agriculture news in marathi, 121.64 LMT of wheat procured in Punjab | Agrowon

पंजाबात गव्हाची १२१ लाख टनांपेक्षा अधिक खरेदी
वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

चंडीगड : पंजाब राज्यात सरकारी संस्था आणि खासगी व्यापाऱ्यांकडून आत्तापर्यंत (ता.५) १२१.६४ लाख टन गव्हाची हमीभावाने शासकीय खरेदी करण्यात आल्याची माहिती सरकारच्या प्रवक्त्याने दिली. यात सरकारी संस्थांकडून १२१.१५ लाख टन आणि खासगी व्यापाऱ्यांकडून ४९१५७ टन पुनर्खरेदी करण्यात अाली असून एकूण खरेदीपैकी ९७.६० लाख टन गहू मंडींमधून उचलण्यात आला अाहे. 

चंडीगड : पंजाब राज्यात सरकारी संस्था आणि खासगी व्यापाऱ्यांकडून आत्तापर्यंत (ता.५) १२१.६४ लाख टन गव्हाची हमीभावाने शासकीय खरेदी करण्यात आल्याची माहिती सरकारच्या प्रवक्त्याने दिली. यात सरकारी संस्थांकडून १२१.१५ लाख टन आणि खासगी व्यापाऱ्यांकडून ४९१५७ टन पुनर्खरेदी करण्यात अाली असून एकूण खरेदीपैकी ९७.६० लाख टन गहू मंडींमधून उचलण्यात आला अाहे. 

संगूर जिल्ह्यात एकूण १०.९६ लाट न खरेदी झाली असून, या पाठोपाठ पतियाळा ८.९३ लाख टन, भटिंडा ८.८७ लाख टन येथे सर्वाधिक शासकीय खरेदी झाली आहे. शासकीय संस्थांनुसार पुणग्रेन (पंजाब ग्रेन) ने २८ लाख ३ हजार ३५७ टन (एकूण खरेदीच्या २३ टक्के) खरेदी केली आहे. मार्कफेडने २६ लाख ६७ हजार ९६२ टन (२१.९ टक्के), पुणसूपकडून २३ लाख ४१ हजार ६१३ टक्के (१९.३ टक्के), पंजाब राज्य वखार महामंडळाकडून १६ लाख ५५ हजार ३०५ टन (१३.६ टक्के), पंजाब कृषी-अन्न महामंडळाकडून १२ लाख ७ हजार ३९० टन (९.९ टक्के), एफसीआय १४ लाख ३८ हजार ८९७ टन (११.८ टक्के) गहू खरेदी करण्यात अाली अाहे. तर खासगी व्यापाऱ्यांकडून एकूण खरेदीच्या ०.४ टक्के (४९ हजार १५७ टन) खरेदी करण्यात अाली असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

हरियाणात मोहरीची खरेदी
हरियाणात राज्य सहकारी पुरवठा आणि पणन महामंडळाकडून आत्तापर्यंत १.७७ लाख टन मोहरीची हमीभावाने खरेदी करण्यात अाली आहे. या खरेदीचा ९१ लाख ७१९ शेतकऱ्यांना थेट लाभ झाला अाहे. महामंडळाच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार भिवानी जिल्ह्यात ३९ हजार ७३८.५० टन, खार्की दादरीत ८२७५.६० टन, फतेहबाद येथे ४५५७.६० टन, गुडगाव येथे ११ हजार ४७२.७७ लाख टन, नूह येथे १३६८.५६ टन, हिसार येथे १९,३२८ टन, जिंद १०७४.१० टन, जाजर येथे १७ हजार २५६.६० टन, कर्नाल येथे १७३.३० टन, महेंद्रगड येथे २३ हजार ४१७.७४ टन, रेवारी येथे २१ हजार २१२.६० टन, रोहतक येथे १० हजार ८.६० टन आणि सिरसा येथे १९ हजार १८१ .६० टन मोहरीची शासकीय खरेदी करण्यात                             आली. 

इतर अॅग्रोमनी
स्वदेशी इथेनॉलमुळे एक लाख कोटींची होणार...सोलापूर : यंदा पेट्रोलियम मंत्रालयास...
नियोजनबद्ध, हंगामनिहाय पीकपद्धतीतून...पाल (जि. सातारा) येथील जयवंत बाळासाहेब पाटील...
"पतंजली'चे डेअरी प्रॉडक्‍टमध्ये पदार्पणनवी दिल्ली ः योग गुरू बाबा रामदेव यांच्या "पतंजली...
गहू, हरभरा, गवार बीच्या भावात वाढया सप्ताहात कापसाखेरीज इतर पिकांचे भाव घसरले....
इथेनॉलच्या भावात वाढीचा निर्णयनवी दिल्ली : इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देऊन...
महाराष्ट्रातील सोयाबीन पेंड खरेदीसाठी...मुंबई : राज्यात उत्पादित होणाऱ्या सोयाबीन...
पडझडीनंतर सुधारणा; वाढत्या प्लेसमेंटचा...श्रावणाच्या शेवटच्या आठवड्यात साचलेल्या मालामुळे...
गव्हाच्या फ्युचर्स भावात मर्यादित वाढया सप्ताहात कापूस व हरभरा यांचे भाव घसरले....
पोल्ट्रीतील मंदीचे सावट दिवाळीपर्यंत...नागपूर : धार्मिक सण-उत्सवाच्या परिणामी ब्रॉयलर...
शेतमाल विक्री व्यवस्थेत सुधारणांची गरजशेतमाल आणि अन्य उत्पादनांच्या विक्री व्यवस्थेत...
कापूस उत्पादनासह प्रक्रियेचाही घेतलाय...१२५ एकरवरील कपाशीचे काटेकोर नियोजन करत उत्पादकता...
वजनरूपी पुरवठ्यात वाढ; बाजारात नरमाईनाशिक विभागात शनिवारी (ता. १) ६२ रु....
प्राथमिक प्रक्रियेतून मूल्यवर्धनआजच्या शेतीच्या बहुतांश समस्या या कापणी-मळणीनंतर...
नोंदी आणि सांख्यिकी विश्लेषणाशिवाय...उद्योगाचे अर्थचक्र हे मागणी आणि पुरवठ्याच्या...
भारतीय कापसाला कमी उत्पादकतेचे ग्रहणजगभरात कापूस हे एक प्रस्थापित नगदी पीक आहे. या...
सोयाबीन, कापसाच्या फ्युचर्स भावात घटया सप्ताहात चांगल्या पावसामुळे गहू वगळता सर्व...
खप घटल्याने ब्रॉयलर्स नरमले, बाजार...नाशिक विभागात शनिवारी (ता. २५) रोजी ६६ रु....
हळदीच्या स्थानिक, निर्यात मागणीत वाढया सप्ताहात शेतमालाच्या किमती स्थिर राहिल्या. मका...
राजस्थानात थेट शेतकऱ्यांकडून कापूस...कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) यंदाच्या...
देशातील ५२ टक्के शेतकरी कुटुंबे...२०१५-१६ या वर्षात देशातील शेतकरी कुटुंबांचे...