agriculture news in Marathi, 11500 jobs reserve for Maratha community in mega recruitment, Maharashtra | Agrowon

मेगाभरतीत मराठा समाजासाठी साडे ११५०० नोकऱ्या राखीव
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

मुंबई : मराठा आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीचा भाग म्हणून राज्य सरकारने सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी सुधारित बिंदूनामावली विहित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आगामी ७२ हजार सरकारी पदांच्या मेगा भरतीत मराठा तरुण, तरुणींसाठी ११,५२० नोकऱ्या राखीव ठेवण्यात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी (ता. ५) यासंदर्भातील शासन आदेश जारी केला. 

मुंबई : मराठा आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीचा भाग म्हणून राज्य सरकारने सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी सुधारित बिंदूनामावली विहित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आगामी ७२ हजार सरकारी पदांच्या मेगा भरतीत मराठा तरुण, तरुणींसाठी ११,५२० नोकऱ्या राखीव ठेवण्यात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी (ता. ५) यासंदर्भातील शासन आदेश जारी केला. 

सामाजिक आणि शैक्षणिक मागास असा विशेष प्रवर्ग तयार करून त्यामध्ये मराठा समाजाचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्यावतीने विविध आस्थापनांधील शासकीय, निमशासकीय, सेवेत सरळसेवा भरतीच्या विविध पदांसाठी सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी जारी केलेल्या निर्णयानुसार मराठा समाजासाठी १६ टक्के आरक्षण निश्चित केले आहे. या निर्णयानुसार यापुढील सर्व भरतींमध्ये रिक्त असणारी पदे ही सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी म्हणजेच 
मराठा समाजासाठी आरक्षित असणार आहेत.

हा निर्णय राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, शैक्षणिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, शासकीय महामंडळे, विद्यापीठ, सहकारी संस्था, शासकीय उपक्रम इत्यादींना लागू असणार आहे. हा आदेश ३० नोव्हेंबर २०१८ पासून लागू करण्यात आला असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आला असल्याने यापुढील सर्व भरतीमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळणार आहे.

मात्र, त्यापूर्वी सुरू झालेल्या भरतीप्रक्रियेला लागू होणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. सरळसेवा भरतीत आरक्षणाच्या तरतुदीनुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाला समाविष्ट करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने सुधारित बिंदूनामावली निश्चित केली आहे. ५२ टक्के आरक्षणाला धक्का न लावता उर्वरित ४८ टक्के खुल्या प्रवर्गातून मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यात येणार असल्याचे या शासन निर्णयात नमूद करण्यात आले असून यासंदर्भात सुधारित बिंदूनामावली प्रसिद्ध करण्यात आली आहे.

एकूण ७२ हजार पदे भरली जाणार असून, पहिल्या टप्प्यात ३६ हजार तर दुसऱ्या टप्प्यात ३६ हजार पदे भरली जातील. सध्या राज्यात १ लाख ८० हजार पदे रिक्त आहेत. ७२ हजारांपैकी ५ हजार पदे वर्ग १ आणि वर्ग २ संवर्गातील आहेत. ६७ हजार पदे वर्ग ३ आणि वर्ग ४ संवर्गात भरली जातील.

पुढील आठवड्यात जाहिरात
राज्यातील मेगाभरतीची प्रक्रिया सुरू झाली असून ७२ हजार पदांच्या भरतीसाठी पुढील आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध होऊन, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ३० नोव्हेंबर २०१८ रोजी रिक्त असलेली पदे आणि त्यानंतर सरळसेवा कोट्यातील रिक्त होणारी संभाव्य पदे भरताना सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गात यापुढील भरती प्रक्रियेत मराठा समाजाला गणले जाणार आहे.
 

इतर बातम्या
सरकारबी मदत करंना अन्‌ बॅंका कर्ज देईनातनांदेड ः गेल्या वर्षीबी अन्‌ औंदाबी पावसानं मारलं...
पाण्याअभावी संत्राबागा होताहेत सरपणपरभणी ः जिल्ह्यातील प्रमुख संत्रा उत्पादक गाव...
जळगावात दीड हजारांवर शेततळ्यांची कामे...जळगाव ः जिल्ह्यात "मागेल त्याला शेततळे''...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ साधणार...अमरावती ः दुष्काळ, पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर...
दोन्ही शिंदेंना आत्मविश्वास नडला सोलापूर : सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या...
नांदगाव तालुक्यात फळबागा वाचविण्यासाठी...नाशिक : नांदगाव तालुक्यातील फळबागा वाचविण्यासाठी...
सांगोला साखर कारखाना राज्य बँकेच्या...सोलापूर : सांगोला सहकारी साखर कारखाना राज्य...
‘कृष्णे’च्या पाणीपातळीत घटसांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेला पाणीपुरवठा...
अरुणाग्रस्तांचा गाव न सोडण्याचा निर्धारसिंधुदुर्ग : अरुणा प्रकल्पात पाणीसाठा केला, तरी...
बुलडाण्यात मागणी आल्यास तत्काळ टँकर...बुलडाणा  : जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट भीषण...
नांदेड : साडेतेरा हजार हेक्टरवर उन्हाळी...नांदेड : जिल्ह्यात २०१९ च्या उन्हाळी हंगामात १३...
वऱ्हाडात विद्यमान खासदारांनाच पुन्हा...अकोला ः लोकसभा निवडणुकीच्या निकालात गुरुवारी (ता....
पुणे जिल्ह्यातील चौदा कारखान्यांकडे...पुणे   ः जिल्ह्यात गळीत हंगाम संपवून...
नाशिकला हेमंत गोडसे रिपीट, तर डॉ. भारती...नाशिक : नाशिक जिल्ह्यात नाशिक व दिंडोरी लोकसभा...
जळगावात कांदा विक्रीत शेतकऱ्यांची लूटजळगाव ः कांद्याचे दर दबावात असतानाच त्याची विपणन...
जळगावात किसान सन्मान निधीचे वितरण...जळगाव ः खानदेशात सुमारे सव्वादोन लाख शेतकऱ्यांना...
पुणे जिल्ह्यात फळबाग लागवडीसाठी एक...पुणे  ः यंदा खरीप हंगामात फळबाग लागवड करू...
निविष्ठांची तस्करी रोखण्यासाठी...यवतमाळ ः गेल्या वर्षीच्या अनुभवातून बोध घेत...
नगर, शिर्डीत ‘काँटे की टक्कर’ मतात...नगर ः भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या कामावर...
अकरापैकी सहा आमदारांचा लोकसभेत प्रवेशमुंबई ः सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात...