agriculture news in marathi, 123 crore for onion storage, Maharashtra | Agrowon

कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधी
टीम अॅग्रोवन
रविवार, 23 सप्टेंबर 2018

नगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत यंदा राज्यातील १४ हजार १४३ शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात कांदाचाळीचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी २८ जिल्ह्याला १२३ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यंदा  कांदाचाळीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केलेले असून, प्रत्येक तालुक्‍यात सोडत पद्धतीने क्रमावारी करून यादी निश्‍चित केलेली आहे.

नगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत यंदा राज्यातील १४ हजार १४३ शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात कांदाचाळीचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी २८ जिल्ह्याला १२३ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यंदा  कांदाचाळीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केलेले असून, प्रत्येक तालुक्‍यात सोडत पद्धतीने क्रमावारी करून यादी निश्‍चित केलेली आहे.

यंदा शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या विविध योजनांच्या लाभासाठी ऑनलाइन अर्ज मागवले होते. त्यानुसार ३ लाख २१ हजार ५०० शेतकऱ्यांनी अर्ज केलेले असून, त्यातील कांदाचाळीची मागणी करणारे सुमारे दीड लाखाच्या जवळपास अर्ज आहेत. शासनाने पहिल्या टप्प्यात २८ जिल्ह्यांसाठी १२३ कोटी ७५ लाख रुपये मंजूर केलेले आहेत. त्यातून सर्वसाधारण प्रवर्गातील ११३२५, अनुसूचित जातीचे १४५४ व जमातीचे १३६४, अशा १४ हजार १४३ लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.

कांदा उत्पादन घेतले जात नसलेल्या नागपूर, गडचिरोली, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी मात्र निधी दिलेला नाही. मागणी अर्ज अधिक असल्याने सोडत पद्धतीने निवडी यादी निश्‍चित केली असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले. मात्र प्राप्त निधीचा विचार करता पहिल्या टप्प्यात मागणीच्या तुलनेत दहा टक्केही लोकांना कांदाचाळीचा लाभ मिळणार नाही.

जिल्हानिहाय उपलब्ध झालेला निधी
ठाणे ः ८७ हजार ५००, नाशिक ः २० कोटी ७३ लाख, धुळे ः ४ कोटी २८ लाख, नंदुरबार ः १ कोटी ५२ लाख, जळगाव ः २ कोटी ७१ लाख, पुणे ः ६ कोटी १२ लाख, नगर ः २७ कोटी ९७ लाख, सोलापूर ः ४ कोटी ३७ लाख, कोल्हापूर ः १ लाख ७५ हजार, सातारा ः ७८ लाख ७५ हजार, सांगली ः १४ लाख, औरंगाबाद ः १३ कोटी १२ लाख, जालना ः ८ कोटी ५ लाख, बीड ः १० कोटी सहा लाख, लातूर ः ५ कोटी २५ लाख, नांदेड ः ३० लाख ६२ हजार, परभणी ः ३ कोटी ४१ लाख, हिंगोली ः २६ लाख, उस्मानाबाद ः ५ कोटी २५ लाख, अमरावती ः २२ लाख ७५ हजार, अकोला ः ८७ लाख ५० हजार, वाशीम ः १९ लाख, यवतमाळ ः २ कोटी ३६ लाख, बुलडाणा ः ५ कोटी ३३ लाख, चंद्रपूर ः ९ लाख ६२ हजार, गोंदिया ः १ लाख ७५ हजार, भंडारा ः ४ लाख ३७ हजार, वर्धा ः १९ लाख २५ लाख.

इतर अॅग्रो विशेष
शेतीचे वास्तव यावे पुढेसंबंधित विभागाकडील उपलब्ध माहिती, आकडेवारी हाच...
कृषी निर्यात दुपटीसाठी ‘राष्ट्रीय धोरण’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील...
मराठवाड्यात महारेशीम अभियानाला सुरवात औरंगाबाद ः रेशीम उद्योगातून शेतकऱ्यांचे जीवनमान...
जळगावमधील सर्वच तालुके दुष्काळीजळगाव : जिल्ह्यातील सर्व गावांची अंतिम पैसेवारी...
परभणीची खरिपाची अंतिम पैसेवारी ४४.६९...परभणी ः परभणी जिल्ह्याची खरीप हंगामाची अंतिम...
औरंगाबादमध्ये २७ डिसेंबरपासून ‘ॲग्रोवन’...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञान व...
एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांचे होणार...सोलापूर : यंदाच्या गाळप हंगामात संबंधित...
किमान तापमानात वाढ पुणे  : ‘पेथाई’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे...
विदर्भातील तीन जिल्हा बँकांचे विलीनीकरण...मुंबई: राज्यातल्या सामान्य शेतकऱ्यांच्या...
रब्बी कर्जवाटपाचे नियोजन कोलमडलेपुणे  : राज्यात यंदा दुष्काळ, कर्जवसुलीतील...
मराठवाड्यातील दुष्काळाची पैसेवारीने...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ८५३३...
औषधी जायफळाचे मूल्यवर्धनजायफळ सालीचे वजन ६० टक्के असते. जायफळ सालीमध्ये...
पीकविम्यासाठी राज्यात तक्रार समित्या...पुणे : पीकविमा देताना कंपन्यांकडून होणारी लूट होत...
अल्पभूधारक कुटुंबाच्या आयुष्यात...पारंपरिक पिकांना पूरक व्यवसायांची जोड दिली तर...
कलमे, रोपबांधणी कलेचे रोजगारात केले...औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्‍यातील रजापूर...
कांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरणसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला...
‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूसजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने...
देशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये...पुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी...
स्थानिकीकरणातही मका टिकवून आहे काही मूळ...जंगली मका प्रजातीपासून स्थानिकीकरण होण्याच्या...
कर्नाटकसाठीची ऊसतोडणी मंदावलीकोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रात उसाची रक्कम...