परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात बाराशे ई-पॉस मशिन कार्यरत

परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात बाराशे ई-पॉस मशिन कार्यरत

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात रासायनिक खत विक्रेत्यांना पुरवठा करण्यात आलेल्या पीओएस मशिन पैकी १,१७८ ‘पॉस’ मशिन कार्यरत झाल्या आहेत, अशी माहिती कृषी विकास अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. मात्र, काही ठिकाणी सर्व्हर डाउन, नेटकनेक्टीव्हीटीचा अभाव आदी समस्या येत असल्यामुळे ‘पॉस’ मशिनद्वारे खतविक्रीत अडचणी येत आहेत, असे कृषी निविष्ठा विक्रेता संघटनेच्या सूत्रांनी सांगितले.  नांदेड जिल्ह्यातील विक्रेत्यांना ६१७ ‘पॉस’ मशिन देण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५६७ मशिन कार्यरत झाल्या आहेत. अतिरिक्त ४२८ मशिनची मागणी करण्यात आली होती त्यापैकी २०० मशिनचा पुरवठा लवकरच करण्यात येणार आहे. परभणी जिल्ह्यातील खत विक्रेत्यांना ४२२ ‘पॉस’ मशिन वितरित करण्यात आल्या आहेत. यापैकी ३४० मशिन कार्यान्वित झाल्या आहेत. १२ मशिन नादुरुस्त आहेत. ८० टक्के मशिनवर खतसाठ्याची माहिती अपलोड करण्याचे काम पूर्ण झाले आहे. हिंगोली जिल्ह्यातील खत विक्रेत्यांना ३०० पीओएस मशिन वितरित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी २७१ मशिन कार्यान्वित झाल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com