agriculture news in marathi, 120 ton banana daily export to UAE from raver and Shahada | Agrowon

आखातात रावेर, शहाद्यातून प्रतिदिन १२० टन निर्यात
चंद्रकांत जाधव
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

जळगाव : अफगाणिस्तान, पाकिस्तानात रस्त्याने होणारी रोजची वाहतूक ठप्प झाल्याने महिन्याला एक हजार मेट्रिक टन केळीची निर्यात रोडावली आहे. देशातून जहाजाद्वारे अफगाणिस्तान व पाकिस्तानात होणारी निर्यातही अधिकचा वेळ आणि खर्च, यामुळे रखडतच सुरू आहे. केळी दरावर दबाव वाढला असून, निर्यातक्षम केळी उत्पादकांना क्विंटलमागे ऑनचा (जादा) ३०० रुपये दर देण्यास निर्यातदार असमर्थता दाखवित आहेत. परिणामी रावेर (जि. जळगाव) व शहादा (जि. नंदुरबार) येथील केळी उत्पादकांना महिन्याला सुमारे १२०० कोटी रुपयांचा फटका बसत आहे. 

जळगाव : अफगाणिस्तान, पाकिस्तानात रस्त्याने होणारी रोजची वाहतूक ठप्प झाल्याने महिन्याला एक हजार मेट्रिक टन केळीची निर्यात रोडावली आहे. देशातून जहाजाद्वारे अफगाणिस्तान व पाकिस्तानात होणारी निर्यातही अधिकचा वेळ आणि खर्च, यामुळे रखडतच सुरू आहे. केळी दरावर दबाव वाढला असून, निर्यातक्षम केळी उत्पादकांना क्विंटलमागे ऑनचा (जादा) ३०० रुपये दर देण्यास निर्यातदार असमर्थता दाखवित आहेत. परिणामी रावेर (जि. जळगाव) व शहादा (जि. नंदुरबार) येथील केळी उत्पादकांना महिन्याला सुमारे १२०० कोटी रुपयांचा फटका बसत आहे. 

मागील २० ते २५ दिवसांपासून केळीवरील ऑनचे दर मिळणे बंद झाले आहे. रावेर व शहादा येथे दर महिन्याला सुमारे चार हजार मेट्रिक टन केळीची उलाढाल होते.  पाकिस्तान, अफगाणिस्तानमध्ये विनाअडथळा निर्यात सुरू असताना केळी उत्पादकांना खरेदीदार किंवा निर्यातदार क्विंटलमागे ३०० रुपयांपर्यंत ऑनचे दर देत होते. यात सुमारे १३५० ते १४०० रुपये प्रतिक्विंटलचे दर रावेर व शहादा येथील केळी उत्पादकांना मिळत होते. परंतु निर्यातीसंबधी अडचणी वाढल्या आणि उष्णता वाढताच केळीची आवकही अधिक आहे.  

जम्मू व काश्‍मिरातून पुढे पाकिस्तानात होणारी केळीची निर्यात सुमारे दीड महिन्यापासून बंद असून, जहाजाद्वारे तेथे केळीची निर्यात मध्यंतरी पुणे भागातील निर्यातदारांनी सुरू केली. परंतु कराची बंदर अनेकदा कंटनेर उतरविण्यास उपलब्ध होत नाही. मग केळी निर्यातदारांना  इराणमधील अब्बास बंदरावर केळी पाठवावी लागते. तेथेही पाकिस्तान व अफगाणिस्तानमध्ये पाठविली जाणारी केळी तीन तीन दिवस पडून राहायची, कारण वाहतूकदार व सुरक्षेचे मुद्दे अधिक वेळ घेतात. निर्यात खर्च वाढल्याने तेथील व्यापाऱ्यांनाही जादा दरात केळी खरेदी करावी लागत आहे. ते त्यांना परवडत नसल्याने मागणी कमी झाली असून, त्याचा निर्यातीवर परिणाम झाला आहे. 

मध्य पूर्व आखातात मागणी
इराण, बहरीन, ओमन, सौदी अरेबिया आदी आखाती देशांमध्ये केळीची मागणी आहे. इराणमधील आयातदारांनी फिलिपिन्समध्ये केळीची करार शेती सुरू केली आहे, परंतु तेथे हंगाम संपल्याने केळीचा तुटवडा आहे. त्यामुळे इराणमधून भारतीय केळीची सातत्याने मागणी असून, रावेर, बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) व शहादा येथून इराण येथे केळी पाठविली जात आहे. आखातात रावेर येथून रोज चार कंटेनर (एक कंटेनर २० मेट्रिक टन) व शहादा येथून दोन कंटनेर केळी पाठविली जात आहे. 

बडवानी (मध्य प्रदेश) येथील केळीला उष्णता व अयोग्य जल व्यवस्थापनाचा फटका बसला असून, निर्यातक्षम केळी तेथे सध्या उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे. निर्यातीसाठी तेथे दोन कंपन्या पोचल्या होत्या. एका कंपनीने केळी पॅकिंग व इतर कार्यवाहीसाठी चार अधिकारी (वेंडर) यांची नियुक्तीही केली होती. तेथून प्रतिदिन दोन कंटनेर केळीची खरेदी करण्याचे नियोजन संबंधित कंपन्यांनी केले होते. परंतु केळीवरील चमकदारपणा हवा तसा नाही. केळीचा घेर व लांबी यासंबंधीदेखील समाधानकारक स्थिती नसल्याने बडवानी येथून केळी निर्यातदार कंपन्यांनी गाशा गुंडाळला असून, रावेर व शहादाकडे या कंपन्या दाखल झाल्या आहेत. 

इतर अॅग्रो विशेष
शेतीचे वास्तव यावे पुढेसंबंधित विभागाकडील उपलब्ध माहिती, आकडेवारी हाच...
कृषी निर्यात दुपटीसाठी ‘राष्ट्रीय धोरण’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील...
मराठवाड्यात महारेशीम अभियानाला सुरवात औरंगाबाद ः रेशीम उद्योगातून शेतकऱ्यांचे जीवनमान...
जळगावमधील सर्वच तालुके दुष्काळीजळगाव : जिल्ह्यातील सर्व गावांची अंतिम पैसेवारी...
परभणीची खरिपाची अंतिम पैसेवारी ४४.६९...परभणी ः परभणी जिल्ह्याची खरीप हंगामाची अंतिम...
औरंगाबादमध्ये २७ डिसेंबरपासून ‘ॲग्रोवन’...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञान व...
एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांचे होणार...सोलापूर : यंदाच्या गाळप हंगामात संबंधित...
किमान तापमानात वाढ पुणे  : ‘पेथाई’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे...
विदर्भातील तीन जिल्हा बँकांचे विलीनीकरण...मुंबई: राज्यातल्या सामान्य शेतकऱ्यांच्या...
रब्बी कर्जवाटपाचे नियोजन कोलमडलेपुणे  : राज्यात यंदा दुष्काळ, कर्जवसुलीतील...
मराठवाड्यातील दुष्काळाची पैसेवारीने...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ८५३३...
औषधी जायफळाचे मूल्यवर्धनजायफळ सालीचे वजन ६० टक्के असते. जायफळ सालीमध्ये...
पीकविम्यासाठी राज्यात तक्रार समित्या...पुणे : पीकविमा देताना कंपन्यांकडून होणारी लूट होत...
अल्पभूधारक कुटुंबाच्या आयुष्यात...पारंपरिक पिकांना पूरक व्यवसायांची जोड दिली तर...
कलमे, रोपबांधणी कलेचे रोजगारात केले...औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्‍यातील रजापूर...
कांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरणसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला...
‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूसजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने...
देशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये...पुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी...
स्थानिकीकरणातही मका टिकवून आहे काही मूळ...जंगली मका प्रजातीपासून स्थानिकीकरण होण्याच्या...
कर्नाटकसाठीची ऊसतोडणी मंदावलीकोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रात उसाची रक्कम...