agriculture news in marathi, 1254 farmers committe suicide after loanwiaver scheme declaration, Maharashtra | Agrowon

कर्जमाफी घोषणेनंतर १२५४ शेतकरी आत्महत्या
टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

मुंबई : राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी जाहीर केल्यानंतर (जून ते ऑक्टोबर २०१७) पाच महिन्यांच्या कालावधीत राज्यातील १ हजार २५४ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. यामध्ये निम्म्याहून जास्त अशा ६९१ घटना विदर्भातील आहेत. शेतीतील वाढती गुंतवणूक, शेतकरी कर्जमाफी आणि इतर विविध उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या घटतील हा राज्य सरकारचा दावा यामुळे फोल ठरला आहे.

मुंबई : राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी जाहीर केल्यानंतर (जून ते ऑक्टोबर २०१७) पाच महिन्यांच्या कालावधीत राज्यातील १ हजार २५४ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. यामध्ये निम्म्याहून जास्त अशा ६९१ घटना विदर्भातील आहेत. शेतीतील वाढती गुंतवणूक, शेतकरी कर्जमाफी आणि इतर विविध उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या घटतील हा राज्य सरकारचा दावा यामुळे फोल ठरला आहे.

राज्य सरकारने जून २०१७ मध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना जाहीर केली. योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबाचे दीड लाख रुपयांचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. तसेच नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. तसेच कर्जाचे पुनर्गठण झालेल्या शेतकऱ्यांनाही योजनेत सामावून घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा करून तब्बल पाच महिने उलटून गेले आहेत. याकाळात शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात आले. बँकांकडूनही स्वतंत्रपणे शेतकऱ्यांच्या कर्जाची माहिती घेण्यात आली. मोठा गाजावाजा करीत दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा झाली. पहिल्या टप्प्यात ८ लाख ४९० हजार शेतकऱ्यांची ग्रीन लिस्ट जाहीर करण्यात आली. पण, कर्जमाफीची ही प्रक्रिया ऑनलाइनच्या प्रचंड गोंधळात अडकली आहे. 

लाभाबाबत शेतकरी साशंक
राज्य सरकारच्या कर्जमाफीतून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. पण, दिवसेंदिवस जटील होत चाललेली कर्जमाफीची प्रक्रिया पाहून सरकारची कर्जमाफी फसवी असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये होऊ लागली आहे. याचे लाभ मिळतील याबद्दल शेतकरी आता साशंक बनले आहेत. त्यातच थकबाकीमुळे शेतकऱ्यांना खरिपात पीक कर्ज मिळाले नाही. आगामी रब्बी हंगामातील कर्ज वाटपावरही प्रश्नचिन्ह उभे आहे. शेवटी नाईलाजाने शेतकऱ्यांना खासगी सावकाराच्या दारात उभे राहावे लागते आहे. नोटबंदीच्या निर्णयापासून शेतकऱ्यांच्या शेतमालाला दरही मिळत नाही, अशी स्थिती आहे. सरकारकडून फक्त घोषणा होतात पण अंमलबजावणीच्या पातळीवर गोंधळाचे चित्र आहे. त्याचमुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या घटतील हा दावाही फोल ठरला आहे. परिणामी कर्जमाफी जाहीर झाल्यापासूनच्या पाच महिन्यांत १ हजार २५४ शेतकऱ्यांनी आत्महत्या मृत्यूला कवटाळले आहे. त्यापैकी अर्ध्याहून अधिक म्हणजेच ६९१ आत्महत्या जून ते ऑक्टोबर २०१७ या काळात  विदर्भात झाल्या आहेत.

इतर अॅग्रो विशेष
कांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरणसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला...
‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूसजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने...
देशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये...पुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी...
स्थानिकीकरणातही मका टिकवून आहे काही मूळ...जंगली मका प्रजातीपासून स्थानिकीकरण होण्याच्या...
कर्नाटकसाठीची ऊसतोडणी मंदावलीकोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रात उसाची रक्कम...
उजनी धरणातील पाणी प्रदूषितच :...सोलापूर  : उजनी धरणामुळे सोलापूर, पुणे आणि...
बाजारात डाळिंबाचे दर दबावातसांगली ः देशात डाळिंबाच्या उत्पादनात अंदाजे २० ते...
अवैध एचटीबीटी बियाणे एसआयटीला मुदतवाढमुंबई: परवानगी नसलेले तणनाशकाला सहनशील जनूक...
विदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्राला...पुणे : बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘पेथाई’...
समृद्धी महामार्ग : साडेतीनशे कोटींच्या...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम...
साखर संघाची दोन हजार कोटींच्या पॅकेजची...पुणे: राज्यातील साखर कारखाने आर्थिक अडचणीतून...
कॅल्शिअम, लोहाचा उत्तम स्त्रोत ः नाचणीआहारच्या दृष्टीने नाचणी एक अत्यंत महत्त्वाचे...
पिकातील लोह, जस्त, बोरॉन कमतरतेवरील...लोह (Fe) कार्ये ः हरितद्रव्ये निर्मितीचे (...
‘रेसिड्यू फ्री’ शेतमालासाठी उभारली थेट...सध्या रासायनिक अवशेषमुक्त (‘रेसिड्यू फ्री’) किंवा...
पूर्व विदर्भासह नागपूरपर्यंत रिमझिम...नागपूर : आंध्रप्रदेशात चक्रीवादळ दाखल झाल्याचा...
दुष्काळीशी सामना करण्यासाठी...पंढरपूर, जि. सोलापूर :  राज्यात यंदा...
पेथाई चक्रीवादळ आंध्रच्या किनारपट्टीला... किनारपट्टीय भागात जनजीवन विस्कळीत जमीन खचून...
उसाला पूरक शर्कराकंदसाखरेचा वाढलेला उत्पादन खर्च, वाढलेले उत्पादन,...
राजकीय अन् आर्थिक उत्पाताची नांदीअखेर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल ...
कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये...