नांदेड जिल्ह्यात रब्बीची ११२ टक्के पेरणी

नांदेड जिल्ह्यात रब्बीची ११२ टक्के पेरणी
नांदेड जिल्ह्यात रब्बीची ११२ टक्के पेरणी

नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या रब्बीमध्ये १ लाख ५३ हजार २३५ हेक्टरवर (११२.०९ टक्के) पेरणी झाली आहे. यंदा जिल्ह्यातील रब्बीच्या एकूण पेरणी क्षेत्रामध्ये ६९.५९ टक्के (१ लाख ६ हजार ६३९ हेक्टर) क्षेत्र हरभऱ्याचे आहे. उर्वरित ३०.४१ टक्के ४६ हजार ५९६ हेक्टर क्षेत्रामध्ये ज्वारी, गहू, करडई आदी पिकांचा समावेश आहे.

अर्धापूर, मुदखेड, बिलोली, धर्माबाद, किनवट, माहूर, हदगाव या ७ तालुक्यांत सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा अधिक पेरणी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रब्बीच्या एकूण पेरणी क्षेत्राने सर्वसाधारण क्षेत्राचा टप्पा ओलांडला आहे. परंतु कंधार, मुखेड, देगलूर, नायगाव, उमरी, भोकर, हिमायतनगर, लोहा या तालुक्यांना दुष्काळाचा फटका बसला असून, या तालुक्यातील पेरणी क्षेत्र सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा कमी राहिले आहे.

नांदेड जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ३६ हजार ७१२ हेक्टर आहे. कृषी विभागातर्फे यंदाच्या रब्बीचे पेरणी क्षेत्र अंतिम करण्यात असून, यंदा जिल्ह्यात १ लाख ५३ हजार २३५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या इसापूर येथील धरणाच्या कालव्याच्या पाणी आवर्तनामुळे अर्धापूर, मुदखेड, हदगाव तालुक्यांतील रब्बीच्या क्षेत्रात यंदा मोठी वाढ झाली आहे. 

ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र २६ हजार ९७५ हेक्टर असताना प्रत्यक्षात २० हजार ७१९ हेक्टरवर (७६.८१ टक्के) पेरणी झाली. गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र ३८ हजार ५३८ हेक्टर असताना यंदा २० हजार १९३ हेक्टरवर (५२.४० टक्के) पेरणी झाली. रब्बीतील नगदी पीक म्हणून सोयाबीन नंतर हरभरा घेण्याकडे शेतकऱ्यांचा यंदाही अधिक कल आहे. हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ६२ हजार ३४९ हेक्टर असताना प्रत्यक्षात १ लाख ६ हजार ६३९ हेक्टरवर (१७१.०४ टक्के) पेरणी झाली आहे. 

रब्बीतील प्रमुख गळीत धान्य पीक असलेल्या करडईच्या क्षेत्रात यंदाही मोठी घट झाली आहे. करडईचे सर्वसाधारण क्षेत्र ४ हजार ७६८ हेक्टर असताना प्रत्यक्षात १ लाख ६ हजार ६३९ हेक्टरवर (१७१.०४ टक्के) पेरणी झाली आहे.

 नांदेड जिल्हा तालुकानिहाय रब्बी पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)
तालुका सर्वसाधारण पेरणी क्षेत्र टक्केवारी
नांदेड १८५१२ १६९९५ ९१.८१
अर्धापूर ५५७२ १३०२३ २३३.७२
मुदखेड ५७२० ६६५३ ११६.३१
लोहा ५१२१ ४६५५ ९०.९०
कंधार ७४६५ ४९८३ ६६.७५
देगलूर १०१८८ ८५६३ ८४.०५
मुखेड १०६८९ ५१८१ ४८.४७
नायगाव १२४८५ ७८१९ ६२.६३
बिलोली १२७५२ २२३६१ १७५.३५
धर्माबाद ४७५२ १२५२७ २६३.६२
किनवट ५३८४ १२०४१ २२३.६४
माहूर ३६३० ४४७५ १२३.२८
हदगाव १३६५६ १८७९७ १३७.६५
हिमायतनगर १०५६२ ६९७५ ६६.०४
भोकर ५९३१ ५१४६ ८६.७६
उमरी ४२९३ ३०४१ ७०.८४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com