agriculture news in Marathi, 12 candidate declare of per congress and rashtrawadi, Maharashtra | Agrowon

काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी बारा उमेदवार आत्तापर्यंत जाहीर
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 मार्च 2019

मुंबई ः आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी उमेदवार जाहीर करण्यात सध्या तरी पुढे असल्याचे चित्र आहे. या दोन्ही पक्षांनी आतापर्यंत लोकसभेसाठी दोन याद्यांमधून प्रत्येकी बारा उमेदवार जाहीर केले आहेत. दुसरीकडे भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांची अद्यापही घोषणा झालेली नाही.

मुंबई ः आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी उमेदवार जाहीर करण्यात सध्या तरी पुढे असल्याचे चित्र आहे. या दोन्ही पक्षांनी आतापर्यंत लोकसभेसाठी दोन याद्यांमधून प्रत्येकी बारा उमेदवार जाहीर केले आहेत. दुसरीकडे भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांची अद्यापही घोषणा झालेली नाही.

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील काँग्रेस उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर झाल्या आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्रातील आतापर्यंत १२ उमेदवार जाहीर झाले आहेत. दुसऱ्या यादीत दक्षिण मध्य मुंबईमधून माजी खासदार एकनाथ गायकवाड, रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून भंडारी समाजाचे नेते नवीनचंद्र बांदिवडेकर, शिर्डीतून माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, धुळे येथून कुणाल रोहिदास पाटील, नंदूरबारमधून के. सी. पडवी, वर्धा येथून माजी प्रदेशाध्यक्षा प्रभा राव यांच्या कन्या अ‍ॅड. चारुलता टोकस आणि यवतमाळ वाशिममधून माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

त्याआधी पहिल्या यादीत काँग्रेसने माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (सोलापूर), माजी खासदार नाना पटोले (नागपूर), मिलिंद देवरा (मुंबई दक्षिण), प्रिया दत्त (मुंबई उत्तर मध्य) आणि डॉ. नामदेव उसेंडी हे (गडचिरोली-चिमूर) लोकसभा मतदारसंघातून यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसनेही आतापर्यंत दोन याद्या जाहीर केल्या आहेत. दुसऱ्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. पार्थ पवार यांच्यासाठी माढामधून माघार घेत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले आहे. राष्ट्रवादीने प्रसिद्ध अभिनेते अमोल कोल्हे यांना शिरूरमधून उमेदवारी जाहीर केली आहे.

अमोल कोल्हे आधी शिवसेनेमध्ये होते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना नाशिकमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. नाशिकच्या शेजारी असलेल्या दिंडोरीमधून धनराज महाले, बीडमधून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. 
राष्ट्रवादीने पहिल्या यादीत बारामतीतून सुप्रिया सुळे, रायगडमधून सुनील तटकरे, कोल्हापुरातून धनंजय महाडिक, साताऱ्यातून उदयनराजे भोसले, कल्याणमधून बाबाजी पाटील, ठाण्यातून आनंद परांजपे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

हातकणंगले या ठिकाणी राजू शेट्टींना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. तर नगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने नगर शहरचे आमदार संग्राम अरुण जगताप यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाकडून डॉ. सुजय विखे यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचे मानले जाते. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा असून राष्ट्रवादी २२ जागा लढवणार आहे.

तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि माजी खासदार अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील ४८ पैकी ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. लोकसभेसाठी धनगर, दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिम उमेदवार देऊन आंबेडकरांनी लोकसभा निवडणुकीसाठी सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग केला आहे. आघाडीच्या पहिल्या यादीत अकोला आणि सोलापूरच्या उमेदवारांचा समावेश नाही. या दोन्ही मतदारसंघांतून खुद्द प्रकाश आंबेडकर निवडणूक लढण्याची शक्यता आहे. 

इतर ताज्या घडामोडी
परभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
कोकणात चांगल्या पावसाची शक्यतामहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४...
ढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे...बागेत कमी झालेले तापमान, निघालेल्या बगलफुटीमुळे...
खरीप नियोजन : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी...सोयबीनच्या झाडाचा पालापाचोळा, अवशेष  जमिनीवर...
नाशिक जिल्ह्यात मेंढपाळांची चारा-...नाशिक : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत चारा-...
तिसगाव येथे ऊस वाढ्यांचे भाव...तिसगाव, जि. नगर : ऊस चाऱ्याचे भाव अचानक तिसगाव (...
पुणे झेडपी : भाकड कालावधीत...पुणे : जिल्हा परिषदेच्या अनुसूचित जाती, जमातीच्या...
मराठवाड्यात शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची...औरंगाबाद : जूनच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी...
केळी दरप्रश्‍नी रावेर येथे शेतकऱ्यांचा...जळगाव ः केळीची खानदेशात जाहीर दरांनुसारच खरेदी...
मका, हळद, हरभरा किमतीत वाढमक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या हमी...
पावसाळ्यात टाळा विजेचे धोकेओलसर हातांनी वीज उपकरणे हाताळू नयेत. त्यात...
डाळिंब बागेतील मर रोगाचे नियंत्रणडाळिंब लागवड शक्यतो गादी वाफ्यावर करावी, त्यामुळे...
खानदेशात लाल कांद्याची आवक घटली; दर...जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत १२२९...नागपूर ः लागवड ते कापणीपर्यंत तंत्रशुद्ध शेती...
बुलडाणा येथे महिलांनी गिरविले बीज...बुलडाणा ः कृषी विभागाची कृषी तंत्रज्ञान...
येवला तालुक्यात कापूस लागवडीला सुरवातनाशिक : मृग नक्षत्रात पावसाने जिल्ह्यात विविध...
सांगली : शनिवारपासून पीकविमा खात्यात...सांगली ः पीकविमा योजनेअंतर्गत आंबिया बहर...
नगर : खरिपात साडेपाच लाख हेक्‍टरवर...नगर : गतवर्षी पावसाने दडी मारल्याने खरीप, रब्बी...
बीडसाठी भरणार मुळा धरणातून टॅंकरराहुरी, जि. नगर : ‘‘मराठवाड्यातील बीड जिल्ह्याची...
रत्नागिरी जिल्ह्यात पेरणीच्या कामाला वेगरत्नागिरी ः वायू चक्रीवादळाचा परिणाम सलग तिसऱ्या...