाही.

लघुप्रकल्पातील पाणीसाठा
तालुका प्रकल्प संख्या पाणीसाठा दशलक्ष घनफूट टक्केवारी
तासगाव १६.९५१ ५ टक्के
खानापूर ३२.९८६ ६ टक्के
कडेगाव १७४.९९७ २८ टक्के
शिराळा १३ ६.२५३ १ टक्के
जत २६ १४६.३१४ ६ टक्के
कवठेमहांकाळ १० ५४.१९८ ९ टक्के
मिरज ३८.४२८ ३२ टक्के
वाळवा ८.४४४ १७ टक्के
एकूण ७९ ३२७७.६६ ४२ टक्के

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com