Agriculture news in Marathi, | Agrowon

डाळिंबावर फुलगळीचा प्रादुर्भाव
अभिजित डाके
रविवार, 19 ऑगस्ट 2018

सांगली ः राज्यात मृग हंगामात ८० ते ९० हजार हेक्‍टरवर डाळिंबाचा बहर धरला जातो. मात्र ढगाळ वातावरण तर कधी रिमझिम पाऊस यामुळे डाळिंबाची फुलगळ होत असून, पीक संकटात सापडले आहे. बदलत्या वातावरणामुळे अंदाजे ३० टक्के फुलगळ होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

सांगली ः राज्यात मृग हंगामात ८० ते ९० हजार हेक्‍टरवर डाळिंबाचा बहर धरला जातो. मात्र ढगाळ वातावरण तर कधी रिमझिम पाऊस यामुळे डाळिंबाची फुलगळ होत असून, पीक संकटात सापडले आहे. बदलत्या वातावरणामुळे अंदाजे ३० टक्के फुलगळ होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

राज्यात दोन हजार हेक्‍टरपेक्षा अधिक डाळिंबाचे क्षेत्र आहे. त्यापैकी अंदाजे ४० ते ४५ टक्के मृग बहरातील डाळिंब पीक घेतले जाते. दुष्काळी पट्ट्यातील डाळिंब उत्पादक हा बहर धरतात. सध्या राज्यात पावसाचा पुन्हा जोर वाढला आहे. मुळात जून महिन्यात काही ठिकाणी डाळिंबाचा मृग बहर धरला आहे, तर काही ठिकाणी पावसाने उशिरा सुरवात केल्याने जुलैमध्ये बहर घेतला आहे. जून महिन्यात ज्या शेतकऱ्यांनी बहर धरला आहे, त्या डाळिंबाचे सेंटिंग चांगले झाले आहे. फळांची वाढदेखील अपेक्षित झाली आहे. मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यात मृग बहर घेतला आहे, त्याची फुलगळ होऊ लागली आहे. 

सातत्याने ढगाळ वातावरण असल्याने परागीकरणासाठी मधमाश्या बागेत येत नाहीत. तसेच रिमझिम पावसामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. आर्द्रता कमी-अधिक होऊ लागली आहे. यामुळे फुलगळ होण्यास प्रारंभ झाला आहे. सगल दुसऱ्या वर्षी फुलगळीचा फटका डाळिंब उत्पादकांना बसला आहे. या बदलत्या वातावरणामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.  

प्रतिक्रिया
वातावरण बदलत आहे. यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी संभ्रमात आहेत, पण शेतकऱ्यांनी धीर सोडता कामा नये. डाळिंबाची योग्य काळजी घेण्यासाठी सल्ल्यानुसार कीडनाशके वा अन्य घटकांचा वापर करावा.  
- शहाजी जाचक, अध्यक्ष, महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघ, पुणे

आमच्या परिसरात पाणीटंचाई असल्याने पावसाळ्यात मृग हंगामाताली डाळिंबाचे उत्पादन घेतो. मात्र, कमी पाऊस आणि बदतल्या वातावरणामुळे मृग हंगामात दोन वेळा फुलगळ झाली. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलो आहे.
- रूपेश गायकवाड, डाळिंब उत्पादक, शेटफळे, ता. आटपाडी
 

इतर अॅग्रो विशेष
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...
देशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...
मराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...
सुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...
पाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...
राज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...
उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...
अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
राज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेतमुंबई ः राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक...
प्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह...वडगाव मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दिवड येथील...
चीनसह बांगलादेशची कापूस आयात वाढणारजळगाव ः देशात आॅगस्टअखेर ११२ लाख हेक्‍टरवर...
भाजीपाला शेतीसह कापूस बीजोत्पादनातील...भाजीपाला पिके तसेच कापूस बीजोत्पादन या पद्धतीतून...
मिर्झापूर ः साखळी शेततळ्यांचे गाव‘मागेल त्याला शेततळे` योजनेअंतर्गत मिर्झापूर (ता...
इजा झाल्यानंतर वनस्पती पाठवतात धोक्याचा...जेव्हा वनस्पतींना इजा होते, त्या वेळी वनस्पतीच्या...
ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...नागपूर  ः ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...
कमी दाब क्षेत्राचे निर्माण; पावसाच्या...पुणे   : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे...
पावसाने ताण दिल्यामुळे खरीप धोक्यातपुणे ः राज्यात काही ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी...
चांदक-गुळूंब अोढा जोडप्रकल्पाने साधली...सातारा जिल्ह्यातील चांदक-गुळुंब (ता. वाई) हा ओढा...