agriculture news in marathi, 13.68 crores in the insurance business of pomegranate growers | Agrowon

डाळिंब उत्पादकांच्या विमा खात्यात १३.६८ कोटी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 30 जून 2018

``विम्याची रक्कम आपल्या खात्यावर जमा झाल्याची संबंधित शेतकऱ्यांनी खात्री करून घ्यावी. खरीप २०१८ हंगामात जास्तीत जास्त डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी फळपीक विमा योजनेत सहभागी व्हावे.``
-संजीव पडवळ, जिल्हा कृषी अधिकारी

मालेगाव (सकाळ वृत्तसेवा) : नाशिक जिल्ह्यातील दोन हजार ४८३ शेतकऱ्यांनी २०१७ मधील खरीप हंगामात फळपीक विमा योजनेत सहभाग घेतला होता. यातील दोन हजार ३७६ डाळिंब उत्पादकांना या विम्याचा फायदा मिळाला आहे. त्यांच्या खात्यावर १३ कोटी ६८ लाख रुपये जमा झाले आहेत. अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना ही मदत मिळणार असून, खरीप हंगामासाठी फायदेशीर ठरेल.

शासनाने जिल्ह्यात मंडलनिहाय हवामान केंद्रे उभारली आहेत. स्कायमेंट कंपनीच्या सहाय्याने ही केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्यावरील उपलब्ध होणाऱ्या माहितीनुसार शेतकऱ्यांना विमा दिला जातो. २०१७ मध्ये फळपीक विमा योजनेत जिल्ह्यातील दोन हजार ३१४ कर्जदार व १६९ बिगरकर्जदार अशा एकूण दोन हजार ४८३ शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभाग नोंदविला. शेतकऱ्यांनी एक कोटी ५७ लाख २९ हजार ३२५ रुपये विम्याचा हप्ता भरला. यातील दोन हजार ३७६ शेतकऱ्यांना पीकविमा योजनेचा लाभ मिळाला. 

शेतकऱ्यांना पीकविम्यापोटी १३ कोटी ६७ लाख ८० हजार १० रुपये मिळाले आहेत. इफको टोकिओ कंपनीने डीबीटी पद्धतीने संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली आहे. तापमानात चढ-उतार, बेमोसमी पाऊस, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तींत हवामानावर आधारित योजनेचा लाभ मिळतो.

इतर ताज्या घडामोडी
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...