agriculture news in Marathi, 13 shetkari sanghtna came together for sugarcane rate, Maharashtra | Agrowon

ऊसदरासाठी तेरा संघटना एकत्र
राजकुमार चौगुले
गुरुवार, 1 नोव्हेंबर 2018

कोल्हापूर : यंदा पश्‍चिम महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकरी संघटनानी एकत्र येत 3500 रुपये पहिल्या दराची मागणी रेटली आहे. लागलीच आंदोलनाची भूमिकाही जाहीर केली आहे. मागील देणी देण्यासाठीही कारखानदारांच्यावर दबाव टाकण्याचे या संघटनांचे नियोजन आहे. आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर या संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे.

कोल्हापूर : यंदा पश्‍चिम महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकरी संघटनानी एकत्र येत 3500 रुपये पहिल्या दराची मागणी रेटली आहे. लागलीच आंदोलनाची भूमिकाही जाहीर केली आहे. मागील देणी देण्यासाठीही कारखानदारांच्यावर दबाव टाकण्याचे या संघटनांचे नियोजन आहे. आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर या संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे.

ऊसदराचा लढा सुरू असतानाच आता स्वाभिमानी व रयत संघटना वगळता इतर बहुतांशी शेतकरी संघटनांनी एकत्रित येत आपली भूमिका जाहीर केली आहे. गेल्या काही वर्षांपासून एका संघटनेतून नाराज व्हायचे आणि दुसरी संघटना काढायची अशा पद्धतीने नव्या शेतकरी संघटना उदयास येत आहेत. या संघटना स्थापन झाल्यानंतर पहिला उद्देश हा जुन्या संघटनेच्या भूमिकेवर, व्यक्तीवर टीका करणे हाच असल्याने त्यांच्या मागण्याही मग फारशा गांभीर्याने घेतल्या जात नाहीत. 

पंधरा वर्षांपूर्वी पश्‍चिम महाराष्ट्रात शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेचे प्राबल्य होते. यानंतर वैचारिक निर्णय न पटल्याने या संघटनेची छकले होण्यास प्रारंभ झाला. या संघटनेतून बाहेर पडलेल्या घटकांनी स्वतंत्र संघटना स्थापन केल्या. काही कालावधीनंतर त्याही एकसंघ राहू शकल्या नाहीत. नाराजांची फौज वाढत जाऊन त्याची परिणामी नव्या संघटना स्थापन करण्यावर झाली. गेल्या काही दिवसांत अनेक संघटना अगदी मोजके कार्यकर्ते घेऊन ऊसप्रश्‍नी लढत आहेत.

या संघटनांचे मुद्दे चांगले असले तरी त्याचा परिणाम शासन दरबारी फारसा प्रभावी होत नसल्याने अखेर सोमवारी काही शेतकरी संघटना कोल्हापुरात एकत्र आल्या आहेत. या मध्ये रघुनाथदादांची शेतकरी संघटना, धनाजी चुडमुंगे यांची आंदोलन अंकुश, किसानपुत्र, जयशिवराय किसान मोर्चा बळिराजा, शरद जोशींची मूळ संघटना आदींसह 13 संघटना एकत्रित आल्या आहेत. केवळ उसाचा प्रश्‍न रेटणे हाच या मागचा उद्देश असल्याचे या शेतकरी संघटनेच्या सूत्रांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत आम्ही ऊस लढा निरपेक्ष भावनेने पुढे नेणार असल्याचे एकत्रित झालेल्या शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...
क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी...कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी...जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...