agriculture news in Marathi, 125 loss in sangali districts, Maharashtra | Agrowon

जत तालुक्यात वादळाने १२५ कोटींचे नुकसान
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

सांगली  : जत तालुक्यातील रामपूर, मल्लाळ, येळदरी, बागेवाडी, कंठी, वाषाण, बेळुंखी व खलाटी या आठ गावांना वादळी वारे व गारपिटीचा जोरदार तडाखा बसला. त्यामुळे २२४ हेक्टरमधील द्राक्षे, डाळिंब, पपई, मका, ज्वारी, ऊस या पिकांचे आणि पंचवीस घरांचे नुकसान झाले. वादळ व गारपिटीमुळे सुमारे सव्वाशे कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सांगली  : जत तालुक्यातील रामपूर, मल्लाळ, येळदरी, बागेवाडी, कंठी, वाषाण, बेळुंखी व खलाटी या आठ गावांना वादळी वारे व गारपिटीचा जोरदार तडाखा बसला. त्यामुळे २२४ हेक्टरमधील द्राक्षे, डाळिंब, पपई, मका, ज्वारी, ऊस या पिकांचे आणि पंचवीस घरांचे नुकसान झाले. वादळ व गारपिटीमुळे सुमारे सव्वाशे कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

गुरुवारी सायंकाळी तालुक्यात गारपीट व जोरदार वादळी वारे यांनी अक्षरशः थैमान घातले. दुष्काळाने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांवर निसर्गाचा पुन्हा कोप झाला. आठ गावांच्या परिसरात सोसाट्याचा वारा व चक्रीवादळाने हाहाःकार माजिवला. अनेक झाडे उन्मळून पडली. पिके जमीनदोस्त झाली.वादळानंतर अचानक गारपिटीस सुरवात झाली. त्यात द्राक्ष, पपई, हळद, मका यांना  सर्वाधिक फटका बसला. रामपूर येथील १२६ हेक्टर मधील द्राक्ष, हळद, मका व पपई या पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे.

उसाचे पन्नास टक्के नुकसान झाले आहे. घाटगेवाडीत खुद्दाबक्ष महेबूब मुल्ला व त्यांच्या भावांच्या वीस एकर द्राक्षबागेचे व दोन एकर मक्याचे मोठे नुकसान झाले आहे. बागेवाडी येथील ३१ हेक्टर क्षेत्रातील द्राक्षबागा व ऊस पिकाचे नुकसान झाले. ६२ शेतकऱ्यांना नैसर्गिक अापत्तीचा फटका बसला. कंठी ३१, बेळुंखी १२, खलाटी ६, वाषाण ११, येळदरी ८  आणि मलाळ येथील २ हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष, ऊस, मिरची, हळद या पिकांचे नुकसान झाले. द्राक्षबागांचे ९० टक्के नुकसान झाले.

बागेवाडी ३ आणि रामपूर येथील ४ घरे, वादळाने पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. बागेवाडी ७,  कंठी ५, रामपूर येथील ६ अशा १८ घरांचे वादळामुळे नुकसान झाले आहे. तलाठी, कृषी विभागाचे अधिकारी यांनी नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे केले आहेत.

इतर अॅग्रो विशेष
सिंधुदुर्ग जिल्हयात मुसळधार पाऊस (video...सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात बुधवारी (ता....
मक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक नियंत्रणमहाराष्ट्रात फॉल आर्मी वर्म (स्पोडोप्टेरा...
राज्य अर्थसंकल्प : सर्वसमावेशक ‘निवडणूक...मुंबई : राज्यात मोसमी पाऊस लांबला असला तरी आगामी...
‘सबसरफेस ड्रीप’ तंत्राने  ऊस, टोमॅटोची...शेततळ्यातले जेमतेम पाणी आणि उपलब्ध पाण्याचा योग्य...
कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजपुणे   : राज्यातील मॉन्सूनचे आगमन...
जुनीच वाट की नवी दिशाप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ...
कोरड्या महाराष्ट्रावर घोषणांचा पाऊसराज्यात सत्तेत आल्यानंतर शेतीतील गुंतवणूक वाढविली...
लोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...
बोंडअळी निर्मूलन प्रकल्पात आठ राज्यांचा...नागपूर : देशात सर्वात आधी गुजरात त्यानंतर...
लांबलेला पाऊस आणि नियोजनशून्य कारभारजूनचा पहिला पंधरवाडा उलटून गेला तरी राज्यात...
पर्यावरणकेंद्री विकास ही जगाची गरच आजमितीला भारत व जगाला भेडसावणारी अव्वल समस्या आहे...
कृषी विकास दराची मोठी बुडीमुंबई  ः देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर...
कर्नाटकी बेंदराच्या निमित्ताने आज ...कोल्हापूर  : राज्यातील कर्नाटक सीमेलगतच्या...
उत्कृष्ट संत्रा व्यवस्थापनाचा युवा...वयाच्या विसाव्या वर्षीच शेतीत उतरलेल्या ऋषीकेश...
मॉन्सूनचे प्रवाह अजूनही मंदचपुणे  : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळ निवळल्यानंतर...
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...