agriculture news in Marathi, 125 proposals for fodder camp in Nagar District, Maharashtra | Agrowon

जनावरांच्या छावण्यांसाठी नगरमध्ये १२५ प्रस्ताव
टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

नगर: मागील वर्षी खरीप हंगामात जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाले. दुष्काळी परिस्थितीत आवश्‍यक असणारा चारा, पाण्याच्या उपलब्धतेबाबत गंभीर प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता आहे. या प्रश्‍नावर मात करण्यासाठी सरकारने दुष्काळी भागात आवश्‍यकतेनुसार जनावरांना चारा, पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जनावरांच्या छावण्या उघडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जिल्ह्यातून १२५ प्रस्ताव आले आहेत. त्याची मुदत आता वाढवण्यात आली आहे.

नगर: मागील वर्षी खरीप हंगामात जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाले. दुष्काळी परिस्थितीत आवश्‍यक असणारा चारा, पाण्याच्या उपलब्धतेबाबत गंभीर प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता आहे. या प्रश्‍नावर मात करण्यासाठी सरकारने दुष्काळी भागात आवश्‍यकतेनुसार जनावरांना चारा, पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जनावरांच्या छावण्या उघडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जिल्ह्यातून १२५ प्रस्ताव आले आहेत. त्याची मुदत आता वाढवण्यात आली आहे.

छावण्या सुरू करण्याबाबत जिल्ह्यातून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. आवश्‍यकतेनुसार छावण्या उघडण्यास शासनाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. चारा छावण्या सुरू करण्यासाठी सक्षम स्वयंसेवी संस्थांकडून विहित मुदतीत प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. यापुढील कालावधीत तालुकास्तरीय समितीने प्रस्तावाची छाननी करून छावणी मंजुरीसाठी तहसील कार्यालयातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सक्षम प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.

तालुकानिहाय छावण्यांचे प्रस्ताव
राहुरी - ०२, नगर - ०७, पाथर्डी - ३७, पारनेर - ०३, कर्जत - १८, श्रीगोंदे - ८ व जामखेड - ५०, एकूण - १२५

इतर बातम्या
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
नाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा...नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर...
शेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेरावनाशिक  : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी...
मीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे...सोलापूर  : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर...
दिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ....सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी...
`आंब्याचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग :  कोकणातील आंबा...
कोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणीकोल्हापूर  : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची...
नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार  : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...
रणजितसिंहाच्या भाजप प्रवेशाने खरच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः पश्चिम...
काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी बारा...मुंबई ः आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
आचारसंहिता भंगाच्या ७१७ तक्रारीमुंबई : नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी...