agriculture news in Marathi, 12 bogus crop chopping practice in Marathwada, Maharashtra | Agrowon

मराठवाड्यात पीककापणीचे आणखी १२ बोगस प्रयोग
टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

पुणे : राज्यात पीकविमा कंपन्यांना हाताशी धरून सुरू असलेल्या खोट्या पीककापणी प्रयोगाबाबत अद्याप कारवाई झालेली नसताना, मराठवाड्यात पीककापणीचे आणखी १२ बोगस प्रयोग झाल्याचे उघड झाले आहे. 

पीकविमा कंपनीला नफा होण्यासाठी परभणीच्या सोनपेठ तालुक्यात खोटे पीककापणी प्रयोग झाले होते. त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी ऑक्टोबरमध्ये कृषी आयुक्तालयासमोर उपोषणदेखील केले होते. मात्र, यानंतरदेखील प्रशासनाने कोणतीही चौकशी अथवा कारवाई न केल्याचे स्पष्ट झाले आहे. 

पुणे : राज्यात पीकविमा कंपन्यांना हाताशी धरून सुरू असलेल्या खोट्या पीककापणी प्रयोगाबाबत अद्याप कारवाई झालेली नसताना, मराठवाड्यात पीककापणीचे आणखी १२ बोगस प्रयोग झाल्याचे उघड झाले आहे. 

पीकविमा कंपनीला नफा होण्यासाठी परभणीच्या सोनपेठ तालुक्यात खोटे पीककापणी प्रयोग झाले होते. त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी ऑक्टोबरमध्ये कृषी आयुक्तालयासमोर उपोषणदेखील केले होते. मात्र, यानंतरदेखील प्रशासनाने कोणतीही चौकशी अथवा कारवाई न केल्याचे स्पष्ट झाले आहे. 

"बोगस पीककापणीचे सर्वांत जास्त प्रयोग जिंतूरमध्ये झाल्याचे आमच्या अभ्यासातून निष्पन्न झाले आहे. कृषी आयुक्तालयातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला आम्ही काही दिवसांपूर्वी पुराव्या सकट ही बाब निदर्शनास आणून दिली. मात्र, त्यानंतरदेखील कोणतीही कारवाई झालेली नाही,’’ अशी माहिती शेतकरी विश्वंभर गोरवे यांनी दिली. 

बोगस पीककापणी प्रयोग उघड करण्यासाठी श्री. गोरवे यांच्यासह किरण चक्रपाणी, गणेश पाटील, माउली कदम यांनी जिंतूर भागाचा बारकाईने अभ्यास केला. १२ प्रयोगांमध्ये एकाही ठिकाणी शेतकऱ्याची स्वाक्षरी घेण्यात आलेली नाही. 

"कृषी सहायक, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या संगनमताने कंपन्यांना फायदा होण्यासाठी खोटे प्रयोग घेण्यात आलेले आहेत. सावंगी म्हाळसा, आडगाव, जिंतूर, चारठाणा, बामणी आणि बोरी भागात हे प्रयोग झाल्याचे दाखविताना काही कागदपत्रांवर सारखे हस्ताक्षर दिसून येते. गावसमितीची एकाही प्रयोगावर पंच स्वाक्षरी नाही. कागदपत्र पाहिल्यानंतर हा अधिकारी निरुत्तर झाला,’’ असेही सूत्रांनी स्पष्ट केले. 

विमा कंपनीला फायदा होण्यासाठी तालुका कृषी अधिकाऱअयाची स्वाक्षरी असलेल्या या कागदपत्रांवर सोयाबीनचे सरासरी एकत्रित उत्पन्न ११ क्विंटल ११ किलो दाखविण्यात आले आहे. मुळात, शेतकऱ्यांचे उत्पन्न यंदा तेथे घटले आहे. सरासरी उत्पन्न सात क्विंटलच्या खाली असून, अशा शेतकऱ्यांना विमादेखील मिळाला असता, असा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. 

तत्कालीन आयुक्तांचे ‘रिलायन्स’ला पत्र
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पीकविमा मिळवून देण्यासाठी तत्कालीन कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी स्वतः कंपनीला पत्र लिहिले होते. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीला मराठवाड्यात पीकविम्याचे कंत्राट मिळाले आहे. कंपनीच्या कामकाजाबाबत शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. तसेच, जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील कृषी आयुक्तालयाला पत्र पाठवून काही गंभीर मुद्दे निदर्शनास आणून दिले. सांख्यिकी विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘ तत्कालीन आयुक्तांनी कंपनीला पत्र पाठविले आहे. मात्र, त्याचे उत्तर काय आले याची माहिती नाही.’’ परभणी व सोनपेठ गटातील शेतकऱ्यांना विमा प्रक्रियेत त्रास झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी गंगाखेड गटातील उत्पन्न गृहीत धरून दावे निकाली काढण्याची शिफारस केली. त्यामुळे तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या शिफारसीचा विचार करावा, अशी विनंती तत्कालीन आयुक्तांनी ‘रिलायन्स’ला केली आहे. ‘‘दावे लवकरात लवकर निकाली निघण्यासाठी आम्ही तुमच्या सकारात्मक भूमिकेची अपेक्षा करतो, असेही तत्कालीन आयुक्तांनी लिहिले आहे.’’

इतर बातम्या
जळगावच्या पालकमंत्र्यांचा दौरा पुन्हा...जळगाव : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा...
खानदेशातील पाणीटंचाई गंभीरजळगाव : खानदेशात पाणीटंचाई दिवसेंदिवस बिकट होत...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
खानदेशात अनियमित वीजपुरवठाजळगाव : खानदेशात जलपातळी सातत्याने घटत आहे....
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
नाशिक येथे साकारणार 'देवराई' नाशिक : दुर्मीळ देशी प्रजातींच्या वृक्षांचे...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...